**** साक्षी ****
थंडीची लाट आणि धुक्याची
चद्दर साक्षी आहे
आपल्या नात्याला
रुजविण्यासाठी
शांतता मनातील बेभान
हसूची साक्षा आहे
काळोखातील चंद्र तारे सोबत
गार
वारा सुद्धा,
मन अजूनही चालत जाते
त्याच वाटेवर
शांत निरागस होत
अंगावर धुक्याची चद्दर घेत
पण आता एकटीच..!
सोबतीला आठवणींचा
पाऊस आणि तुझे अस्पष्ट
बोल ..
हसऱ्या नयनांचे
थरथरत्या ओठांचे थंडीची
लाट आणि
धुक्याची चद्दर साक्षी आहे
अजूनही...!!
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
=============================
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा