"यंदाचा पाऊस सकारात्मक परिस्थितीचा"
यंदाचा पाऊस जास्तच झाला नयनातूनही आणि ढगातून सुद्धा. यंदाचा पाऊस आठवणींचा झाडांना चिंब भिजविणारा आणि मनालाही चिंब.
अश्रूंच्या सरीने भिजविणारा झाडांच्या फांदी - फांदी थेंबाथेंबांचा साठा आणि मनात आठवणींच्या आठवणींचा साठा..! नयनातील दवबिंदू चेहऱ्यावरच आणि झाडांच्या पानापानांवर येऊन गेलेल्या पावसाच्या थेंबांचे अस्तित्व अजूनही आहे.
मन ही शून्य झालेले आणि यंदाचा पाऊस जास्त झाला म्हणून मनही शून्यच...!
दवबिंदूं बरोबर स्पर्धा चालू माझी
यंदाच्या पावसाचा अंदाज लागतच
नव्हता मनाला कधी
नयनातून तर कधी ढगातून
हिरवळ चारही बाजूने, चारही दिशा हिरवळीने फुललेल्या, सौंदर्याची खाण निसर्गाने आपल्या सभोवती फुलविली. काही ठिकाणी हे सौंदर्य पावसाच्या पाण्याने वाहून सुद्धा नेले. तसेच यंदाचा पाऊस मनालाही नयनाद्वारे सर्व वाहून नेत आहे.
"दुःखाचे ओझे घेऊन जा." अशी प्रार्थना मी या पावसाजवळ करीत असते. पण पाऊस यंदाचा काहीच बोलत नाही.
किती नाट्यमय परिस्थिती आपल्या सभोवताली चालत असली तरी आपल्या आयुष्यातील नकारात्मकता वाहून जातच नाही. ती अधिक अधिकच गडद छायेखाली जात आहे. यंदाचा पाऊस सांगतो, सावधान !!विचाराचे थैमान संथपणे येऊ दे. कारण समोरच्या घडीला कोणते तुफान, ढगफुटी होणार आहे माहित नाही.
काहूर फक्त विचारांचा मांडण्यापेक्षा,
स्वकल्पनेच्या मांडण्यापेक्षा कृती कर या पावसाळ्यात. वाहू दे सर्व नयनातील पाऊस..! पुरासहित;भावनांचे भांडवल वासल्य न करता.
वाहू दे माझ्याजवळ मी घेऊन जाईल कुठेतरी दूर काळोखात. ते कधीही दिसणार नाही.
यंदाचा पाऊस पाठीराखा. माझा माझ्या विचारांना हिरवळीत फुलविण्याच्या प्रयत्न करणारा. न फुललेल्या कळीला बळ देणारा. मनाचे घागर रिकामा करणारा, ओल्या मातीचा सुगंधी चैतन्य पुरविणारा यंदाचा पाऊस..!❤
यंदाचा पाऊस वाहणारा, यंदाचा पाऊस घेऊन जाणारा अंधकार, स्वार्थ, स्वार्थी बुद्धिमत्ता आणि नकारात्मकतेची ओंजळ. यंदाचा पाऊस हसवणारा आहे. मनसोक्त चिंब भिजवून मनाला त्याच्या माझा प्रवास नवीन चालू होणार आहे.
कारण आमचे नातेच अलौकिक.त्याला मला न समजणारे. तरीही दरवर्षी आला की मनाला चिंब भिजवतो आठवणी आठवणींचा थेंबथेंब ओठांवर येतोच. तो आला की सौंदर्य फुलवितो चोहीकडे आणि वादळही. तरीही आवडणारा..! यंदाचा पाऊस.
माझ्या नयनातील पाऊस स्वजवळ ठेवून, गार वाऱ्यासोबत थंडी उबदार वातावरण तयार करणारा सकारात्मक....!
वाहू ते सर्व तुझे विचार
तुझ्या आठवणी तुझे गेलेली वेळ
अस्तित्वात नसलेले स्वप्न
राहू दे आता
नयनाच्या कड्या ओल्या
होऊ देणे
आता चल
वाहत्या पाण्याबरोबर
मनसोक्त खळखळाट करत
चैतन्य फुलव
मनात....!💕😀
वेली,फुले,फळे आणि झाडे नवीन फुलविणारा, नवीन हिरवळ श्रावणातील, नवीन आगमन, नवीन सौंदर्याची नवीन पहाट नवीन सूर्योदयाबरोबर आणि नवीन शब्द प्रतिभा नवीन सकारात्मक शक्तीच्या साक्षीने....!
फुललेले प्रत्येक शब्द हे सकारात्मक. शब्दांचा पाऊस घेऊन. सुखाची चाहूल सोबत. मनाला मनसोक्त फुलविण्यासाठी यंदाचा पाऊस.
मनातील स्वप्न फुलविणारा... आकाशी इंद्रधनुष्य निर्माण करणारा.... सप्तरंगाची उधळण तसेच रंगहीन झालेले क्षणात रंग भरणारा यंदाचा पाऊस.
हसरा यंदाचा पाऊस. माझा तुमच्या आयुष्यारेषेला नवीन रूपरेषा देणारा.
परिस्थिती बदलते
परिस्थिती बदलावी लागते
परिस्थिती हाताळावी लागते
हे सांगणारा यंदाचा पाऊस
घेऊन आला
नवीन शब्दची
रांगोळी....
क्षितिजापलीकडे स्वप्नांची..!🌹❤
पुरातन स्थापत्यकलेचा नमुना जसा कधीही जुना होत नाही. त्यातील सुंदर सौंदर्य हे वर्षानुवर्ष नवीनतम होत जाते तसेच यंदाचा पाऊस. हा नवीन कलेला जरी मनमोकळेप्रमाणे मनात रुजू पाहत आहे. तसेच जुनेही ठेवत आहे. जे चांगले ते आपले .....!! हे सांगणारा यंदाचा पाऊस.
चैतन्य फुलविले फुलवित राहते
मन मोकळा दवबिंदू सोबत
फुललेला गुलाब
आळवाच्या पानावर अलगद
विसावा घेणार
तुळशीला ओले चिंब करून
हवेबरोबर सुगंध
पसरविणारा
फुललेल्या वेली रंगबिरंगी फुलांचा वर्षाव आपला नयनांना आणि सोबत चाफाही फुललेला. फुलपाखरांसोबत मनसोक्त मस्ती करणारा यंदाचा पाऊस...!
खूप काय देणारा आणि घेऊन जाणारा. कोवळ्या पानांच्या रानात सुखाचे पहाट सूर्योदयाच्या किरणासोबत स्पर्धा करून जिंकणारा यंदाचा पाऊस. नवीन संदेश देतो पंखात बळ येऊ द्या ...!!
फुलपाखरासारखे व्हा. कारण त्याचे रूप अनेक संकटांना संघर्षाला समोर जाऊन आलेले आहे. आयुष्यही असेच आहे. काटासोबत फुललेला गुलाब आपल्याला सुंदर दिसतो पण तोही काट्याबरोबरच फुलतो हे सत्य नाकारता येत नाही.
कारल्याला कारलेच लागले तर चांगले जर त्याला काकडी लागली तर कडूच असते आणि त्याचा कुणालाही फायदा नाही. कडू ते कडूच असते. कधी कधी ते औषधी रूप होते पण जास्त वेळ ते टाकूनच दिला जाते. आयुष्यही तसेच आहे नकारात्मकतेच्या फळासोबत द्वेष स्वार्थी प्रवृत्ती फक्त वाढत जाते आणि द्वंद निर्माण होते हे सांगणारा यंदाचा पाऊस सकारात्मकतेचे फुल उमलू द्या मनात स्वतःसाठी ही आणि इतरांसाठी ही हे सांगणारा सत्य सांगणारा यंदाचा पाऊस.
इंद्रधनुष्याच्या रंगासोबत रंगांची
उधळण अंगणात रांगोळी
सजते दारोदारी
हिरवळीच्या स्वरूपात
नवजीवन फुलविते
मातीशिवाय...
कुठेतरी आडोशाला
वाळलेली झाडे ही पालवी
घेऊन हसतात
गवताचे इवलेसे रूप
फुलांनी बहरून येते
आयुष्य सुगंधित करून
यंदाचा पाऊस घेऊन जातो
खूप काही आठवणी
देऊन जातो
खूप काही सुख..!💕
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका...!
