savitalote2021@bolgger.com

शुक्रवार, २८ मे, २०२१

......रक्तांच्या थेंबात !!!

    (  28 May World Menstrual Hygiene Day)
      
       ✍️©️ savita Tukaram Lote

    ......रक्तांच्या थेंबात


स्त्रीच्या मनातील सहनशीलता 
वाढवणारी गोष्ट म्हणजे मासिक पाळी
 
अंधश्रद्धेच्या दौरखंडयात कशाला 
गुंफतात, स्त्रीत्वाचे ...अंतर्मन !!

पुरुषप्रधान संस्कृती ही जन्म घेते 
वंशवेलीचे फुल होऊन याच विटाळात 

तू नको ; म्हणू विटाळ !
नवनिर्मिती जनक ती ...मातृत्वाची ओळख 

अस्तित्वा उभे आहे बिनधास्तपणे तेजस्वी 
काट्यांवर नवेपणाचे, महावारीच्या थेंबात 

अगणित थेंब चार दिवसात  विटाळाचे... 
महत्व कळू दे परंपरावादी...समाजव्यवस्थेला 

तिन्ही जगाचा स्वामी आई विना भिकारी 
या आईपणाची मोल विज्ञानवादी जगात पेर 

........ स्वाभिमानाने रक्तांच्या थेंबात !!!

        ©️✍️ सविता तुकाराम लोटे 



----@@@@@@@@@@@@@--------



google picture 
------@@@-@@-------@@@@@@-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राहूनच गेले ( प्रेम कविता )

एक प्रेयसी आपल्या प्रियकराच्या मेसेज साठी वाट बघते आहे पण तो मेसेज आल्यानंतर त्याच्याकडून नात्यात मर्यादा आहे याची आठवण करून देणारी ही कविता...