savitalote2021@bolgger.com

शुक्रवार, १ जुलै, २०२२

... जगून बघ ...

कविता स्वलिखित व स्वरचित आहे. कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका..!
       तुमच्या येण्याची जाणीव आपले मत विचार आहे. कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद...!!

... जगून बघ ...

माझ्यासारख जगून बघ 
हसतानाही डोळ्यात पाणी 
येऊ न देता हसून बघ 
दुःख मनात ठेवून 

शब्द मांडाव्या अशा भावना 
मनातील चोर कप्प्यात ठेवून बघ 
स्वप्नाच्या जगात एकदा 
वास्तव बघून बघ 

कधी एकटेपणाला सावरून 
स्वतः स्वतःची अपेक्षा ठेवून बघ 
आणि त्या सुखद आठवणींच्या 
क्षणी माझ्या दुःखासोबत स्वतःशी 
बोलून बघ...!

कधी कधी वास्तव परिस्थितीत 
मलाही घेऊन बघ आठवणीसोबत 
आठवते का? म्हणून एकदा 
रडून बघ

माझ्यासारखेच मागे सोडलेल्या 
आठवणी सोबत माझ्यासारखं 
जगून बघ 
एकदा हसतानांही डोळ्यात 
पाणी येऊ न देता हसून बघ !!❤

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

        आपल्या येण्याची जाणीव आपले कमेंट्स आहे. कविता कशी वाटली हे नक्की कळवा....धन्यवाद ❤!!


******************************************************************************

1 टिप्पणी:

Rushikesh Date म्हणाले...

छान कविता करता. कवितेतील विचार आणी मांडणी सुंदर. फक्त ब्लॉग ची मांडणी व्यवस्तिथ करा म्हणजे गुगल ऍडसन्स अप्रुवलं मिळेल.

मासिक बाई पण

*** मासिक बाईपण*** वेदनेच्या त्या दिवसात  आधार फक्त वेदनेचाच असतो  पूर्णत्वाच्या विचाराने  बाईपण जगत असते  वेदनेचा काय घेऊन बसले  मासिक धर्म...