savitalote2021@bolgger.com

रविवार, १९ डिसेंबर, २०२१

सहज सुचलंसुचले म्हणून प्रतिक्रिया एक कला

सहज सुचले म्हणून 🌹🌹

         
         आपल्याला नेमके कोणत्या वाटेवर चालवायचे आहे हे आपल्यालाच ठरवावे लागते आणि आपण ते ठरविते ही असतो. पण कधी कधी त्या वाटा इतक्या वेदनादायक असतात... त्रासदायक असतात की त्या वाटा नकोशा वाटतात. तरीही आपण चालत राहतो त्याच वाटेवर सुखाच्या पायवाटेसाठी.....
        फुलांचा प्रवास... फुलांचा सुगंध... प्रीतीचा प्रवास... स्वप्नांचा सुगंध.... आपल्याला हवा असते पण तो प्रवास कधी आपल्याही नकळत निघून जात असतो हे आपल्यालाही कळत नाही. 

         प्रवास सुखाच्या पायवाटेवरी ज्यावेळी काही कविता लेख किंवा इतर काही लेखन करताना  कितीतरी प्रश्न पडतात पण त्या प्रश्नांची उत्तरे कधी मिळतच नाही. वेगळे काय लिहावे काय सांगावे त्यापेक्षा वेगळ काय शिकता येईल....! या गोष्टीकडे सतत लक्ष असते. 
           शब्द ही अशी गोष्ट आहे ती सर्वांनाच स्वतःमध्ये योग्य पद्धतीने रुजविता येत नाही आणि रुजविले तर योग्य पद्धतीने मांडता येत नाही. कारण "शब्द मांडणे ही एक कला आहे."संवाद साधणे ही एक कला आहे....!!! ज्याला ती जमते तो त्या माध्यमातून आपले शब्द आपल्यापर्यंत पोहचवीत असतो. ती कला आपल्यापर्यंत पोहोचत असते. शब्दाची योग्य मांडणी करणे ही एक प्रतिभा आहे. संवाद साधणे ही एक कला आहे. पण ती कुणा बरोबर बोलत आहो यावर जास्त विचार करावा लागतो.

         कविता किंवा लेख लिहिताना संवाद खूप महत्वाचा असतो. शब्द खूप महत्त्वाचे असतात. शब्दातील गोडवा खूप महत्त्वाचा असतो.ज्या शब्दातून आपण काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत असतो तो विषय खूप महत्वाचा असतो. कारण कोणीही सहज काहीही लिहित नाही. त्यामागे काहीतरी कल्पना असते. प्रतिभा असते.
          शब्दबरोबर खेळणे हा त्यांचा छंद नसतो, आपल्यामध्ये असलेल्या प्रतिभेच्या जोरावर आपल्या सभोवती असणारे प्रश्न मांडीत असतो.

              प्रतिभेला कोणताही भेदभाव नाही. ती स्त्री पाहत नाही... ती पुरुष पाहत नाही. प्रतिभा ही त्यांच्यामध्ये रुजलेली असते. त्यांच्या मनामध्ये रुजलेली असते. शब्दांमध्ये रुजलेली असते.  म्हणून स्त्री-पुरुष हा भेदभाव न करता फक्त आपले मत व्यक्त करा. कारण हा निसर्ग नियम आहे.
          प्रतिभा ही कुणाचीही मक्तेदारी पाळत नाही मग तो पुरुषी अहंकार समोर असला तरी वा स्त्री अहंकार समोर असेल तरी. म्हणून प्रतिभा ही प्रतिभा आहे.... कला ही कला आहे.... शब्द हे शब्द आहे....प्रश्न हे प्रश्न आहे... जाणिवा ह्या जाणीव आहे... उत्तरांच्या अपेक्षेने आलेल्या..!
        शब्द माझे तुमचे एकच आहे. फक्त त्या शब्दांना  प्रतिभेच्या जोरावर वेगळ्या पद्धतीने मांडणी केली जाते.ते शब्द मनातील असतात असे नाही. आजूबाजूची परिस्थिती इतकी बदलत असते की त्यावर लिहावे की नाही हा प्रश्न सतत पडतो आणि ज्यांना तो प्रश्न पडत असतो तो त्याला सुचेल  त्या शब्दात तो आपले प्रश्न मांडत असतो.

          प्रश्नांची उत्तरे प्रत्येक वेळी मिळतातच असे नाही म्हणून प्रत्येक  वेळी शांतता पाळणे हा काही त्यावरचे उत्तर नव्हे आणि हे जर उत्तर असेल तर शब्द का मांडायचे हा ही या प्रतिभेला प्रश्न पडतो.
           

         आयुष्याचा प्रवास चालू असताना प्रश्नांची उत्तरे प्रत्येक वेळी मिळतातच असे नाही. म्हणून प्रत्येक वेळी शांतता पाळणे हा काही त्यावरचे उत्तर नव्हे आणि हे जर उत्तर असेल तर शब्द का मांडायचे हा ही या प्रतिभेला प्रश्न पडतो.

         प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात हे जरी मान्य केले तरी शब्दांना दोन बाजू असतात हे मी मान्य करत नाही. आपल्या बुद्धीला दोन बाजू असतात... हे मी मान्य करते.

             असो, शब्द वाढेल आणि शब्दाने शब्द अजून वाढेल कमेंट बॉक्समध्ये मधील..!!
          प्रतिक्रिया देणे ही सुद्धा एक प्रतिभा आहे. प्रतिक्रिया चांगली की वाईट, सकारात्मक की नकारात्मक या मुद्द्यावर न जाता प्रतिक्रिया दिली जाते हा खूप मोठा मुद्दा शब्द प्रतिभेला असतो. कारण आपण काय करीत आहोत ते करीत असताना योग्य पद्धतीवर आपली प्रतिभा आपले शब्द पावले टाकीत आहे का याचे उत्तर मात्र नक्की मिळते.

         कारण प्रतिसाद देणे किंवा प्रतिक्रिया देणे ही आपली पोचपावती असते. ती त्या व्यक्तीला नसून त्या प्रतिभेला पोचपावती  असते.... शब्द असतात. म्हणून कोणीही त्या प्रतिभेला कोणत्याही चेहऱ्याचा आरसा म्हणून त्या प्रतिभेला कमी लेखून त्यावर शब्दांची जुळवणूक करू नेका.

        शब्द हे आपले असतात. शब्दातील प्रश्न आपले असतात.... शब्दातील उत्तर आपले असतात.... शब्दातील कविता आपली असते.... शब्दातील लेख आपले असतात.... शब्दाची शक्ती आपले असतात. कारण शब्द हेच आपले जीवन आहे. अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षणा नंतर..!! 

      म्हणून आपल्या आयुष्यातील पायवाट कोणतीही असो, सुखाची असो की दुःखाची असो... सकारात्मकतेची असो कि नकारात्मकतेची असो.... आयुष्याची पायवाट फक्त अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षण या शब्दातून जाते. म्हणून स्वतःला समजून-उमजून व्यक्त करा...!!

         व्यक्त करता आले नाही तर व्यक्त करू नका केल्यास ती प्रतिक्रिया सकारात्मक कशी घ्यायची हे माहीत नसते. कारण प्रत्येकाजवळ प्रतिभा असते असे नाही आपले मन समजून घेण्याचे आपले शब्द समजून घेण्याची..... 

       समोरच्या व्यक्तीला हवी असते ती..! कारण प्रत्येक व्यक्ती हा वेगळा असतो; स्वतः स्वतःवर केलेल्या संस्कारासारखा निर्मळ प्रामाणिक पवित्र विश्वासू आणि शब्दाळू....🌹🌹!!
©️®️✍️🏻सविता तुकाराम लोटे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...