savitalote2021@bolgger.com

मंगळवार, २४ जानेवारी, २०२३

**परिस्थिती*** "


***परिस्थिती***

 "मनाला हळूच चाहूल उरल्या 
  सुरला क्षणांची !!"
              परिस्थिती हा शब्द प्रत्येकाच्या आयुष्याला नवीन वळण देत असते. परिस्थिती हाता बाहेर गेली की परिस्थितीवर मात करता येईल की नाही माहित नसते. परिस्थिती हातात असली की परिस्थिती सोबत चालता येईल का माहित नसते. शब्द कमी पडतात, परिस्थिती हातातून निघून गेली की!!
        नवीन नवीन पालवी औपचारिक अनौपचारिकपणे फुलत असतात. पण यंत्र यांत्रिक मानवासारखे रस्त्यावरून जो सावरला त्याला मग झालेल्या थेंबांची किंमत हळुवारपणे सुकलेल्या फुलांसारखे सुगंधही होऊन कसरत करावी लागते.
        परिस्थिती प्रवाह ओला आणि कठोर करीत जाते नव्याने कुठे काही मिळाले की पुन्हा नव्याने वादळ निर्माण करीत जाते तर या उलट चांगली परिस्थिती मनाला आनंदी करून जाते.          खचलेल्या मनाला उध्वस्त करत जाते. मग तो कुठलाच नसतो. त्याला काहीही कळत नाही. नव्याने परत नव्याने उभे व्हावे असे परिस्थितीने उध्वस्त झालेले परत परत नव्याने उभे होते.               कारण आयुष्याने इतके वादळ सहन केलेले असते की प्रत्येक क्षण हा उद्ध्वस्त क्षणापासूनच चालू होतो असे वाटत जाते. जिज्ञासा नावाची गोष्ट कुठेतरी नजरेआड होत जाते. तरीही परिस्थितीवर मात करत कधी रंग भरण्याचे काम तर कधी रंग रंगहीन करण्याचे काम करत राहते.
         पण तो खचत नाही. तो आकाशात उंच भरारी घेत जगत असतो. आयुष्यात खूप वादळ चालू असतात. एवढे सगळे वाईट गुंतागुंतीचे चाललेले असतानाही त्यातून बाहेर येण्याचे एक वादळ तो निर्माण करीत असतो.
         अपमानची माळ सहन करत जन्माचे सार्थक व्हावे इतके मात्र तो मनाशी ठाम असते. लक्षात एकच ठेवा, परिस्थिती कुठलीही असो चेहऱ्यावर नेहमी स्मित ठेवा... हास्य ठेवा 😄तळहाताच्या रेषांवर विश्वास ठेवा. 
           जन्माची शिदोरी ही कोणत्याही इतक्या विचारहीन व्यक्तीच्या हातात देऊ नेका की तो तुम्हाला सतत मूर्ख बनवत जाईल आणि तुम्ही मूर्ख बनत जा.
         जाणिवा इतक्या गहिऱ्या ठेवा की भावना शून्य होणार नाही. अंतर्मन खोल रुसलेल्या जखमा दिसू द्या पण त्यांचे कुणीही भांडवल करणार नाही. इतके मात्र लक्षात ठेवा...!!                      परिस्थिती मनाला शिस्तबद्ध करते. परिस्थिती मनाला जाणीव निर्माण करते. परिस्थिती निराशा निर्माण करीत असली तर तीच परिस्थिती मनाला नवीन ऊर्जा ही देते, आणि हजार पटीने देते..!!
            शहाणपण हे फक्त काही क्षणापुरते असते. ते मिटल्या पापण्यांवर आघात करत नाही. वाऱ्याच्या हलक्या झुळकिनी ते नष्ट होत नाही. येण्याची आणि जाण्याच्या दोन्हीही पर्याय उपलब्ध असते. फक्त आपल्याला ती वाट ठामपणे स्वतःला चालावी लागते.
       ❤❤❤   विपरीत परिस्थिती मनातील वादळ दुःखाने भरले असते; हे जरी खरे असले तरी ते आपल्याला खूप काही शिकवून जाते. खूप काही ऋणानुबंध निर्माण करून जाते. शांतपणे सुगंधी गंध नात्यांचे खऱ्याखोट्या सांगून जाते.
          ती कसोटी असते, आपली...! त्या परिस्थितीची. कसोटी असते आपली हसण्याची. ती कसोटी असते आपली दुःखाची.
          अवचित मनाला परिपक्व करण्याची. मी विचारधीन असते अशा परिस्थितीत. परिस्थितीवर मात करता येते आणि कोणताही क्षण कायमस्वरूपी नसतो. भीती वाटते त्या क्षणापुरते...!😄😄
          आयुष्य घाबरलेले असते; तरी पण परिस्थितीवर मातमात्र परिस्थिती करतेस. ज्यावेळी मात केली जाते विजय होतो परिस्थिती आपल्या मनासारखे हसत असते.... खेळत असते .....स्वप्नांच्या घड्या परत घातल्या जातात..... प्रत्येक धागा नवीन पद्धतीने विणला जातो.....वेदना सरत जाते.... जमलेले वादळ कमी होत जाते...., पण खऱ्या माणसाचे चेहरे मात्र त्या परिस्थितीमुळे आपल्याला लख्खप्रकाशासारखे असते.
         उगाच ती परिस्थिती आपल्यावर आली असेल असे वाटत नाही. अस्वस्थ भावनेला अस्वस्थता निर्माण करते असे नाही. नवीन विचार परिस्थितीमुळे आपल्या फुलत असते. जन्म घेत असते. गंध खोलवर रुजत असते. पण गेलेल्या परिस्थितीवर मन अजूनही वादळांनीच भरलेले असते.
          जगण्याचे श्वास कमी झालेल्या परिस्थितीवर मात करून नवीन गारव्याची झालेली असते.
            कधी रंग भरायचे कधी रंगहीन करायचे हे चित्रकाराला ज्याप्रमाणे माहीत असते तसेच परमेश्वरालाही माहीत असावे. प्रत्येकाच्या मनात एक ज्योत असते आशेची आणि ती आशा कधी फुलवायची कधी प्रज्वलित करायची हे त्या परमेश्वराला माहीत असावे.
...... काळी परिस्थिती निघून गेलेली असली तरी उजेडातील परिस्थिती डोळसपणे बघावी. दळवळणारा प्रकाश आपला असेल तरच त्या प्रकाशाला आपलेसे  करावे मग तो कणभर का असेना त्या परिस्थितीत ज्यांनी साथ दिली त्यांना मनाच्या त्या कोपऱ्यात जागा ठेवावी जिथे कोणीही ती जागा घेणार नाही.                           परिस्थितीनुसार अनुभव आलेले असतात. परिस्थितीनुसार समाज समजलेला असतो. परिस्थितीनुसार सहज सोप्या आकारात माणूस समजलेला असतो. परिस्थितीनुसार मनावर माणूस उमटलेला असतो आणि परिस्थितीनुसार माणूस निर्माण होत असतो.
          परिस्थितीनुसार माणूस ओळखी किंवा अनोळखी व्यक्ती निर्माण करीत असतो. पण परिस्थिती अस काहीही ठरवत नाही. तो माणूस नावाचा व्यवहारवादी व्यक्ती ठरवतो. परिस्थिती चांगली आली, की तो विसरत जातो दुःखात साथ देणाऱ्याच्या चेहऱ्यांना!! दुःखासोबत असणाऱ्या त्या जगणाऱ्या माणसांना!! दुःखात प्रवास करणाऱ्या त्या सगळ्या पर्यायांना....!!                   ज्यांनी मनापासून सोबत केलेली असते. असे होऊ देऊ नका! शब्द उणे होऊ देऊ नका. आयुष्याच्या रंगमंचावर आपला रंग सरड्याप्रमाणे आहे दाखवू नका.
            रीत ओंजळ असताना भरभरून देणारे हास्य मनात करून ठेवा. ओंजळ प्रत्येक परिस्थितीत खालीच असते हे बघण्याचे सामर्थ्य प्रत्येकाजवळ नसते म्हणून परिस्थिती चांगली आणि परिस्थिती वाईट अशी व्याख्या आपण करत राहतो.
            पावसाचा थेंब आणि अश्रूचा थेंब हा जरी वेगवेगळ्या असला तरी मात्र एकच असते. काहीतरी शिकण्याचे अनुभव उगवणे.
        उठवण्याच्या परिस्थितीला मित्र बनवा. आयुष्यात खूप वादळे चालू असतात आयुष्य सरळ साधे नाही हे परिस्थितीमुळे कळते आणि मन गुंतत जाते पण माणूस शहाणा मात्र तितका होतो परिस्थितीच्या रस्त्यावरून सावरताना....!!

          ©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

=========❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤===========


***Situation***
"Slowly the mind was left
 Surla Moments!!”

            The word situation gives a new twist to everyone's life.  When the situation gets out of hand, one does not know whether the situation can be overcome or not.  One does not know if the situation is in hand or if the situation can go along with it.  Words fall short, when the situation gets out of hand!!
 New Palvi formal informal blooms.  But the mechanical man who recovers from the road has to work out at the price of the drops that have fallen and smell like gently dried flowers.
 Circumstances make the stream wet and hard, when something new is found, it creates a new storm, on the contrary, a good situation makes the mind happy.  Destroys the tired mind.  Then he is not there.  He knows nothing.  Those who were destroyed by the situation were standing again and again to stand anew.               

Because life has weathered so many storms that every moment seems to continue from the wrecked moment.  The thing called curiosity gets lost somewhere.  Still, overcoming the situation, sometimes the work of coloring and sometimes the work of decolorizing continues.
 But he is not tired.  He lives soaring high in the sky.  There are many storms in life.  Even when all the evil is complicated, he creates a storm to come out of it.
 But he is firm in his mind to bear the burden of humiliation to make his birth worthwhile.  Remember one thing, always keep a smile on your face no matter what the situation is... keep smiling 😄 
        Trust the palm lines.
 Don't hand over the keys of birth to any person so thoughtless that he will continue to make a fool of you and you will become a fool.
 Keep the feeling so deep that the feeling will not be void.  Let deep-seated wounds appear but no one will capitalize on them.  But remember this...!!  Circumstances discipline the mind.  Circumstances create consciousness in the mind.  If the situation creates despair, the same situation gives new energy to the mind, and a thousand times over..!!
 Wisdom is only for a moment.  It does not irritate the eyelids.  It is not destroyed by the slightest gust of wind.  Both inbound and outbound options are available.  We just have to walk that path firmly ourselves.
    
          Adversity is a storm in the mind filled with grief;  Although this is true, it teaches us a lot.  A lot goes into building relationships.  Quietly aromatic smells tell the truth of relationships.
 It is a test, ours...!  of that situation.  The test is your smile.  That is the test of our suffering.
 To mature the immature mind.  I am under consideration.  Circumstances can be overcome and no moment is permanent.  For that moment of fear...!
         Life is scary;  However, you make the situation worse than the situation.  When overcome is won Circumstances smile like our hearts....playing.....dreams are put back on.....each thread is woven in a new way.....pain fades away....  The gathering storm subsides..., but the face of a real person shines like a light on us because of that situation.
 It doesn't seem like that situation has happened to us.  An uneasy feeling does not necessarily create an uneasy feeling.  New thinking happens because of the situation.  Is taking birth.  The smell is deeply rooted.  But the mind is still filled with storms about the past.
 The breath of life is a new dew after overcoming the reduced conditions.
          Just as a painter knows when to add color and when to leave it blank, so should the Lord know.  There is a flame of hope in everyone's heart and God should know when to make that hope bloom and when to ignite it.
 ...... Even though the dark situation has passed, the bright situation should be seen with the eyes.  Only if the stirring light is yours, make that light your own, even if it is a particle, but keep a place in that corner of your mind for those who have supported you in that situation where no one will take that place.  There are experiences depending on the situation.  Society is understood according to the situation.  Man is understood in simple form according to the situation.  According to the situation, a person is formed on the mind and according to the situation, a person is created.
            Depending on the situation, a person creates an acquaintance or a stranger.  But the situation does not determine anything.  He defines a pragmatic person called man.  When the situation is good, he forgets the faces of those who support him in sorrow!!  To those living with suffering!!  To all those options traveling in sorrow...!!  Those who have been with them wholeheartedly.  Don't let that happen!  Don't let the words slip.  Don't show your color like a lizard on the stage of life.
 Keep in mind a hearty smile when the weather is wet.  Not everyone has the ability to see that the flood is below in every situation, so we continue to define situations as good and situations as bad.
 A drop of rain and a drop of tears, though different, are the same.  To have something to learn.
 Make a friend of the situation.  There are many storms in life, life is not simple because of the situation and the mind gets involved, but a person becomes wiser when he recovers from the road of the situation....!!!

       ©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote

 Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.



--------------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...