निसर्गावरिल कविता
Marathi kavita poem in Nature"
निसर्ग जीवसृष्टी अनेक पक्षी त्यांच्या प्रजाती त्यांचे दैनंदिन जीवन वेगवेगळे असते. पक्ष्यांचे रंग, घरटे बनविण्याच्या पद्धती, विविध आहे.
पक्ष्यांमध्ये सुगरण पक्षी त्यांच्या घरटे बनवण्याच्या पद्धती मुळे आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. त्यावर सुचलेल्या ह्या काही चारोळी आहे.
सुगरणला बाया, विणकर, गवळण असेही म्हटले जाते. घरटे बनवण्यासाठी वेगवेगळे साहित्य वापरले जाते आणि सोबत खूप सारे स्वप्नही विणले जातात.
एक स्वप्न पूर्ण झाले की काही सुगरण गवळण परत दुसरा खोपा तयार करतात आणि परत प्रेमात पडतात त्यावर सुचलेली ही कविता.
******** खोपा व्यभिचाराचा*******
काही क्षणात हर्ष सुखाचा
निसर्ग पाऊलखुणा नवनिर्मितीची
सोहळा चालू आनंदाचा
खोप्यात....
पण गुलाम न राही
काही गवळण...
संसार अर्धवट सोडून
नवे खोपे विणे फांदीवर
मानवी प्रवृत्तीचे दर्शन घडे
प्रेमात ..प्रेम व्यभिचाराचे
खुलत राही पुरुषार्थ
अहंकाराचा...
नवीन फांदीवर
संसारा अर्धवट सोडलेला !!!!
©️✍️🏻सविता तुकाराम लोटे ×*****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा