savitalote2021@bolgger.com

बुधवार, २५ मे, २०२२

जगण्याची लढाई

      आयुष्याच्या डायरीमध्ये आपले काही स्वप्नं असतात. पण काही कारणास्तव ते मागे पडतात.अशावेळी मनाने हिम्मत कमी केलेली असते.वाटा बंद झालेल्या असतात. या परिस्थितीत आपण स्वतः स्वतःला एक सकारात्मक पद्धतीने मनाची ताकद वाढवून लढण्याची हिम्मत देणारी एक भावना!!
       याच भावविश्वात जाऊन ही कविता स्वरचित व स्वलिखित लिहिलेली आहे. एक सकारात्मक कविता.... एक मोटिवेशनल कविता.... एक माझी तुमची कविता आणि त्या प्रत्येक व्यक्तीची कविता जी जगण्याची लढाई लढत आहे.
        कविता कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा..!!❤🌹

*** जगण्याची लढाई ***

जगण्याची लढाई कदाचित 
स्वतः स्वतः सोबतच असावी 
कधी आपल्यातील इच्छांसोबत 
कधी आपल्यातील ध्येयांसोबत  
कधी आपल्यातील आपल्यासोबत...

लढाई आपलीच आपल्या 
जगण्याची आणि आपल्यातील मरणाची 
कधी पायाखालील जळत्या लालभडक 
कोळसांसोबत...!
कधी आपल्याच तुटलेल्या स्वप्नांसोबत 
राख झालेल्या 
स्वप्नांची राख उचलत.....

चला;
पावलांची मोजणी करूया 
लढाई अजून संपलेली नाहीच 
जगण्याची... 
राख तर स्वप्नांची झाली 
शरीराची नाही  
राख ध्येयांची झाली 
हिमंतीची नाही
राख फक्त काही वेळीची झाली....
अजून खूप वेळा हाती आहे....

राखेला तळ हाताच्या रेषाची 
पावती करू नका तर 
राखेला भस्म बनवा आपल्या 
जगण्याच्या लढाईची....
औषध बनवा 
आपल्यातील माणुसकीची 
औषध बनवा 
आपल्यातील माणुसकीची....!!

©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 
      आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका 



       Ayushachya diarymede aaple kahi dreamam asat.  Pana kahi karnastav te mage padat.  Or in the situation you automatically self-motivate a positive method, you have the strength, the courage, the courage to give a feeling!!
 Yach Bhavvishwat Jaun hi poetry is self-written and written by Lihileli.  A positive poem.
 Kavita kashi watli hi comment box middle nakki kava..!!❤🌹

 ***Jaganyachi fight ...

 Jaganyachi fight maybe
 auto self sobtch asawi
 Sometimes you wish
 Kadhi aaplyatil dhyeyansobat
 Kadhi aaplyatil aaplyasobat...

 Ladhai aaplich apalya
 Jaganyachi and Apalyatil Maranachi
 Kadhi PayKhalil Jatya Lalbhadak
 Kosoobat...!
 Kadhi aaplyach tutlelya dreamansobat
 ash jhalelya
 Dreamer ashes move.....

 walked;
 Pavlanchi Mojni Karuya
 Fight ajun sampleli nahich
 Jaganyachi...
 ash wet dreamer
 no body
 ash meditator
 don't hesitate
 Ash time kahi velichi jhali....
 Ajun Khoop vela hati ahe....

 Rakhela to Hatachya Reshachi
 Do not acknowledge
 Make Rakhela Bhasma Aaplya
 Jaganyachya Ladhaichi....
 make medicine
 aaplyatil manuskichi
 make medicine
 aaplyatil manuskichi

©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

    ©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
 Aaplya yanyachi janiv apalya reaction.  Please don't forget to like and share your feedback in the comment box.




(#motivation kavita positive kavita #life poem chalori Kavita.   *Jaganyachi fight ... )


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...