"संस्कार फक्त माझे"
जगण्याचे सर्व प्रश्न हे नशीब असेल तर
चांगले संस्कार ...चांगले मन...
चांगल्या रूढी प्रथा परंपरा...
यांच काय ?????
संस्कार हे जन्माने मिळतात काही संस्कार स्वतः स्वतःवर करावे लागतात पण खरंच आपण त्या संस्कारांना आत्मसात करतो का.. संस्कार आत्मसात करणे हे माणूस म्हणून जगण्याचे एक अभूतपूर्व संस्कार आहे. जागतिक माहितीच्या या महा जाळ्यामध्ये माणूस हरवत चालला आहे का हा प्रश्न सतत विचारला जातो पण माणूस खरंच हरवत चालला आहे का? या प्रश्नाचे उत्तर कधीच मिळत नाही.
मिळाले तर नक्की सांगा..!! कारण या प्रश्नत माणूस हरवत आहे का यापेक्षा माणूस संस्कार विसरत आहेत का? या प्रश्नाच्या उत्तरांची जास्त आज गरज आहे. स्वार्थीपणा हा माणसाचा संस्कार असू शकत नाही कारण स्वार्थीपणा हा माणसाचा स्वार्थी संस्कारांचा नव्हे तर आधीच्या पिढीने दिलेल्या संस्काराचा गणिताची गोळाबेरीज असते.
प्राचीन काळापासून संस्कार ही आपली जमेची बाजू आहे. आधुनिक परिस्थितीनुसार आपण त्यात बदल करीत आहोत आणि करत राहणार आहोत कारण परिवर्तन हा जगण्याचा मार्ग आहे. परिवर्तन जगण्यासाठी नव्हे तर जगात स्वतःला आत्मविश्वासाने उभे राहणे.
संस्काराची भाषा करावी किंवा व्याख्या करावी इतकी मोठी नाही तरीपण संस्कार या विषयावर लिहिताना खरच मी एक माणूस म्हणून जगत आहे का या प्रश्नाचे उत्तर मला नेहमी सकारात्मक मिळते नकारात्मकतेची चाहूल सतत आजूबाजूला असली तरी सकारात्मकता ही नेहमी मनाला बळ देते संस्कार हे या सकारात्मक तेतून मिळत असावे.
सकारात्मकता नेहमीच सकाळचा सूर्य टवटवीत फुले गळलेला परिजात फुललेली रात्र सुगंधीत झालेला परिसर आणि आजूबाजूने असलेली हिरवळ याच सकारात्मक तेतून न मनात निर्माण होत असावी... कारण संस्कार कितीही चांगले असले तरी नकारात्मक हे नेहमीच वरचढ होत असते.
काही क्षणांसाठी पण निसर्ग नियम हा प्रत्येकानंच लागू आहे. पानगळ झाले की नवीन पालवी येणारच आणि नवनिर्मितीची चाहूल लागणारच. संस्कार हे असेच असावे नकारात्मकतेचे पानगळ झाली की संस्कारा ची नवनिर्मिती आपल्यामध्ये होत असते.
मनाला आत्मविश्वासाने उभे
करणारे संस्कार
आत्मविश्वासाने शब्द निर्माण
करणारे संस्कार
संस्काराची शिदोरी म्हणजे
माणुसकी...!!!
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- "संस्कार फक्त माझे"
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका...
Thank you...!!
*************************************
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा