savitalote2021@bolgger.com

गुरुवार, २२ एप्रिल, २०२१

विरह

           भर वेगाने जीवनाची गाडी चालू राहते... ती गाडी आपल्यामध्ये एक चौकट  घालून  घेतात त्याच चौकटीमध्ये आयुष्याच्या शेवटचा टप्पा गाठावा लागत असतो . 
      अगदी श्वास  घेता आला नाही तरी अगदी प्रदीर्घ चौकट आपल्या भोवती गुंफली जातात. दिशा सोनेरी असतात की काटेरी कळत नाही. चौकट आपल्यालाच मागे ओढीत असते की पायांमधील शक्ती नाहीशी होतात . पुन्हा खेळ वादळ वारा वार्‍याशी. पुन्हा वणवा शब्दांशी ... पुन्हा नवीन खेळ मांडण्यासाठी धडपड आता जायचे कुठे?  सांजवारा गार गार येऊन  तेजेमय हळुवार फुंकर घालून जाते.

   अशा दिवसात कोणाला यायचे असेल तर ती येत नाही!  एक तर आपणच आपणच आपल्या मध्ये गुंतून जात असतो स्मृतीचे अंकुर आपल्यामध्ये गारवा निर्माण होऊ देत नाही ...'नवीन', विरह! 
            दुपार नको असते...  ते संध्याकाळ नको असते... ती नको असते पण का मनातील विरह नको नको म्हणते पर्यंत खुदकन हसवले जाते. जीवनात वादळी वार्‍यानांबरोबर वातावरणच का येत असतात. हृदयाने स्वप्न पाहिले...ते तुटल्यानंतर मन थरथरले. किती समजावे लागत आहे.  विचार मन बंदिस्त करीत आहे. विचारांमध्ये गुंतवून जाता आहे...तू निघून गेला...विचारामध्ये एकच मी काय साध्य केले... आणि मी काय वजा केले ... वजा तर जीवनाचे सुखद क्षण पण साध्य काय केले? गळून पडलेले स्वप्न ...मिटलेले डोळे आणि पाषाणा सारखे हदय!
     जीवनात वेळेने अशी परिस्थिती आणून ठेवली की त्यातून बाहेरही जाता येत नाही.त्या सोबत राहता ही येत नाही. जीवनात अंधारालाही ओळखता येत नाही असे क्षण विरहाने दिले. 
तहानलेल्या जीवाला ना पाणी आणि ना ओलावा ...अंधाराची सांजवेळी मनाला छळत असते.हेच विचारही नकोसे वाटत असतात समोर जनसागरा किनारी असला तरी वाळवंट मला साचलेले असते. सांजवारा ही नको वाटतं मावळतीचे क्षण वार्‍यासवे पळविले जात नाही मनाची दारे बंद केली जातात.विरहला... नाही? त्या सुखद आठवणी सोडून जातात! अवती भोवती गर्दी असतानाही मन एकटे असते.  सुकलेल्या कळ्या फुलांचे निश्वास टाकीत असते एकटे शांत!
अशातच विरहाचे चटके जास्त जाणवतात.
            विरह मनाला उजेड दाखवितच नाही तो मनाला त्या त्या गोष्टी घेऊन जात असते. एकही क्षण  तेथे गेल्याशिवाय दिवस जातच नाही. पहिली भेट मनाला छळत राहते.मनाचे सारे संदर्भ वेगळे होत  जातात . पण मनाला कुठे कळते सारेच संदर्भ! मागे पडत जाणारे संदर्भ. मागे पडत जाणारे संदर्भ. प्रत्येक क्षण समोर येतानी मन उरात भरून येतो... 
      मन गुंतत जातात .कुठेतरी नाही हळव्या क्षणांचे हिशोब मांडले जातात.तेव्हा असंख्य आठवणी ओळखीच्या वाटताना जुनेच चेहरे आपले वाटत नाही.
            वेळ कधीच कुणासाठी थांबत नसतो... विरह मनाला सोसावा लागतो. वेळ निघून गेल्यावर तो थांबेल असे समजायचे. विचार... फक्त काही वेळासाठी असतो. प्रत्येक क्षण प्रेम शोधत असते.
       जीवनात निर्माण करण्यासाठी पण कृष्णालाही राधेचा विरह सहन करावा लागला.
मीरा हे कृष्णाच्या प्रेमासाठी झुरत राहिली... 
       एक  पत्नीव्रत पती रामाला ही सीता चा विरह सहन करावाच लागला. सीतेच्या जीवनात सुख आले आणि नियतीने विरह लिहून दिला.               विरहात सारेच गळून जात नाही त्यामागे सर्वच सुखही असावे. हळुवार आपल्यामधील नयनाचे शब्द जपून ठेवले जातात. मनातील विरह मनात ठेवून आयुष्य घालविले. प्रेम काय असते...विरह काय असते... त्यांच्याकडे पाहिल्यावर कळत.
         मनातील थंडी नाहीशी होते. मनातील फुल नाहीसे होते. मनातील फुल नाहीसे होते. मनातील शब्द होतात .मनातील रिमझिम नाहीशी होते.वसंत वसंत राहत नाही. रेती वरील पाऊल खुणा, खुणा  राहत नाही. बागेतील आठवणी बागेत राहत नाही. 
          पायातील पैंजण रुणुझुणू  वाजत नाही. पावसाचे पाणी मनाला छळत असते .आपलेच घर आपले राहत नाही. फुलातील सुगंध सुगंधहीन होत जातात. भिंतीवर फक्त सुखद आठवणीचे संदर्भ उरलेले असतात. पण निस्तब्ध. उजेडाला अंधार नाहीसा करतो. ओलाव्याशी आपले नाते जुळविण्यासाठी अति ओलावा निर्माण करावा लागते. फक्त विरहाचे रंग नष्ट करण्यासाठी .
          क्षणात भास होतात तुझे रंगमय सूर आले पण ते क्षणिक भास असतात....त्या स्मृतीचा प्रवास मनात दाटून येतात. मन विरहाच्या वेदनेने असह्य कळा येतात. कळा शक्ती नाहीशी करतात खुणा पुसलेल्या असलेल्या असतात तू नाहीसे झालेला. 
         विरह मनाला रिकामा होऊ देत नाही. आसवांच्या सागरी फक्त नाते जुळविले जातात. विरहाचा किनारा गाठेपर्यंत हातातून वेळ निघून गेलेला असतो प्रीतीचे रंग नाहीसे झालेले असतात नात्यांची गुंफण हातात नसते. धुंद झालेली हवा झालेली हवा गारवा देतच नाही. हळवेपण मनातील अंतरंगातले दुवे नाहीसे होऊच देत नाही.
       एका फुलावर स्थिर झालेले मन आता एकरूप होऊच देत नाही. मनातील वाळवंटाचे जग अधिक वाळवंटी करून जातात . कितीतरी हिवाळे आले तरी प्रेमाची अनुभूती मिळणार नाही. अंकुरलेल्या मातीला माझा स्पर्श होणार नाही आणि झालास तर प्रेम फुलणार नाही. त्यात फक्त विरह निर्माण होईल. ओंजळीत आसवांचे घर आणि मनात सुखद आठवणीचे घर...दोघेही  आपली सीमारेषा सांभाळून जगत आहे जगत आहे ! त्यांचे लाड पुरवीत आहे .
          फाटलेल्या मनाला आसवांचे रंग चढवत आहे,भरवेगाने!
                     दि. 27.3.2008
            सविता तुकाराम लोटे 
(सर्व चित्रे हे गुगल वरून घेण्यात आलेली आहे)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...