savitalote2021@bolgger.com

शुक्रवार, २५ जून, २०२१

** असा माझा शाहू होता **

          26 जून सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा.....
            सदर कविता स्वरचित आहे,' असा माझा शाहू होता'.

**** असा माझा शाहू होता  ****

समाजातील वास्तवतेचे गणित मांडली 
जातीपातीच्या युद्धामध्ये शिक्षणाची शस्त्रे 
वापरली सर्वप्रथम  सक्तीचे शिक्षण दिले 
न घेतल्यास दंडही एक रुपया... 
असा माझा शाहू  होता 

फुलविले सुंदर नंदनवन प्रगतीचे
एकाच शाळेत स्पृश्य - अस्पृश्यांची पोरे 
पुसली जातीचे वर्चस्व श्वासाच्या शेवटच्या
क्षणापर्यंत ... व्यवस्था परिवर्तनाची
असा माझा शाहू होता

जगणे सोपे केले जातीपातीच्या प्रहारमध्ये ठावठिकाणा न ठेवला गुरफटलेल्या
संस्काराचे स्त्रीमुक्त झाली बंधनाच्या किनाऱ्यापासून प्रगतीच्या अलगद काठावर उभी राहुन दारे उघडी करून, 
...जगायला शिकवणारा 
असा माझा शाहू होता

नवा प्रयोगाची लाट उभी केली 
मनुवादी ब्राह्मणसंस्कृती समोर राजश्रय
दिला पारंपरिक कलेला आणि कास धरली संशोधनाची विकासाच्या वाटेने तहानलेल्या
गोरगरीब शेतकऱ्यांची ...पंख दिले खुशाल
जीवनाचे ....
असा माझा शाहू होता

गुलाम वतनदारी रद्द केली प्रकाश दावीला 
उजेडाचा पंख बळावर चालविण्यासाठी
देवदासी ही झाली बंद आयुष्याच्या 
सागराला बंधनमुक्त... केले जगतांना 
पुनर्विवाहची वाट मोकळी करणारा 
असा माझा शाहू होता

न्याय समता बंधुता स्वातंत्र्याचे प्रणेते
आरक्षणाची पायवाट दिली बहिष्कृत
समाजाला, संघर्षाची गाथा संपविणारा 
सगळ्यांना एकाच नाण्यात तोलणारा 
शब्दाला जागविणारे.... जीवनाचा प्रवास
दीनदलित-बहुजनांसाठी आयुष्यखर्च करणारा 
सामाजिक क्रांतीचे वादळच जणू...
असा माझा शाहू होता

कालानुरूप बदल हक्क सामाजिकव्यवस्थेचा
सांभाळ खुर्चीचा तरी विकास आत्मकेंद्रित
सर्वांगीन विकासाचा संस्काराची धार चेतवीत मनात मायेचीगोधडी गुंफलेली 
माया घेऊन
दूरदृष्टी जनतेचा कल्याण करणारे 
सामाजिक न्याय व्यवस्था निर्माण करणारे 
असा माझा शाहू होता

              ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  **** असा माझा शाहू होता  ****
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...