savitalote2021@bolgger.com

गुरुवार, १ जुलै, २०२१

......मनातील माझ्या .......

     आयुष्यात वेदना ह्या अशा असतात की वेदनेचा उन्हामध्ये आपल्याला असे वाटते की आपण लांब आहोत,  या भावनेतून सुचलेली ही कविता. 
      कविता स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करा.


        .....मनातील माझ्या .......

मला वाटले 
बाहेरून ऊन माझी आहे 
पण उन्हाच्या उष्ण गंधावलेला 
वाऱ्याला माहित नाही 
मी माझ्यातील लांबचलांब 
विचारांची साखळी माझ्या 
गुंफलेल्या व खुंटलेल्या 
सावलील्या ऊनची सोबत होत 
होती... पण ती विसरली 
आपल्याला ...
चटकाचे चटके द्यायलाही 
कारण ती लांब होती माझ्याजवळून 
आणि मी तिच्यापासून 
मला वाटले 
ती माझी आहे पण ती 
....खुंटलेली होती फक्त 
मनाला चटके देण्यासाठीच...


                ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-   .... मनातील माझ्या .......
आपला अभिप्राय खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद

*************************************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...