savitalote2021@bolgger.com

बुधवार, १७ नोव्हेंबर, २०२१

** मनी अंतर आल्यावर **kavita

      प्रेम कमी झाले की एक प्रकारचा अबोला निर्माण होतो. एक भावनिकदरी असलेले ऋणानुबंध यामध्ये निर्माण होते. एक व्यक्ती दुसरा व्यक्ती बद्दल असलेल्या प्रेमामुळे अबोला दूर करण्याचा प्रयत्न करण्याचा विचार करीत असते.
          पण त्याच्या मनामध्ये आलेल्या विरहामुळे त्या भावविश्वाततून आलेल्या भावनेवर ही कविता आहे. कविता स्वरचित स्वलिखित आहे आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका

     ****  मनी अंतर आल्यावर ****

बोलायचे ठरवले 
पण बोलताच येत नाही
मनी अंतर आल्यावर

ठरवते ओलावा असेल 
मनात 
त्याच्या...
पण मनच बोलू लागते 
माझे....
मनी अंतर आल्यावर

मग मी हि होते अबोल 
बोलते फक्त नभातील 
चंद्र-तारे आठवणींच्या 
हिंदोळ्यांवर...
रातराणीच्या साक्षीने 
करून पहावे का एकदा 
परत प्रयत्न....
पावले जातात नकळत 
भरभर....!!
पण शब्द मागे ठेवून 
मनी अंतर  आल्यावर 

शांतता चोहीकडे 
अशांत मनाला सोबत 
घेत, विश्रांती गरजेची
क्षणभर अनामिक ओढीकडे 
तरी ठरवलेल्या क्षणांवर 
मनी अंतर आल्यावर


             ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-***   मनी अंतर आल्यावर ****

        अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!

===========================


              When love diminishes, a kind of abola is formed.  An emotional bond is formed in this.  One person thinks of trying to get rid of Abola out of love for another person.
      But this poem is about the emotion that came out of that emotion due to the separation that came in his mind.  The poem is self-written. If you like it, don't forget to like and share

 **** When the money is gone ****

 Decided to speak
 But I can't speak
 When the money is gone

 Determines will be moisture
 In mind
 His ...
 But the mind begins to speak
 My ...
 When the money is gone

 Then I was Abol
 Speaks only nabhatil
 Moon-stars of memories
 On the swings ...
 By the witness of the nightingale
 Why try once
 Try again
 Steps are taken unknowingly
 All over .... !!
 But leaving the word behind
 When the money is gone

 Peace be upon you
 With a restless mind
 Needs rest
 Towards an anonymous pull for a moment
 Though at the appointed moments
 When the money is gone


            ✍️©️®️Savita Tukaram Lote

 ✍️©️®️Savita Tukaramji Lote
 Title: - When the money is gone 
Be sure to leave feedback in the comment box.  Don't forget to like and share if you like.
 Thank you .. !!
===========================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...