savitalote2021@bolgger.com

सोमवार, ३१ मे, २०२१

******मोक्ष *****

****  मोक्ष ****

आयुष्य कोणत्याही आकाराचे 
असू द्या 
त्रिकोण चौकोन... 
आयुष्य जगा सकारात्मकतेने 
ताठमानेने स्वाभिमानाने 
नव्या पहाटेच्या सूर्याप्रमाणे 
तेजस्वी ....
मोक्षधामापर्यंत जाताना !

आयुष्य कोणताही आकाराचे 
असू द्या 
काटकोन चौरस वर्तुळ 
आयुष्य जगताना जगू द्या 
इतरांनाही सरळ मानेने  
स्वसंस्कारासोबत आदराने 
अप्पर शांती लाभू द्या
महानिर्वाणापर्यंत जाताना !

जगणे खूप सोपे आहे 
जगताना जगण्याची भाषा 
फक्त कठीण... 
केंद्रबिंदू असू द्या 
आपले सुक्ष्म विचारसुद्धा 
अंतिम सत्याचा सत्याकडे 
उत्तम कर्माचा हिशोबाकडे 
स्वतःच्या विचार संस्काराकडे 
आयुष्य कोणत्याही आकाराचे 
असू द्या      

काटकोन त्रिकोण चौकोन... 
वर्तुळ लघुकोन षटकोन...
अंतीम सत्य  
एकच मोक्ष!!!!
  

        ©️✍️सविता तुकाराम लोटे 




/////////********////////*******/////////


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राहूनच गेले ( प्रेम कविता )

एक प्रेयसी आपल्या प्रियकराच्या मेसेज साठी वाट बघते आहे पण तो मेसेज आल्यानंतर त्याच्याकडून नात्यात मर्यादा आहे याची आठवण करून देणारी ही कविता...