यंदाचा पाऊस
नको वाटतो
आठवणींच्या बाजारात
भिजने ..
नको वाटतो
ओला ऋतूचा
सुगंधी
नको वाटते
मनात रेंगाळत राहती
ओला स्पर्श
अबोल क्षणांचा
नको वाटतो...
आज परत पाऊस काचेतून दिसत आहे. ओला स्पर्श नको वाटतो, चिंब भिजलेला बेधुंद आठवणी... नको खुणावू मजला, आज ! येऊ शकणार नाही तू माझ्या घरातील खिडकीच्या काचेमधून आता. नाही भिजायचे.... भिजायचे मिठीत तुझ्या. का ग !तूच ये, भिजायला बाहेर.
परत अनुभवूया क्षण... अविस्मरणीय! काय गुन्हा आहे माझा? आता मला तुझ्या हदयात आठवणीत स्थान नाही. मला अजूनही आठवते तू बोलायची माझ्याशी कधीही. झाडाच्या विसावा घ्यायची नाही ....बेधुंद मुक्तपणे चिंब भिजत राहयाची... घराची वाट सोबत ... आणि मी तुझ्यासोबत!
मी ही हळूच चिंब भिजलेल्या मनाबरोबर आलिंगन देण्यासाठी मिठीत तुझ्या! मला अजून त्या आठवसुगंधी बेधुंद करतात ....तुझ्या सोबत घालवलेले क्षणआठव.
ऊन सावलीचा खेळ
चालू हळूवार सरींबरोबर
इंद्रधनुष्याची वाट बघत
तू माझ्या ओला स्पर्शसोबत
थंडगार झुळकी संग
अजूनही वाटते ते दिवस यावे परत तुझ्या साठी माझ्यासाठी आपल्यातील मैत्रीसाठी. तुझ्याबरोबर शांत होऊन चिंब भिजावेे मिठीत अलगद यावे. तुला भिजविण्यासाठी... मनाला भिजविण्यासाठी... पहाटेच्या सूर्यप्रकाशाच्या मंद प्रकाशात काळाशार झालेल्या ढगाळ आभाळात. इंद्रधनुष्याच्या् साक्षीनेे घ्यावी परत शप्पथ... तु माझी मी तुझा सखा मित्र!
चिंब भिजवावे तुला तुझ्या स्वप्नांच्या नगरीत आणि मनाला बेधुंद हसवावे... पानांच्या सरसरीमध्ये फुलांचा ओलाचिंब सुवास तुला द्यावा. काट्यांची तमा न बाळगता फुलवावे तुझे माझे प्रेम परत त्याचा सुगंधासोबत आजचे क्षण परत.
उद्याच्या आठव सुगंधित क्षण जपून ठेवण्यासाठी. ये ना!!! परत चिंब भिजायला. अंगणात पहाटेच्या सूर्यप्रकाशाच्या साक्षीने. ढगाळ झालेल्या वातावरणात... हे बघ ! मी होऊ देणार नाही विजांचा कडकडाट. ये ना!!!
मज ध्यानी तुला कडकडाट किती भीती वाटते ती तू बोलायची मला.
नको रे येऊ
घेऊन हा आवाज
पायातील शक्ती नाहीशी
होते... कंप सुटतो मनी
हृदयातील भावभावना
घामेजल्या जातात ...भीतीने!!!
आणि शांत होण्यासाठी हात जोडून बोलत राहायची अरे नको रे, झाले पुरे आता. आवाज करून, ये तू बेभान होऊन. पण मंद सरी बरोबर वाहत राहा असाच शांत कुणाचे नुकसान होऊ देऊ नको. मी हसायचो !तुझ्यावर. तुझ्या निरागस विचारांवर. त्या क्षणी अबोल मी... निशब्द मी .
त्या क्षणाला मी स्वतः स्वतः शी बडबड करत असे.... तुझ्यासारखा कवितेत. अगं वेडे !!!!
पाऊस आहे मी
शांत कसा होणार
येणार आवाजाने
कधी शांत कधी अशांत
महाप्रलयाचे गाणे होऊन
कधी मंदपणे... हळुवारपणे..
भक्ती रसात तल्लीन होऊन
तर कधी....
महादेवाच्या तांडवासारखे
तर कधी ...
मंत्रमुग्ध करणारा सप्तसुरांशी
स्पर्धा करत ...
तुला चिंब भिजवून
मिठीत शांत विसावा
घेण्यासाठी ...
माझ्या पहिल्या सरीसोबत
तुझा सख्खा मित्र बनून !!!
हो का !बरं झाले.... आत्ताच बोलला तू. "ते मी बोलले की हसायचा म्हणून".
स्वप्नाच्या नगरीतून बाहेर ये! जेव्हा मी बोलायचे मला बघायचे आहे क्षितिजापलीकडे विश्व.... क्षितिजाअलीकडे विश्व.... ती हिरवळ.... ते सौंदर्य !! क्षितिजा अलीकडील- पलिकडील. त्यावेळी किती रागावला होता तसं काही विश्व नसतं. रागाने विजेचा कडकडाट आणि मंद सरीसोबत अचानक गारवा गारीसोबत.
रुद्ररूपसंग अजून आठवते, मला तुझे ते प्रेम त्यात भिजायला लावून स्वतःच्या रूपाचे कौतुक करून घेत होता.थरथरत्या ओठांनी. भीतीचे सावट सर्वीकडे बरसून मला. मलाही आठवत बोलली होती तु ही.....
जा रे जा रे नको येऊ
सोबत रुद्र रूपात....
मला हवा आहे
शांत... माझ्या सारखा मित्रसखा
प्रेमळ नवचैतन्य फुलविणारा
सुखाची उधळण करत!!!
तुला एक सांगू खरच तुला आता चिखल आवडत नाही. डांबरी रस्त्याचे सौंदर्य आवडत नाही. सांग ना मला अजूनही आठवतं तुझं ते हसणं... मला अजूनही आठवतं तू बोलायची त्या डांबरी रस्त्याला 'ब्लॅक ब्युटी ' मला हेवा वाटायचा ; हीच सर्व प्रेम त्या डांबरी रस्त्यावर. तिळपापड व्हायचा! वाटायचं सर्वीकडे शांत बरसावे आणि त्याच्यावर फक्त धो धो बरसायचे. आजूबाजूची सर्व काटेकुटे त्याच्यावर आणून ठेवायचे... त्याचं रूप विद्रूप करायचं. त्याची "ब्लॅक ब्युटी", नष्ट करायची.
तो ही हसायचा, माझ्यावर. तुझ्यासाठी बोलून जायचा त्याच्याही नकळत; तिला सर्व सुंदर वाटत. हा निसर्ग ...हि हिरवळ... या डांबराचा सौंदर्य... चारही बाजूने असलेली ही झाडे... बाबळीच्या झाडाच्या फुलांच्या तर ती आतोनात प्रेमात आहे. 'ते फुले तर तिला केसात माळायचे आहे.' खरच वेडी आहे ती!!! डांबराचा रस्त्याला ' ब्लॅक ब्युटी' बोलते.
गवताला हिरवा शालू बोलतो... चिखलाला नव सौंदर्य बोलते.... तुला सांगू पावसा!! मी डांबर.. तू पाऊस.. हा हा चिखल... हे गवत ... ही झाडे... ही माती ...हे दगड ...तो आभाळ... हे साचलेले पाणी ...ते शेवाळ ....या सर्वात काही सौंदर्य नाही तरी पण तिला दिसतं सौंदर्य.
ती माझ्याशी बोलते तेव्हा म्हणते, "तुझा रंग काळा तरी दिसते तू ब्लॅक ब्युटी, हा पाऊस धो धो बरसतोय तरी मला वाटतं हे जल जीवन....
हा चिखली मला घेऊन जाते माझ्या बालपणी पाय ठेवला की वाटतं सुंदर आयुष्य नाही यासारखं. बेधुंद; नाचावे वाटते बेधुंद.... इवलेसे गवतफुल मला मोहून टाकते बळ देते संघर्ष करण्यासाठी ... नव माधुर्य मनात निर्माण करते. ही झाडे सांगतात , एकनिष्ठ राहा ; स्वतःच्या संस्कारांसोबत. बदलत्या ऋतूनुसार बदल स्वतःलाही, स्वतःच्या विचारांनाही आणि स्वतः मध्ये बदल कर. वटवृक्ष होऊ शकलो नाही तरी सावली मात्र देऊ विसाव्यासाठी!!
कोणत्याही क्षणी ताठ मानेने उभी आहे ही बाभळी फक्त फुलत राहते फुलता फुलता हसत राहते.... स्वतः स्वतःला स्वतःच्या सौंदर्यामध्ये.... कारण तिला माहित आहे मला काटे आहेत ! तरीही हसत राहते सर्व ऋतूमध्ये.
ही माती, हे दगड सांगते मला कितीही माती झाली तरी दगड व्हावेच लागते कधीतरी... हे आभाळ सांगते ,मला सुर्याची पहिली किरण आणि सूर्याचा शेवटचे किरण ते तेज ,ती शांतता ,रंगांची उधळण... अमावश्या -पौर्णिमेचा खेळ आणि परत अंधारल्या जगातून परत रंगांची उधळण करत आपला प्रखर तेजाने.... नवसंजीवनी निर्माण करतो. त्यावेळी वाटतं खरंच आभाळ किती सुंदर आहे. त्याला माहित आहे, सर्वच निसर्ग ऋतूंचे चक्र. त्याला माहित आहे,
सर्वच खेळ रात्र -सकाळचा. त्याला माहित आहे, सर्वच जीवसृष्टीतील निर्जीव सृष्टीतील सर्व वर्तुळ चक्र. त्याला किती यातना होत असतील; ना कधीतरी. त्याला दुःख दिसत असेल पण तो दुःखी होत नाही कारण तो बघतो
आपल्या भावविश्वात ही जीवसृष्टी निर्जीव जीवसृष्टी. म्हणून असतो... प्रत्येक क्षणाला.. प्रत्येक ऋतूला ...प्रत्येक वेळेला...आपल्या सोबत! तो कुठेच जात नाही. रात्रीच्या त्या काळोखाला चांदणीच्या रूपात प्रकाश देत. त्याच्या आयुष्यात किती सुखद आणि दुःख क्षण असते माहित नाही तरी तो बघतो सर्वीकडे शांतपणे सर्वात सौंदर्य.
अरे पावसा ! तुला माहित आहे, साचलेले पाणी म्हणजे जीवन. आजचे उद्याचे परवाचे आणि पृथ्वीतलावरील आयुष्याच्या जीवनाच्या. त्याला जपून ठेवावे लागेल स्वच्छ निर्मळ स्वच्छ धारेमध्ये त्याला मुरवावे लागेल या माती कल्पवृक्षाच्या आणि वटवृक्षाच्या मुळाखाली तरच वाचेल माझा सखा मित्र पाऊस!!!
माझा मित्र वाचला तरच मी वाचेल.... तू वाचशील... ही माती.. दगड ..शेवाळ ... झाडे ,पाने,आभाळ आपल्या डोळ्यांनी जे जे दिसत आहे ते सर्व. आणि हे सर्व आपला सखा मित्र वाचला तर.
जाऊ दे !चल बाय 🖐चल बाय,झालं की संपलं सर्व ...सर्व संवाद. सर्व काही. मला अजूनही आठवते ती हसली कि हसावा वाटायचं पण तिने कधी उन्हात गरम झालेली ब्लॅक ब्युटी तिच्या जीवनात शब्दात कधी अनुभवावी नाही. असं सतत वाटून जातो ; तिच्या वाटेला फक्त हिरवळ यावी मी सोबत नसलो तरी दुःखाचे ऊन माझ्यासारख्या येऊ नये कधीच; पावसा!! तसे झाले तर ये तू सुखाची वाट दाखविण्यासाठी कोणत्याही स्वरूपात पण सुखद होऊन !!!
आलिंगन दे तिला तुझ्या हळुवार रूपात, मिठीत घे! तिला तिच्या सर्व दुःखानं सोबत. आसवे गोळा कर सर्व मनातील भावनेतील आणि घेऊन जा कुठेतरी दूर समुद्राच्या ही पलीकडे जे कधीही कोणाला दिसणार नाही .करशील ना एवढं माझ्या मित्रा, माझ्या सखीसाठी!!!! तुझ्या प्रियेसाठी... तिच्या त्या शब्दासाठी ती बोलते तुला," माझा सखा मित्र ",या शब्द भावनेसाठी. पावसा करशील ना ? हो रे बाबा!! तिच्या शब्दात ब्लॅक ब्युटी ,हो.
ये ना !!
का?
बाहेर! फक्त अंगणात ये.
कवटाळून तुला सांगेन
माझ्या मनातील वेदना
सावल्या उरला आहे नयनात
भिजलेल्या ....
काळोखाच्या दारात
विचारांच्या!!!
.... मी तुझा सखा मित्र
झोळीत घ्याल कोरडा ओल्या
हुंदका, फुंकार असेल माझी
त्या असहाय्य वेदनेवर...
आनंदाची सुखाची.
बरं sorry. कशासाठी! नाही म्हणणार... जा जा यासाठी !! पण आता येऊ नको आता रिमझिम सरी बरोबर मी नाही देऊ शकत तूला दुःख...आसवे. ब्लॅक ब्युटीला सांग! तु .खरच माझा मित्र आहे खरा मित्र आहे.
पावसा तुला सांगू त्याचा हेवा करायचा त्याला डांबर म्हणायचं; त्याचा कधीच दुःख झाले नाही कारण सांगू त्याचं ते रूप तुझ्यामुळेच होतं.... तू आल्यामुळे त्याचं ते रूप होतं. त्याच्या सौंदर्याचा ..त्याचा मेकअप तूच होता आणि माझ्याही.
(*****✍️🏻©️सविता तुकाराम लोटे ****)
मला भिजायचे नाही खिडकीतून आला तरी. मला भिजायचे नाही, अंगणात येऊन. मला भिजायचे नाही, तुझ्यासोबत. आठवांसोबत तुझ्या माझ्या. मला भिजायचे नाही ,सकाळच्या त्या शांत मंद सूर्यप्रकाशासोबत मनसोक्त. भिजायचे नाही मला तुझ्यासोबत कोणत्याही अस्तित्वाच्या स्वप्नानासोबत आणि अकाल्पनिक जगासोबत तुझ्या मिठीत.
कळून चुकले आज तूच बरोबर आहे अलीकडे-पलीकडे असे काहीच जग नाही आहे फक्त भास आभास सजीव निर्जीव शाश्वत अशाश्वत वास्तव अवास्तव....
आसवांचे रूप सदा सर्वीकडे
अलीकडेही आणि पलीकडेही
मनातून वाहतो ओथंबून
स्पर्शाने उजळलेल्या
लाटांसोबत....
हळुवार भावनेला रुद्ररूप देत
नव्या सुगंधात....
न्हाऊ पाहतो
टक टक ...टप टप...
आवाजात
मला अजुनही आठवत तू बोलून गेला होता सह्याद्रीसारखी हो... कणखर! ऊन वारा पाऊस झेलत. योद्धा आहे सह्याद्री. सह्याद्री सारखे कणखर हृदयाची. स्वप्नांच्या स्वप्न
महारांगोळीतून बाहेर पड ... आता सह्याद्री हो कठोर सह्याद्री हो सह्याद्री पण तू तर आपल्याच धुंदीत स्वप्न साखळीच्या गुंतलेले स्वप्नात स्वप्न सावलीची पानगळ कर पाखरांची किलबिल हो उडण्यासाठी ओंजळभर कसोटीवर परका कर स्वप्न रंजीत कल्पना......
स्वप्न रानातील फुले टाक
अवचित होऊन उगवत्या क्षणाला
थांब मान्य कर...
सूर्याची तेज किरण
फक्त पहाटेच्या
कोमल वाऱ्याचे नको सत्य
सह्याद्री सारखे कणखर हो
हृदयाला कणखर बनवून...
थांब मान्य कर
अस्तित्वाचे जाळे...अस्तित्वाचे जाळे...
माझा सखा मित्र,तुला आठवतात हे सर्व! बोलला होता. हो मला आठवत ! झाले मी सह्याद्री .तुझ्यासाठी माझ्यासाठी... झाले मी सह्याद्री मनाने. मी सोडून दिले ती महारांगोळी स्वप्नांची. तुला न आवडणारी.मी सोडून दिली ते सर्व क्षितिजे ....सोडून दिले सर्व स्वप्न.
मला आता चिखल चिखल दिसतो. सर्वच चिखलात कमळ उगवत नाही हे सत्य मी मान्य केले ....सर्व विचार काल्पनिक जगात नाही मी मान्य केले तुझे ते सर्व विचार सखा मित्र.... तूच बरोबर होतं तू ये कसाही शांत अशांत रुद्र रुपात..... मला मान्य आहे; तुझे ते सर्व रूप. कारण ते सत्य आहे. तुझ्या म्हणण्याप्रमाणे सह्याद्री झाले.... पण युद्ध नाही जिंकले ....नाही गमीनी कावा करता आला ....नाही तुझ्यासोबत येण्यासाठी तुझ्यासाठी येण्यासाठी मला सोडून द्यावे लागते माझ्यातील सह्याद्री दगड झाले आहे.....
तुझा गार वारा तुझे आलिंगन माझ्या मिठीत तुझंच असताना आता फक्त ओलेचिंब होणे आहे. भावनाशून्य झालेल्या भावने सारखे !!मी आले तरी नाही घेणार तुला मिठीत. नाही घेणार मी तुला माझ्या स्वप्न महारांगोळी.नाही घेणार मी तुला माझ्या वेदनेच्या सावली.उगवता क्षण तुझा. मावळतीचा क्षणी ही तुझाच. मी फक्त त्यातली वाटसरू विसावाला
येणारे मी येईल नक्की येईल माझ्या सखा मित्र जेव्हा मी तुझी प्रिया होईल ..मी परत हट्ट करणार नाही क्षितिजा पलीकडे जगाचे. मी मान्य केले तुझे अस्तित्व... तुझे ते शब्द... तुझे ते गुंतलेले भाव... तुझे प्रेम !सर्व काही. पण मी येणार नाही बाहेर आत्ता या क्षणाला कारण मी आता दगड झाले आहे. माती माती दिसते, चिखल चिखल दिसतो, बरसणारा पाऊस पाऊस दिसतो ,झाडावरचे थेंब दवबिंदू दिसत नाही, पानांची सळसळ आता फक्त बेसूर आवाज असतं . जाऊ दे वेदना खूप!!!!
काचेच्या खिडकीतूनही मी तुला भेटतेस त्यास रंगरूपात...
त्याच ओल्या प्रेमातआणि मीही भेटते
त्याच प्रमाणे फरक फक्त इतकाच
मी खिडकीच्या आत आणि तू बाहेर
आजही हळवी होते ...तुझ्यासोबत!! भिजण्यासाठी
आजही भिजेल ....
तुझ्या सोबत तुझ्यामाझ्या मिठीत
नेहमीप्रमाणे जिंकलास. फक्त माझ्यासोबत ते स्वप्न नसतील. असतील ते सर्व नवीन स्वप्ने!! तुझा गारवारा मला मनाला फुंकर घालेल नवीन हसण्याचे बळ देण्यासाठी. मी हसेल नव्याने तुझ्यासोबत... नवीन आठवणींसाठी. नको वाटणारा पाऊस हवाहवासा वाटेल. येते मी अंगणात ....!!!
हो हो दगड होऊन नको येऊस!!!! हा हा हा हा हा.
मनसोक्त भिजूया याच आठवणी
तू माझा सखामित्र मी तुझी प्रिया
तुझे दवबिंदु माझे अश्रूबिंदू
दोन्ही नको फक्त एक
फुंकार
शांत सरीची ....❤❤
तुझ्या माझ्यातील रेशीमबंधाची!!!!
***✍️🏻©️सविता तुकाराम लोटे ***
----------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा