savitalote2021@bolgger.com

सोमवार, २ ऑगस्ट, २०२१

खरंच कुठे चुकतंय का...

*** खरंच कुठे चुकतंय का...***

स्वतःला विचारता विचारता 
प्रश्न पडतात 
खरंच कुठे चुकतंय का 
नम्रतेने प्रश्न करते 

मी स्वतः आत्मपरीक्षण 
करावे का? की सोडून 
द्यावे नशिबाच्या हवाली..!!
उत्तरांच्या अपेक्षेने; 

खटकते मला 
खरंच कुठे चुकतंय का 
फक्त आभास आहे 
चुकण्याचा 

आभास आहे 
प्रश्नांचा की... 
आभास आहे 
सत्याचा स्वतः स्वतःला 

विचारते 
खरंच कुठे चुकतंय का 
आपण आपल्याकडून जास्तच 
अपेक्षा करतो का?

बहुतेक हेच 
खरंच चुकतया..!!

                    ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- *** खरंच कुठे चुकतंय का...****

        आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका..!!!


---------------------------------- 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...