savitalote2021@bolgger.com

शुक्रवार, २ सप्टेंबर, २०२२

नीट



         स्त्री ही कितीही उच्च पदावर गेली असली तरीही तिला संघर्ष करावाच लागतो. आजूबाजूची परिस्थिती कितीही पोषक असली तरीही स्त्रीयत्त्वाचे काही नुकसान असतात ते सहन करावेच लागतात.
      अशाच स्त्री विश्वातून ही कविता..!" नीट ", नीट राहत जा आता, तू मोठी झाली आहे आता या शब्दात सामावलेली आहे. स्त्री हे फक्त स्त्रीच नसते तिला अनेक रूपे असतात त्यातलेच एकरूप हे सांगण्याचा प्रयत्न करतो.
     त्या समाज व्यवस्थेला (पुरुषप्रधान) तुम्ही आता मोठा झाला आहात. तू ही नीट राहत जा आता ....!
    कविता स्वलिखित व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.धन्यवाद...!

.... नीट......

नीट राहत जा आता 
शरीराने मोठी झाली आहे आता 
मानसिक स्तरावरही मोठी झाली आहे आता बालिशपणा खूप झाला आता 
नीट राहत जा आता 

नीट राहत जा आता 
बालिशपणाचा इतरांना त्रास होतो आता  
तुझ्याकडील नजरा बदलला आहे आता 
तुझा बालिशपणा खटकतो आहे आता 

काय समजावे काय नाही 
त्यापेक्षा काय करू नये 
हे सांगण्याचा जास्त प्रयत्न आता 
तू मोठी झाली आहे 
नीट राहत जा आता

पण मी असते आपल्याच विश्वात 
मनसोक्त हसत खेळत इतरांच्या 
दुःखामध्ये दुःख आणि सुखात सुख 
मानणारे माझे मन 
तरीही इतरांच्या नजरा छळतात आता 
नीट राहत जा आता 
मोठी झाली आहे आता 

तसे पाहता शारीरिक स्तरावर खूप 
मोठी झाले कधीचीच 
नैसर्गिक स्तरावरीही  
खूप लहान वयात....
म्हणून आता थोडा बालिशपणा 
नीट राहत जा आता 
तू मोठी झाली आहे आता 

विचाराने शरीराने मनाने शब्दांनी  
विश्वासाच्या नात्यानेही तरीही 
बालिशपणा छळतो इतरांना तुझा खेळकरपणावर प्रश्नचिन्ह असतात 
तुझ्या वायफळ निरर्थक गोष्टीवर 
चर्चा खूप असते तुझी 
पण त्यांच्या नजरेच्या विचारांशी 
बोलणे तू टाळते सतत म्हणून 
तू नीट राहत जा ....

समोरच्यांचे डोळे त्यांच्या मनातील 
भावना त्यांचे विचार 
इतकी ही बालिश नाही 
माझे मन म्हणूनच हा 
विचारांच्या प्रश्नचिन्हांवरचे उत्तर माझ्या स्वभावाचे 
नीट राहत जा आता 
मोठी झाली आहे आता 

छक्के पंजे माहित नाही मला कदाचित कधीकधी मी ही वापरते ते 
पण माझ्या सुरक्षिततेसाठी क्षणोक्षणी
इतरांच्याही सुरक्षिततेसाठी 
निसर्गाने दिलेल्या 
स्वातंत्र्याचा उपयोग घेते 
पण माझ्या माझ्यातील 
स्त्रीयतवाला मर्यादित 
यशाच्या पायरीवर नेताना 
नीट राहत जा आता 
तू मोठी झाली आहे आता 

आधुनिकतेच्या महाविकासाच्या गाथेमध्ये स्वतःची छाप स्वतंत्रपणे 
मांडणारी मी आता 
नको वाटते संघर्ष 
नको वाटते इतरांशी 
शब्दाला शब्द मिळवणे 
माहित आहे मला 
तोही त्याच्या मानसिकतेने चालतो 
पण त्यातही अपवाद असतात 
खूपदा....

कारण त्यांनाही नीट चालावे लागते 
तेही मोठे झाले आहे आता 
त्यांनाही संघर्ष आहेत आता 
म्हणून सर्वच नीट चालू  
सर्वच मोठे झालो आहे आता 
आपापल्या परीने बालिशपणा 
करत राहू ...
आयुष्याच्या अंतिम प्रवासापर्यंत
हसत आणि हसवत

नीट राहत जा  आता 
तू मोठी झाली आहे आता


      ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

     आपल्या येण्याची जाणीव आपली प्रतिक्रिया होय. कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर नोंदवा. काही चुकल्यास तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा..! धन्यवाद...!!

--------------------------------------------------------------------------

        No matter how high a woman rises, she has to struggle.  No matter how favorable the surrounding conditions, femininity has certain disadvantages that have to be endured.
        This poem from such a female universe contains the words.  He tries to say that woman is not only a woman, she has many forms.
        You have grown up with that social system (masculine).  You live well now....!
       The poem is self-written and composed.  If you like it don't forget to like and share.Thanks...!

 ....well......


Be well now
 The body has grown up now
 I have grown up on the mental level too, now my childishness has become too much
 Be well now

 Be well now
 Childishness bothers others now
 Your eyes have changed now
 Your childishness is hurting now

 What to understand or not
 What not to do instead
 Too much effort to say this now
 you have grown up
 Be well now

 But I am in my own world
 Laughing heartily and playing with others
 Sorrow in sorrow and joy in joy
 My mind that believes
 Still the eyes of others torture now
 Be well now
 It has grown up now

 So much so on a physical level
 Never grew up
 Even at the natural level
 At a very young age...
 So now a bit childish
 Be well now
 You are grown up now

 With thought, body, mind, words
 Even as a relationship of faith
 Childishness torments others questioning your playfulness
 On your waffle nonsense
 You talk a lot
 But with the thoughts of their eyes
 As you constantly avoid talking
 Stay well...

 The eyes of others are in their minds
 feelings their thoughts
 It is not so childish
 This is my mind
 The answer to the question marks of thought is my nature
 Be well now
 It has grown up now

 I don't know about six claws, maybe I use this one sometimes
 But moment by moment for my safety
 For the safety of others too
 Given by nature
 Takes advantage of freedom
 But in my me
 Limited to femininity
 Leading the way to success
 Be well now
 You are grown up now

 In the saga of the great development of modernity, independently imprints itself
 Now I am the one presenting
 Don't want to fight
 Don't want to be with others
 Getting word for word
 i know
 He too is driven by his mentality
 But there are exceptions
 very often

 Because they also have to walk properly
 It's grown up now
 They also have struggles now
 So everything went well
 All grown up now
 Childishness in its own right
 keep doing...
 Until the final journey of life
 Laughing and laughing

 Be well now
 She has grown up now..!!

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

        Your awareness of coming is your response.  Do register your opinion in the comment box.  If something is wrong, let me know in the comment box..!  Thank you...!!

====❤❤❤❤❤=======❤❤❤❤=============================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...