कविता स्त्री सुरक्षिततेबद्दल आहे. आपण स्त्रीच्या रूपाची पूजा करतो आणि त्याच स्त्रीवर अन्याय सुद्धा होत आहे. समाजाचे हे दोन रूप सत्य कोणाला मानावे हे माझ्या मनाला बुद्धिमत्तेला पटतच नाही आहे.
कारण आज समाजाची स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन सतत बदलत आहे. "व्यक्ती तितक्या प्रवृत्ती," नुसार आपण याला घेऊ शकतो. तरी पण समाजामध्ये स्त्रियांवर होणारा अन्याय वाढतच आहे... हे इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, सोशल मीडिया त्यावर दिसतच आहे. पण का? या प्रश्नाचे उत्तरही न मिळणारेच.
याच भावविश्वातून ही कविता. कविता स्वलिखित व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आपले मत कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा .धन्यवाद...!!
***भरारी***
वाट पाहत राहावे
असे काहीच नाही
विश्वासाच्या धाग्यावर आता फक्त
विश्वासच हवा आहे
तुटलेल्या शब्दांना आता
स्वाभिमानाची जोड हवी आहे
अस्तित्वाच्या पंखावर आता
उंच भरारी हवी आहे
स्त्री म्हणून सुरक्षितता हा शब्द
नको आहे प्रत्यक्षात ते
अप्रत्यक्षरीत्या का होईना
दिसायला हवे आहे
आता हवी आहे
शक्ती राक्षसाला पायदळी
तुडविण्याची...
आणि हवी आहे
कायद्याची अंमलबजावणी,
श्रृंगाराची भाषा
खूप झाली कागदावर
सुरक्षिततेच्या गोष्टीचे खूप
झाले प्रयोग ..
आता सत्यात हवे आहे
कारण स्त्री सुरक्षित तरच
समाज सुरक्षित
संस्कृती सुरक्षित
धर्म सुरक्षित
आणि जगण्याची भाषा ही सुरक्षित
आता हवी आहे
मला सुरक्षित उंच गगन
भरारी .....!💢
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या येण्याची जाणीव तुमच्या प्रतिक्रिया होय. खालील कमेंट बॉक्समध्ये तुमचे मत जरूर नोंदवा. धन्यवाद!!
============================!
The poem is about women's safety. We worship the form of a woman and injustice is being done to the same woman. I do not understand who should accept these two forms of society as truth.
Because today society's attitude towards women is constantly changing. We can take it as "individual as inclined." However, injustice against women is increasing in the society... This is visible in electronic media, print media, social media. But why? This question will not be answered.
This poem is from this spirit. The poem is self-written and composed. If you like then please like and share your opinion in the comment box. Thank you...!!
***full***
**full**
Keep waiting
There is nothing like that
Now only on the thread of faith
Faith is all that is needed
Now to the broken words
Self-respect needs to be added
Now on the wings of existence
Need a high rise
The word security as a woman
Don't really want it
At least indirectly
should be seen
Want it now
Pedestrian power demon
trample...
And want
law enforcement,
The language of makeup
Too much on paper
A lot of safety stuff
Experiment done..
Now in truth
Because only if the woman is safe
Community safe
culture safe
Religion safe
And the language of survival is safe
Want it now
High heaven safe me
Bharari .....!💢
✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
If you like the poem, don't forget to like and share. Your awareness of coming is your reaction. Do share your opinion in the comment box below. Thank you!!
Google pic
(स्त्रियांवरील कविता, स्त्री कविता, स्त्री मराठी कविता, आयुष्य कविता, सामाजिक कविता, स्त्री सुरक्षिततेची कविता, स्त्री भावविश्वातील कविता, स्त्रियांचे भाव विश्व ,स्त्री सुरक्षितेबद्दलच्या कविता.)
(Poems on Women, Women Poems, Women Marathi Poems, Life Poems, Social Poems, Women Safety Poems, Women Bhav Vishwa Poems, Women Bhav Vishwa, Women Safety Poems.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा