"International Women's Day Front page of the progress of woman's existence...!"
✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
जागतिक महिला दिवस म्हणजे स्त्रियांसाठी महत्त्वाचा दिवस. महिला दिवस आपण 8 मार्चला साजरा करतो. हा दिवस स्त्रियांवरती अत्याचार,अन्याय दूर व्हावा, त्यांना सुरक्षित आयुष्य मिळावे, स्त्री म्हणून ताठ मानेने स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे यासाठी केला जातो.
जवळपास एका शतकाहून जास्त कालावधी हा दिवस मोठा जल्लोषाने संपूर्ण जगात साजरा केला जातो.
( For more than a century, this day has been celebrated all over the world with great fervor.)
महिला दिवस स्त्रीवादी विचारांचा पहिला जाहीर उच्चार झाला तो मेरी वोल्स्टनक्राफ्ट या
तत्ववेत्तीने लिहिलेल्या A Vindication of the Rights of Woman (1792 ) या पुस्तकातून झालेला आहे.
" स्त्रीचे शिक्षण आणि घडण मुळातच पुरुषी वर्चस्व जपण्याचा विचार करूनच केली जाते. त्यामुळे पुरुषांना काय आवडते हे 'संस्कार' या नावाखाली तिच्या मनावर ठसविले जाते, पण स्वतःला मनापासून का आवडते हे ठरवून निर्णय घेण्याची सोडाच, त्याचा नुसता विचार करण्याची कुवतही ती गमावून बसते".
("The education and development of a woman is basically done with the thought of maintaining male dominance. Therefore, what men like is imprinted on her mind under the name of 'culture', but she loses the ability to think about it, let alone decide why she likes herself from the bottom of her heart".)
1792 सालात असे विचार मांडणे म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासारखे होते. या परखड आणि धाडसी विचारांमुळे मेरीला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागलेले होते.
तसेच एलिझाबेथ कॅडी स्टॅन्टन यांनी "विमेन्स राईट्स कन्व्हेन्शनची स्थापना केली
स्त्रियांना नोकरी करता यावी,विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून "मरियन हाईनिश" त्या ऑस्ट्रियन महिलेने लढा उभारला.
तसेच "केट शेफर्ड", यांनी स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून न्युझीलँडच्या "सुफ्राजेट", कार्यकर्त्याच्या मार्गदर्शनाखाली लढा उभारलेला.
कोपेनहेगन मध्ये 1910 मध्ये महिला परिषदेत ही कल्पना मांडण्यात आली आणि 17 देशातील शंभरहून अधिक महिलांच्या कल्पनेमधून हा दिवस मान्य झाला.
त्यानंतर डेन्मार जर्मन ऑस्ट्रेलिया इथे हा दिवस साजरा करण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत हा दिवस आठ मार्चला साजरा केला जातो. 1975 मध्ये महिला दिवसाला जागतिक राष्ट्राची अधिकृत मान्यता मिळाली.
स्त्री ही स्वातंत्र्य व्यक्ती आहे आणि तिला सर्व अधिकार मिळावे यासाठी हा लढा दिला जातो.
स्त्री म्हणजे स्वातंत्र्य व्यक्ती आहे हे जगाच्या कोणत्याही कानाकोपरामध्ये मान्यता दिली जात नव्हती. स्त्री म्हणजे गुलाम. स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नेहमीच एका वस्तू सारखा होता. स्त्रियांना इतर व्यक्तींसारखे अधिकार मिळावे म्हणून 17 व्या शतकापासून स्त्रियांसाठी चळवळी उभ्या केल्या गेल्या काही ठिकाणी स्त्रियांना थोडेफार महत्त्व होते.
हे महत्त्व खऱ्या अर्थाने, "श्री चक्रधर स्वामी" यांच्या महानुभाव पंथात दिसून येते. त्यांचा पंथ समानतेच्या पायावर उभा होता. महिलांना धार्मिक स्वातंत्र्य सर्वप्रथम महानुभाव पंथाचे संस्थापक यांनी दिले.
