साहित्यरत्न झाले
दीड दिवसाच्या शिक्षणाने
आयुष्यभर पेरले त्याच दीड
दिवसाचे ज्ञान शब्दसंपत्तीने
रूपवादी श्रृंगारवादी साहित्याच्या
शब्दांना चालविले धारदार
शब्दतलवार शोषितांच्या अन्यायाची
गुलाम न आम्ही अन्यायाची
परंपरेची संस्कृतीची द्या फेकून
जातीयतेला, डोक्यामधील अंधश्रद्धेला
वादळ केले त्यासाठी बंडखोरी
तू उठ सांगून लढा दिला...
एकजुटीसाठी !
शोषितांच्या न्यायासाठी
नैराश्य न मनी कसली
उठून उभे नायक त्यांचे वास्तव
जातीवादी संघर्षाचे निर्मिती
नव वास्तव जगाचे
महाकाव्य रचले मानवी संघर्षाचे
अनमोल वाणीतून व्यथा मांडली
जातवास्तवाची
पण संघर्ष निळा रक्ताचा
स्वाभिमानाचा अभिमानाचा
माणूस म्हणून जगण्याचा
दौलत परी आम्हा कवडीमोल
तरी वारसा आम्ही भीमरायाचे
जग बदल सांगून गेले भीमराव
सांगत पावले टाकीत
एक एक चालत राहिले
तळ हातावरील रेषा पुसत
आम्ही भिमाचे वाघ! बदलून
टाकू विषमतेचे वटवृक्ष
लिहित राहिले तुम्ही शब्द लढाऊ
संघर्षही केला कष्टकरी
शोषित कामगार यांच्या न्यायासाठी
जे जे दिसले
जे जे अनुभवले
ते ते शब्दबद्ध करीत राहिले
मानवतेच्या कल्याणासाठी
समानतेच्या लाटेसाठी
माणूस म्हणून जगण्यासाठी..!!!
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-***लोकशाहीर अण्णाभाऊ साठे **
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!!
----------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा