savitalote2021@bolgger.com

मंगळवार, २१ मार्च, २०२३

* माझी कविता **My poem

      जागतिक कविता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...❤! 
"माझी कविता," ही कविता मी माझ्या या दिवसासाठी समर्पित आहे. कारण कविता नसेल तर जगणे किती अवघड होईल याची कल्पनाही करू शकत नाही. 
          कविता हे फक्त शब्द एकत्र जोडणारे माध्यम नाही तर भावभावना मांडणारी ती एक प्रतिभा आहे. 
         ती मला जन्माने मिळालेली आहे. म्हणून माझी कविता माझ्यासाठी नेहमी स्पेशल असते. म्हणून हा दिवस माझ्यासाठी विशेष.
       कवितेवर जितके प्रेम आहे तितके माझे माझ्यावर आहे. म्हणून कविता आणि मी हे एका नाण्याच्या दोन बाजू असावे असे वाटते.
         कविता ही माझी आहे. शब्दांमध्ये गुंफण्याचे सामर्थ्य त्या प्रतिभेने आणि त्या निसर्ग शक्तीने दैवी शक्तीने दिले आहे...💕
             Thank you ...!!

** माझी कविता **

जन्माने मिळालेली 
माझी कविता 
मोगराच्या सुगंधासारखी 
दरवळणारी 
माझी कविता 
अत्तराचा सुगंध 
माझी कविता 
प्रतिभा साता जन्माची 
जन्मानेच सोबती होऊनी  
शब्दांसोबत उतरली 
कागदावरती प्रेमळ 
माझी कविता 
सुखाचा हर्ष
प्रेमाचा बहर 
ओल्या मातीचा सुगंध
शब्दात मांडणारी
माझी कविता 
दुःखद वेदनेने भरलेली
माझे शब्द मांडणारी  
माझी कविता 
अलगद हळुवार 
स्वतःच्या कवेत घेणारी 
माझी कविता 
कविता माझीच 
पण शब्द त्या प्रतिभेचे 
आशीर्वाद मज त्या शब्दांचा 
माझी कविता 
माझे जगणे प्रतिभेचे 
पांघरून घेऊन 
जन्माची सोबती  
माझी कविता

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 



Happy World Poetry Day...❤!
 "My Poem," this poem I dedicate to this day.  Because one cannot even imagine how difficult it would be to live without poetry.
 Poetry is not just a medium of stringing words together, it is a gift of emotion.
 It is given to me by birth.  So my poetry is always special to me.  So this day is special for me.
 I love poetry as much as I love myself.  So I think Kavita and I are two sides of the same coin.
 The poem is mine.  The power to intertwine in words is given by that talent and that nature power by divine power...💕
 Thank you...!!

 ** My Poem **

** My Poem **

 Inherited by birth
 my poem
 Like the scent of mango
 moving
 my poem
 The scent of perfume
 my poem
 Pratibha sata born
 Mate by birth
 Landed with the words
 Lovely on paper
 my poem
 Joy of happiness
 Blossom of love
 The smell of wet earth
 Put into words
 my poem
 Full of tragic pain
 My words
 my poem
 Separately
 Self-possessed
 my poem
 The poem is mine
 But words of that genius
 I bless those words
 my poem
 My living talent
 Covering up
 Birthmate
 my poem

©️®️ ✍️Savita Suryakanta Tukaram Lote



✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
         कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
       कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आपल्या सूचना गोड- कडू दोन्हीही शब्दात नक्की कळवा आणि मनातील विचारांना शब्द द्या..!❤


 ============================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...