19 व्या शतकात जगभर स्त्रीवादी चळवळीचा चळवळ उभारली गेली. भारताने त्या सहभाग घेतले. भारतात इंग्रजी राजवट असताना सुद्धा भारतामध्ये अनेक समाजसुधारकांनी जगात सुरू असलेल्या स्त्रीवादी चळवळीला भारतात सुद्धा उभी केली. त्यामध्ये महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रानडे आगरकर टिळक कर्वे. छत्रपती शाहू महाराज,रमाबाई रानडे अहिल्याबाई होळकर इत्यादी अनेक नावे आपण घेऊ शकतो.
(In the 19th century, the feminist movement was established around the world. India participated in it. Even during the British rule in India, many social reformers in India raised the ongoing feminist movement in India as well. Among them Mahatma Phule, Savitribai Phule, Doctor Babasaheb Ambedkar, Ranade Agarkar Tilak Karve. We can take many names like Chhatrapati Shahu Maharaj, Ramabai Ranade Ahilyabai Holkar etc.)
भारतीय समाज व्यवस्थेत बालविवाह विधवाविवाह,स्त्रीशिक्षण, विवाहाचे वय पुनर्विवाह, केशवपण अशा विविध अनिष्ट चालीरीतींना विरोध केला.
जागतिक स्तरावर स्त्री स्वातंत्र्याची चळवळ जोर घेत होती तितके जास्त प्रमाणात स्त्रियांच्या अधिकाराबद्दल भारतात बोलले जात होते.
स्त्री ही एक स्वातंत्र्य व्यक्ती आहे. तिलाही अधिकार आहे. तिच्या अधिकाराबद्दल समाज जागृत होत होता. इंग्रजी राजवटीमुळे भारतीय व्यवस्थेतही बदल होत होते. स्वातंत्र्याचे वारे भारतातही वाहत होते.
याच पार्श्वभूमीवर रमाबाई रानडे यांनी भारतात प्रथमच महिला परिषदेची स्थापना केली. त्यामध्ये त्यांनी अनेक समस्या विविध प्रश्न आणि स्त्रिया बद्दलची अवहेलना मांडल्या. स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून पहिल्यांदा भारतात 1943 मध्ये "महिला दिवस",साजरा करण्यात आला. भारतात महिलांची परिस्थिती ही दयनीय होतीच पण स्त्री स्वातंत्र्य व्यक्ती आहे याकडे सुद्धा दुर्लक्ष होते. स्त्रियांच्या विविध सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक,धार्मिक, विविध समस्या असल्या तरी त्या समस्या नव्हत्याचमुळे असे समाजमान्य झाले होते. म्हणून भारतात अनेक समाज सुधारकांनी आपापल्या परीने या समस्यांना समाजामध्ये मांडला.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या अधिकाऱ्यासाठी भारतीय संविधानामध्ये मान्यता दिली. स्त्रियांना समानतेचा अधिकार दिला. स्त्री ही पुरुषांची गुलाम नसून स्त्री सोबती आहे.
निसर्गाने स्त्री पुरुष असा भेदभाव केलेला नाही. स्त्रीला सुद्धा पुरुषांसारखे ते सर्व अधिकार बाबासाहेबांमुळे मिळाले आणि आजही स्त्रियांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या प्रगतीसाठी भारतात विविध योजना राबविल्या जातात.
आंतरराष्ट्रीय महिला दिवसानिमित्त दरवर्षी ठराविक संकल्पनेवर आधारित असते
यावर्षी म्हणजे 2023 महिला दिवसासाठी संयुक्त राष्ट्राची थीम डीजी ऑल - संशोधन आणि तंत्रज्ञानाचा वापर लिंगभाव समानतेसाठी अशी आहे.
जगभरात ज्या महिला तंत्रज्ञान आणि ऑनलाइन शिक्षणात जे योगदान देत आहे ते ओळखून यथोचित सन्मान करावा म्हणून ही थीम होय.
( International Women's Day is celebrated every year based on a certain concept
This year, 2023, the UN theme for Women's Day is DG ALL - Using Research and Technology for Gender Equality.
The theme is to recognize and honor the contribution women are making to technology and online education around the world.)
डिजिटल लिंग असमानतेमुळे महिला आणि मुलीच्या आयुष्यावर काय परिणाम होत हे ही शोधण्याचा एक प्रयत्न या थीम मागे असावा.
या विषयाच्या अनुषंगाने समाज जागृतीचे उपक्रम हाती घेतले जातात.
2023 म्हणजे जागतिक महिला दिनाचे 111 वे वर्ष. या इतका मोठा प्रवासा जागतिक महिला दिवसाचा ही प्रगतीच्या उत्तुंग शिखरावर पोचलेली आहे.
घरात स्त्री म्हणजे फक्त गुलामीचे किंवा दुर्लक्षित घटक म्हणून राहिले नाही तर ती आता आई,बहिण ,ताई ,काकू ,मावशी, आत्या फक्त इतक्याच नात्यात अडकलेली नाही तर शिक्षक, टीचर ,डॉक्टर, पायलेट, वकील, नर्स,पत्रकार, लेखिका. जिल्हाधिकारी /कलेक्टर,राजकारण मुख्यमंत्री, राष्ट्रपती, मंत्री अशा विविध पदांवर त्या पोचलेल्या आहे.
( 2023 marks the 111th year of International Women's Day. This long journey has reached the pinnacle of progress of International Women's Day.
A woman is no longer just a slave or a neglected element in the house, but now she is not only a mother, sister, uncle, aunt, aunt, grandmother, but also a teacher, teacher, doctor, pilot, lawyer, nurse, journalist, writer. She has held various posts like Collector/Collector, Politics Chief Minister, President, Minister.)
" जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी," हे वाक्य या मागचा उद्देश, या मागचे ध्येय आता संपूर्ण अर्थाने पूर्ण होत आहे.
जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने संपूर्ण जगाच्या महिलांना त्यांच्या कर्तृत्वाबद्दल त्यांनी केलेल्या उंच भरारी बद्दल आणि त्यांनी घर सांभाळून केलेली प्रगती यासाठी त्यांच्या पाठीवर आशीर्वादाची थाप आहे.
ज्या व्यक्तीने हा दिवस प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात यावा म्हणून केलेल्या अथक परिश्रमाच्या स्वप्नांच्या सत्यावत उतरलेले स्वप्न आहे.
इतिहास कधीही बदलत नाही इतिहास बदलविणारे खूप येतात पण इतिहास टिकून ठेवणारे व्यक्ती, काही प्रसंग कधीही कोणीही मिटवू शकत नाही.
त्यातलाच एक इतिहास म्हणजे स्त्री स्वातंत्र्याचा पहिला लढा आणि वर्तमान स्थितीत असलेला स्त्रियांच्या प्रगतीचा आराखडा.
(History never changes. There are many people who change history but there are people who preserve history. Some events can never be erased by anyone.
One such history is the first struggle for women's freedom and the blueprint for women's progress as it stands today.)
प्रगतीच्या वाटा नवनवीन येऊ दे
गरुड झेप घेता घेता
सुरक्षितेची चाहूल सोबत राहू दे
नवीन तंत्रज्ञानाच्या युगात समानतेचे
वारे सोबत राहू दे
मी एक स्त्री आहे कधीही न विसरणारी
कारण संस्काराने बांधली गेलेली
तरी प्रगतीच्या वाटा खुल्या करत
खुला विचाराने खुल्या व्यासपीठावर
प्रगतीची वाट सोबत राहू दे
मी आई ताई बहीण आत्या मावशी
काकी बायको सर्वच नाते सांभाळत
सोबत राहू दे माझ्या
तुझ्या पुरुषार्थमधील शिवाजी शाहू फुले आंबेडकर...!!
( Let innovation be part of progress
The eagle takes a leap
May the safety be with you
Equality in the age of new technology
Let the wind be with you
I am a woman who never forgets
Because it is bound by culture
Still opening the way for progress
Open platform with open mind
May progress be with you
I am mother, father, sister, mother and aunt
Aunt wife takes care of all relationships
Let me be with you
Shivaji Shahu Phule Ambedkar in your Purushartha...!! )
जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा हा दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो तुम्ही या वर्षी कशा पद्धतीने हा दिवस साजरा केला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
-------------------------------------
#महिला दिवस #जागतिक महिला दिवस #आंतरराष्ट्रीय महिला दिवस #महिला दिन #महिला दिनाच्या खास कविता #महिलांसाठी कविता
#womensday #internationalwomensday #internationalwomensday #womensday #womensdayspecialpoems #poemsforwomen
-------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा