savitalote2021@bolgger.com

गुरुवार, १० जून, २०२१

*** त्यानंतरचा,मधला प्रवास ***




       *** त्यानंतरचा,मधला प्रवास***


आयुष्यातील सुंदर क्षणापासून 
चालू झालेला प्रवास 
आयुष्याच्या अंतिम प्रवासापर्यंत;
मधला प्रवास सुखाचा 
त्यानंतरचा प्रवास यशाचा 
परत मधला प्रवास 
र्सौदर्याचा ऐश्वर्याचा, त्यानंतरचा 
प्रवास सुख-दुःखाच्या वाटाघाटीच्या 
त्यानंतरचा प्रवास शांत संयमाने 
चालण्याचा ...परत मधला प्रवास 
देऊन जाण्याचा !!
आयुष्य चक्र संपले की 
अंतिम प्रवास...
आठवणींचा फुलांचा!!!

    ©️✍️🏻 सविता तुकाराम लोटे 

    ©️✍️🏻Savita Tukaram Lote
------------------@@@@----------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...