भावनेच्या भरात मनात शब्द
येतात जीवनाची साक्ष देत
रमून जातात शब्द आठवणींमध्ये
शब्दांच्या मधुर कल्पनेमध्ये
डोळ्यातले भाव सांभाळून
हरवती जीवनातील सत्य आजचे
शब्द लिहिले जातात
आयुष्याचे तुटलेल्या धाग्याला
परत शब्दाने बांधून
पण रुसली जातात सुकून
गेलेल्या कोऱ्या आठवांसोबत
शब्दपाकळी हसरी
परत शब्दांच्या सोबत खेळ
चालूच कोऱ्या पांढराशुभ्र कागदांवर
अबोल आसवांच्या संग
मनशब्दाला उतरविताच येत नाही
आयुष्याच्या ; रिकामा क्षणांमध्ये
अडकलेल्या शब्दांना
शब्द सावरतात अशा क्षणासोबत
माझे त्याचे प्रेम
शब्द ओंजळीत घेत सांभाळत
शब्दमिठीत मला घेत
सदा फुलविण्यासाठी
मनशब्दाला आपलेसे करीत
शब्दांच्या साक्षीने....!!
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- ***** शब्द माझे -त्याचे ****
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thanks!!!!
===========================
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा