✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
आयुष्याच्या साध्या आणि सरळ सोप्या वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा इतक्या अटीतटीच्या का होतात हेवा दादांच्या या गणितामध्ये रमणाऱ्या आयुष्याला आपण समजून किती वेळ घेतो गुंता सतत वाढत जात राहतो सुगंधाच्या दरवळा मध्ये आपला श्वास प्रतिसाद देत राहतो नेहमीच आपण अनोळखी चेहऱ्यांची सवय होत राहते आणि तीच सवय म्हणजे नेहमीच्या प्रतिसादाला सहजता आणत राहते.
वेगवेगळे चेहरे वेगवेगळ्या प्रश्नांची साखळी वेगवेगळ्या उत्तरांची सोडवणूक आणि वेगवेगळे स्वरूप! गळणाऱ्या पानांवर निसर्गनियम ठरलेला नव्या शब्दाची नवी माळ आणि नवी विश्वाची नवी चाल सोबतीला नव्या ऋतूंची नव्या फुलांची बहरलेल्या विश्वाची हिरवेगार रानातील पांढऱ्याशुभ्र संपत्ती विश्वाची नवीनच पण जुन्या जाणीवेची उगवत्या सूर्याची लखलखता प्रकाशाची नव्या जाणिवेने सोबत घेत रोज किती तरी पावले अलगद गोड आठवणी देऊन जातात.
जाणीव आपली नवीन पहाटेची
जागोजागी गंध फुललेलेच
क्षणांच्या सावल्यांमध्ये ठेवलेली
आणि सरळ साध्या पाय रानातल्या
हिरव्या गालीच्याची साज चढवलेली
वेचावेस वाटत राहते ते आयुष्याचे ते क्षण आणि निर्माण करावेसे वाटत राहते ते क्षण या शांततेसाठी किती प्रयत्न असतो प्रत्येक क्षणांच्या आणि गोड उंच भरारीच्या!
धावपळ असते पण सुखद
धावपळ असते पण गोड
धावपळ असते पण मायेची
धावपळ असते पण उंच भरारीची
गोड आठवणीचे तरंग अलगत ओंजळीत देत राहते आकाशातील रंगीबिरंगी चित्रातील धावपळांयाचे वेचणारे निरागसता आणि काळ्याभोर कोकिळे सारखं उत्साहाने गात रहावे.
मनाला फुलवीत रहावे सतत धावपळीच्या या प्रवास वाटेवर आयुष्याच्या वाटा साऱ्या भिजलेल्या असतात.
वर वर पाहता सारे कसे सुकलेले पण आतून भिजलेले क्षणभर गारठलेल्या पण चिंब भिजलेल्या पानावरती क्षणभर थांबविता आणि जागोजागी वाटेवरती एक सुखद शुभ्र मोत्याची माळ रानफुलांच्या पायवाटेवर जोडून हिरवीगार गालीच्या मध्ये स्वतःचे अस्तित्व देऊन जातात.
ओली माती खरंच सुगंधी झाली की वैभवाचे क्षण आपल्याजवळ देऊन जातात. पांढरे सोने सुखात प्रफुल्लित मन करून जातात कुठेतरी पावसाचे अंगावर देऊन जातात. झाडांच्या पाना फुलांवर चिंब आपलेपण भिजवून ठेवतात .
सांगावेसे वाटते आयुष्याच्या साध्या-सरळ आणि वाटेवर वळणदार थोडा पाऊस अंगणात वेचतांना माती ओली होत असते. तसे संघर्ष... क्षण भरलेल्या येत असतात मोती देउन सारे कोरडी नाते चिंब भिजून जातात.
आकाशातील काळे ढग ले जातात आणि फक्त स्वच्छ आभाळ सामोर डोळसपणे निळ्याशुभ्रपणे आपले रूप दाखवून जातात साधे सरळ वाटणारे अधिक सरळ वाटतात स्वच्छ दिशेने पाऊल ठेवताना.
वेचलेले क्षण साधे असावे
साध्या असलेल्या क्षणांना
सोबत हसून ठेवावे
आणि वेचत रहावे
कोणत्याही क्षणाला सोडवित
साधे ठेवावे सुगंधित ठेव ठेवून
आयुष्याच्या दरवळलेल्या
अनोळखी चेहऱ्यांसोबत
दिनांक - १४.१.२०१५
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- अनोळखी चेहर्यांसोबत जागोजागी!!!
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you
*************************************
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा