savitalote2021@bolgger.com

शनिवार, २ जुलै, २०२२

सोबत नसण्याची

       जीवनात आठवणी जगण्याचा नवीन मार्ग दाखवीतात.   कारण ह्याच आठवणी आपल्या अनुभवावर अवलंबून असतात. म्हणून अनुभव आणि आठवणी ह्या दोन्ही सोबतच असतात.
        
          प्रियसी किंवा प्रियकर प्रेमविरहा विरहाच्या दुःखातून जात असतो. त्या भाव विश्वातून ही कविता लिहिली गेलेली आहे. कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपले मत नक्की कळवा आणि माझ्या ब्लॉग भेट द्या...!!!

       **** सोबत नसण्याची*****

अंगण ओलावून गेले तुझ्या 
आठवणींच्या पावसाने 
पावलोपावली सोबत होती 
ओला तळपायांच्या 
आकृतीसारखी 

आठवण आणि आठवणी आता 
फक्त सोबत असण्याच्या  
आता सोबत नसण्याच्या 
दुःखाच्या...!!
चालावे वाटते अजूनही 
शिल्लक राहावे वाटते 
दवबिंदूसारखे 

नवीन रूप पांघरावे वाटते 
सोबत घालविलेले क्षण 
विसरून ....
बेधुंद ओलेचिंब भिजावे आता 
सोबत असलेल्या माझ्याच 
माझ्यातील आत्मविश्वासाबरोबरच 

नको ती सोबत आठवणींची 
नको ती सोबत नसलेल्या स्पर्शाची 
नको ती सोबत तुझ्यातील अहंकाराची 
नको ती सोबत माझ्यातील आठवणींची 

सोबत फक्त 
माझी माझ्याशी 
आतातरी.... 
सोबतीचा स्पर्श फक्त 
माझ्याच पावलांच्या 
आकृतीसोबत....!!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
              आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका...!! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...