savitalote2021@bolgger.com

सोमवार, १२ सप्टेंबर, २०२२

..... why wait ....थांबायच का ....

       
        प्रियकर प्रियसीचा हा संवाद पण कितीतरी गोष्टी सांगून जातो. मर्यादित आयुष्य फक्त स्त्रियांचेच असते असे नाही संस्कार नावाची गोष्ट समोरच्या ही व्यक्तीच असते हे विसरू नये. ह्या भावविश्वातून घेतलेली आहे. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

 .....थांबायच का ....

खूप दिवस झाले तुझे बोलणे 
ऐकलेच नाही तुझ्या ओठांची भाषा 
आता ऐकू येत नाही तू किती दिवस 
झाले हात हातात घेतलाच नाही 

किती दिवस झाले फुल माळलेच नाही 
गवती फुलाचे केसात 
तुझे बोलणे आता माझ्यासाठी नसतेच मुळे हातात हात घेत हळूच जाणारा 
तुझा हात कमरे भोवती आता सतत 
खिशातच असतो 

सांग ना काय झाले डावा हात फक्त मागेच का? इवलेसे गवती फुल खिशातच का  
बोलण्याचा सूर आता बदलल्या 
बदलल्यासारखा का वाटतो 
तुझे बोलके डोळे आता पाणीदार का होतात सांग ना कळतच नाही 

हातात हात घेत कुठेतरी बस क्षितिजाच्या पलीकडे एकटेच नजर खेळवत बोलू लागतो काहीच नाही, परत तोच शब्द काहीच नाही. शब्दांचा खेळ मांडता येत नाही 
कधीच म्हणून तो बोलून जातो 

थांबायचे का? थांबायचेच पण का..
 नाही उत्तर! माझ्याकडे परत एकटक नजरेला नजर भिडवत थांबायचे 
बरं थांबायचे पण का 
पुरुष आहे म्हणून.. मर्यादित चौकटीत राहणारा!! म्हणून थांबायचे 

गालावर अश्रूंचा महापूर त्याच्याही माझ्याही बर थांबायचे इथेच तुझ्या माझ्या प्रेमासाठी तुझ्या पुरुषार्थ.... तुझ्या समाधानासाठी माझ्या स्त्रीत्वासाठी...!!! थांबायच.

    ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

             आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर धन्यवाद..!!


=============================


              This dialogue between lover and beloved tells a lot of things.  Don't forget that the limited life is not only for women but the thing called Sanskar is the person in front of you.  It is taken from this sentiment.  The poem is handwritten and composed.  Don't forget to like and share if you like.

        ..... why wait ....

 It's been a long time since you spoke
 I have not heard the language of your lips
 Can't hear you for a long time
 Did not take hand in hand

 It's been a long time since the flower was planted
 In the hair of the grass flower
 Your talk is not for me now, I will walk slowly holding hands
 Your arm around the waist now constantly
 It is in the pocket

 Tell me what happened, why is the left hand only behind?  Why is this grass flower in your pocket?
 The tone of speech has changed now
 Why does it feel like a change?
 I don't know why your eloquent eyes are getting watery now

 Holding hands somewhere across the horizon of a bus alone, looking alone and talking, there is nothing, again the same words are nothing.  No pun intended
 He goes on talking like never

 Do you want to wait?  Why wait..
 No answer!  He used to stare back at me
 Well, why wait?
 As a man.. living in a limited frame!!  So stop

 A deluge of tears on his cheeks, he and I used to stop here for your love for me, for your manhood, for your satisfaction, for my femininity...!!!  Just wait.

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lotte

 Your awareness of coming is your reaction.  Thank you for your opinion in the comment box..!!

=============================



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...