savitalote2021@bolgger.com

गुरुवार, ३१ मार्च, २०२२

.कविता माझी....

.....कविता माझी....

 कविता माझी 
माझ्या शब्दांची 
अहंकाराच्या सावलीला 
अंधकारात सोडून देणारी  

कविता माझी 
माझ्या हुंदक्यांशी
घालमेल सततची संवादाशी
अगदी माझ्याच उजेडाची 
अलीकडील पलीकडील  

कविता माझी 
भेटत राहते 
आठवणींच्या झुल्यावर 
अगदी आनंदी प्रेमळ 
हसरी दुःखी व्याकुळ
झालेले माझ्याच 
संवादाशी 

कविता माझी 
माझी कविता 
कविता माझ्याशी 
माझ्याच विश्वशांतीची...!!! 
   
       ✍️©️®️सविता तुकाराम लोटे 

©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- ***** कविता माझी....  *****

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

मासिक बाई पण

*** मासिक बाईपण*** वेदनेच्या त्या दिवसात  आधार फक्त वेदनेचाच असतो  पूर्णत्वाच्या विचाराने  बाईपण जगत असते  वेदनेचा काय घेऊन बसले  मासिक धर्म...