savitalote2021@bolgger.com

सोमवार, १२ डिसेंबर, २०२२

** आठवणींचा खेळ ****

**** आठवणींचा खेळ ****

चल विश्रांती घेऊया 
थोडी आठवणींच्या 
ओळखींमधून 

शब्दांच्या हिंदोळ्यांवर 
न खेळता खेळूया 
खेळ अबोलपणाचा 

माझा तू माझ्याच 
आठवणींमध्ये बरा 
चल परत खेळ खेळूया 

पुस्तकातील पत्रांचा आणि 
जपून ठेवूया ते 
आठवणींच्या स्वरूपात 

सुगंधही वाळलेल्या 
फुलांसोबत चल 
विश्रांती घेऊया 
थोडी....!

        ©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा.

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

स्त्री महिला दिनविशेष

स्त्री स्वातंत्र्याच्या गोष्टी करता करता स्त्री बंदिस्त होत चालली आहे स्वखुशीने !! हे आता प्रकर्षाने जाणून येत आहे. स्त्रियांवर होणाऱ्या अत्...