======❤❤❤❤❤❤❤❤=====
This year's rain ** ❤
"This year's rain is a positive situation"
This year's rain was more from Nayan and also from clouds. This year's rain has soaked the memories of the trees and also the mind.
Branches of trees soaked with tears - a stock of drops of branches and a stock of memories in the mind..! The raindrops still exist on the dewy face of Nayan and on the leaves of the trees.
The mind has become empty and because of this year's rain, the mind is also empty...!
My competition with dew points is on
This year's rain needs to be predicted
Never mind
From the sky and sometimes from the cloud
Greenery on all sides, blooming with greenery in all directions, nature has blossomed a mine of beauty around us. In some places this beauty was washed away by rain water. Also, this year's rain is carrying everything through Nayana to the mind.
"Carry the burden of sorrow." I am praying like this near this rain. But the rain does not say anything this year.
No matter how many dramatic situations are going on around us, the negativity in our lives does not wash away. It's getting darker and darker. This year's rain says, be careful!! Let the thought come slowly. Because we don't know what kind of storm, cloudburst is going to happen in the next hour.
Rather than simply presenting ideas,
In this rainy season, act instead of imagining. Let all the rain in Nayan flow..! Including the flood; without capitalizing on emotions.
Let it flow to me I'll take it somewhere far away in the dark. It will never be seen.
Back this year's rain. Trying to make my thoughts bloom in greenery. Stimulating the unblossomed bud. Emptying the jar of the mind, the fragrant spirit of wet soil...
This year's rain is falling, this year's rain is carrying darkness, selfishness, selfish intelligence and flood of negativity. This year's rain is laughable. My journey is going to start anew after soaking in the heart.
Because our relationship is supernatural. He doesn't understand me. Still, every year when it comes, it soaks the mind, memories come drop by drop to the lips. When he comes, beauty blooms everywhere and storms too. Still likeable..! This year's rain.
Keeping the rain in my sight, creating a cool and warm atmosphere with a cool breeze....!
Let all your thoughts flow
Your memories are your past
A dream that doesn't exist
Let it be now
Nayana's edges are wet
let happen
Come on now
with running water
Chatting happily
Chaitanya Fulva
In mind....!💕😀
Vines, flowers, fruits and trees with new blossoms, new greenery in harvest, new advent, new dawn of new beauty with new sunrise and new word talent witnessing new positive power....!
Every word in bloom is positive. With rain of words. With pleasure. Rain this year to make the mind happy.
This year's rain that blossoms the dream of the mind... Creates the azure rainbow.... The splash of seven colors as well as color in the colorless moment.
Hasra this year's rain. Mine will give new contours to your life line.
Circumstances change
The situation has to change
The situation has to be dealt with
This year's rain is telling
brought
of the new word
Rangoli....
Dreams beyond the horizon..!🌹❤
An example of ancient architecture never gets old. The beautiful beauty of it gets updated every year and so does this year's rain. This new art is trying to penetrate the mind like an open mind. Also keeping the old one. What is good is yours...!! This year's rain is telling.
Chaitanya continues to flourish
Mind free with Dew Bindu
A blooming rose
Isolated on lime leaf
Will take rest
Finely chop the basil
Scent with the air
spreader
Blooming vines are showered with colorful flowers and the chaffa is also in full bloom. This year's rain is having fun with butterflies...!
Very giver and taker. The dawn of happiness in the forest of young leaves Competing with the rays of the rising sun, this rain wins. Gives a new message Let the strength in the wings...!!
Be like a butterfly. Because its form has faced many crises and conflicts. Life is like that too. A rose that blooms with a thorn looks beautiful to us, but we cannot deny the fact that it also blooms with a thorn.
It is good if a person gets a cucumber, but it is bitter and it is of no use to anyone. Bitter is bitter. Sometimes it is a medicinal form but most of the time it is discarded. Life is the same with the fruits of negativity, hatred and selfish tendencies only increase and create discord. This year's rain tells the flower of positivity.
Colors with the colors of the rainbow
Rangoli in Udhal Angan
Decorated door
In the form of greenery
New life blooms
Without soil...
Somewhere in Adosha
Palvi is dried trees
They laugh with it
Grassy form
Blooms with flowers
By perfuming life
This year's rain takes it
So many memories
gives
A lot of happiness..!💕
✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
Your reaction to the awareness of your arrival. Do leave your feedback in the comment box and don't forget to like and share...!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा