savitalote2021@bolgger.com

गुरुवार, २० मे, २०२१

पेटलेल्या रक्तात

     ***** पेटलेल्या रक्तात ******

पेटलेल्या रक्तात आग लागली नाही 
असे झालेच नाही, 
त्यात जळत गेली ...

झाडे अमानवी परंपरेची... 
स्वप्नांची इमारती अनैतिकतेची...
समाजव्यवस्थेच्या मनोरा...
अस्तित्वाच्या; अस्वच्छ वस्तीत  

उघडे झाले समानतेचे वारे... 
स्वच्छ होऊन गेली 
मनातील कोपरा न कोपरा 
भांडवलवादी व्यवस्थेतील ...

स्वःच्या सतत बदलत 
जाणाऱ्या आकृतीला 
चमकूच दिले नाही, 
कधी 

जळजळता अस्तित्वाच्या निखाऱ्यात पिढ्यानपिढ्या ....

म्हणूनच 
पेटलेल्या रक्तात आग लागली नाही 
असे झालेच नाही कधीही!!!

             सविता तुकाराम लोटे 

///////////////////////////////////////////

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

स्त्री महिला दिनविशेष

स्त्री स्वातंत्र्याच्या गोष्टी करता करता स्त्री बंदिस्त होत चालली आहे स्वखुशीने !! हे आता प्रकर्षाने जाणून येत आहे. स्त्रियांवर होणाऱ्या अत्...