savitalote2021@bolgger.com

बुधवार, १ डिसेंबर, २०२१

Searching for existence* शोध अस्तित्वाचा मांडतांना **

      स्त्री विश्वातून घेतलेली ही भावना आहे. एक स्त्री म्हणून मला नेहमी एक प्रश्न पडतो की सर्वांनाच हा प्रश्न पडतो. विशेषतः स्त्री वर्गाला खरच आपण मुक्तपणे जगत असताना. स्वतंत्रपणे जगत असताना,कुठलेही बंधन नसताना, कधीतरी आपल्या मनामध्ये ह्या भावना येऊन जातात.

       अस्तित्व असते आपले आपण निर्माण केले तरी कधीकधी ते ही आपले अस्तित्व शोधू पाहतात. दैनंदिन आयुष्यातील क्षणांमध्ये त्या क्षण भावनेवर आधारित ही कविता आहे.

       कविता स्वरचित आहे. कविता स्वलिखित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद..!!


** शोध अस्तित्वाचा मांडतांना **

मनातील प्रश्नांनाही प्रश्न पडतात 

सगळे कसे थांबल्यासारखे वाटते 

सगळे चालू असताना 

सामोरे जाण्याचे मार्ग, सर्व खुले 

मागचे मार्ग बंद केलेले 

तरी पायात बेडी कशाची?

 कळतच नाही..

 सर्व मार्ग खुले असताना !

 मनाला काय हवे माहित नाही?

 मन इथेतिथे भटकंतीवर का?

 माहित नाही..!!

 गुंतणे तसे काहीच नाही 

पण स्तब्ध क्षण येतात 

येऊन - जाऊन तळपायाखाली 

काही क्षणांसाठी तरी चालताना 

सगळेच तात्पुरते 

सगळेच आपले 

सगळ्याच वाटा तात्पुरता 

काही क्षणासाठी फक्त 

चालणे आपले बाराखडीच्या 

नियमांप्रमाणे... 

डोळे पाऊस देत राहतात 

तळहातावरील रेषा पुसट होत राहतात 

नवीन स्पर्शाची भाषा 

समजून देतात 

तरी गुंतणे संपत नाही 

स्वतःच्या ओळखीची 

भाषा आपली नसते आपल्या 

अस्तित्वाचे गणित मागे पडत जातात 

आणि अस्तित्वाचा प्रश्नचिन्ह 

उभा राहतो कधीकधी... 

सर्वच वाट मोकळा असताना 

सतत थांबलासारखे वाटत राहते 

अस्तित्वाचे गणित मांडताना 

आठवणी मांडताना 

शोध अस्तित्वाचा मांडतांना..!!!

        ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- शोध अस्तित्वाचा मांडतांना

       अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!
===========================

          This is a feeling taken from the female universe.  As a woman always have a question that everyone has this question.  Especially to the female class when you really live freely.  While living independently, without any restrictions, sometimes these feelings come to our mind.

 Existence is what we create, but sometimes they try to find our existence.  It is a poem based on the emotion of the moment in everyday life.

 The poem is self-written.  The poem is self-written.  Don't forget to like and share if you like.  Be sure to leave your feedback in the comment box.  Thanks .. !!



* Searching for existence **


 Questions also come to mind

 How everyone seems to have stopped

 While everything is going on

 Ways to deal, all open

 Back lanes closed

 But what about the shackles on the feet?

 I don't know ..

 When all avenues are open!

 The mind does not know what it wants?

 Why is the mind wandering here and there?

 Don't know .. !!

 There is nothing wrong with that

 But there are still moments

 Come and go

 While walking for a few moments though

 Everything is temporary

 Everything is yours

 All contributions are temporary

 Just for a moment

 Walk your alphabet

 As a rule ...

 The eyes keep raining 

The lines on the palms 

of the hands keep getting blurred

 The language of the new touch

 Understand

 The engagement does not end there

 Of one's own identity

 The language is not yours

 The mathematics of existence are falling behind

 And question marks of existence

 Stands up sometimes ...

 When all is said and done

 Feeling we have 'Run out of gas' emotionally

 Presenting the mathematics of existence

 While reminiscing

 Searching for existence .. !!!

     #©️®️✍️🏻Savita Tukaram Lote

    Title: - ** Searching for                                            Existence**

         Please leave feedback in the comment box. If you like it, don't forget to like and share.

 Thank you .. !!

 =========================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...