savitalote2021@bolgger.com

गुरुवार, १७ मार्च, २०२२

रंगोत्सव (होळी)

          होळीचा सण म्हणजे अविश्वासावर विश्वासाची मात. होळीचा सण म्हणजे फुललेला वसंत आणि त्यात निसर्गाने आपले रूप बदललेले असते. रंग आयुष्यात उत्साह देणारा. चारही बाजूने रंगांची उधळण असते. त्याच पवित्र होळीच्या आगीमध्ये स्वतः मध्ये असणारे अवगुण टाकून त्या ठिकाणी गुणांचे रंगोत्सव येऊ द्या. हा संदेश देणारी  होळी हा सण ..!!!

        याच आशयातून कविता लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद...!!!
 

रंगोत्सव  (होळी)

जाळून टाकलेल्या अहंकाराच्या 
जागेला रंग देऊया उत्सवाचा 
जाळून टाकलेल्या अंधश्रद्धेला 
स्पर्श देऊया स्नेहाचा 
जाळून टाकलेला आपल्यातील 
मी पणाला नव रंगांनी रंगू या 
भिजूया, आपल्यातील कोरडेपणाला 
स्नेह बंधनाने 
घेऊ या आपणच आपल्याशी 
असलेल्या संघर्ष वाटेला 
हर्षाचा उत्सव करत 
जगण्याचे बळ देऊन टाकू या 
आपल्यातील अविश्वासाला 
पवित्र होळीमध्ये आणि त्या 
जागेवर बंध रेशमाचे  
उधळूया 
आसमंत यामध्ये रंग उत्सवाच्या प्रेमळ रंगोत्सवामध्ये...!!! 
          ✍️©️®️सविता तुकाराम लोटे 

©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- रंगोत्सव  (होळी)

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .





      Holi is a celebration of faith over disbelief.  Holi is a flowering spring in which nature changes its form.  Color invigorating in life.  There is a scattering of colors on all four sides.  In the fire of the same holy Holi, throw away the vices in yourself and let the color of virtues come to that place.  Holi is the festival that conveys this message .. !!!

 It is with this intention that I have tried to write poetry.  Don't forget to like and share if you like.  Thanks ... !!!


 Rangotsav (Holi)

 Of the burnt ego
 Let's color the place for the festival
 To the burned superstition
 Let's give a touch of affection
 Burned yours
 Let me paint the leaf with new colors
 Soak up your dryness
 Bonding affection
 Let's take it with you
 Feeling we have 'Run out of gas' emotionally
 Celebrating joy
 Let's give life strength
 To our disbelief
 In Holy Holi and that
 Bonded silk in place
 Let's waste
 In the loving festival of colors in the   sky festival ... !!!

             ✍️©️®️Savita Tukaram Lote

 ✍️©️®️Savita Tukaramji Lote
 Title: - Rangotsav (Holi)

         Awareness of your coming is your reaction.  Be sure to leave your feedback in the comment box and don't forget to like and share.

******************************************************************************


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...