ओल आसवांची
कधीतरी हसरी
""" प्रेम चारोळी संग्रह💔"""
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
चारोळी संग्रह शीर्षक :-ओल आसवांची
.....कधीतरी हसरी💔
कवयित्री :-©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
💕💕💕💔💔💔💔💔💕💕💔💔💔💔
💕""प्रेमाला विसावा दिला की कळते
प्रेम कोणत्या क्षणासाठी आहे
ते क्षण जपून ठेवलेले आहे
तुझ्या - माझ्या तर क्षण पवित्रासाठी"",💕
शब्दांचे विश्व हे असे आहे की तिथे रोज नवीन काहीतरी लिहावे लागते त्याआधी ते मनात रुजवावे लागते आणि त्यानंतर ते कोऱ्या कागदावर उठतात. मन प्रसन्न होत जाते. मनातले शब्द ओळी म्हणून कागदावर आपल्या भाव विश्वातून मनातला शब्दांना हुरहुर आणणाऱ्या ओळी परिपूर्णपणे नवीन स्वरूपात उमटतात.
चारोळी हा काव्य प्रकार तसाच कमीत कमी शब्दात आपल्या भावना व्यक्त करणे. हा या चारोळी काव्य लेखन मागचा उद्देश चार ओळीची अक्षरांचे बंध असणारे कमी शब्दात विस्तृत आशा देणारे आकलन करणारी भावनांच्या आणि विचारांचे आशा गर्भ अभिव्यक्त निर्माण करणारी काव्यप्रकार म्हणजे चारोळी होय.
चारोळी संग्रह चार - चार ओळीत लिहिलेल्या रचनांना शब्दांचे करणे वेचून रचनेच्या स्वरूपात विविध रंगी पद्धतीने कागदावर लिहिताना मनात दाटून येते. संध्याकाळची अवचित रात्र आणि सकाळचा बेधुंद पाऊस एका सुंदर प्रवासाला घेऊन जाते आणि चालू होतो एक नवीन प्रवास ...!! आपलाच असलेल्या संवादाचा आयुष्य विसाव्याच्या क्षणाला जाताना मन बदलून जाते. गंधाळलेल्या उगवलेल्या एका पवित्र संवाद काव्य स्वरूपात तिला पण चारोळी असे म्हणतो
( .......Charoli collection four - four lines written in the form of words and written on paper in different colors in the form of a composition gets stuck in the mind. The untimely night of the evening and the light rain of the morning lead to a beautiful journey and a new journey begins...!! The mind changes as the life of our own communication approaches the moment of rest. A sacred dialogue in the poetic form of the fragrant rose also calls her Charoli..!💕)
शब्दांचा कणकण भावनेचा क्षण-क्षण एका नवीन महोत्सवात सोहळ्यात रूपांतर होते आणि निर्माण होते एक चारोळी संग्रह ...💕 आपल्याच भावनांचा आपल्याच परिस्थितीचा आपल्याच अर्थपूर्ण अंतर्मुख झालेल्या विषयांचा कधी निखळ आनंद देत तर कधी निषीम शांतता देत.
चारोळी संग्रह उत्कटता वाढविते. विषयाबद्दल विविध रंगाने कवितेच्या माध्यमातून फुलांचा वर्षाव करते. शाब्दिक चारोळी ही चटकन आकलण्यात येणारी चौरस आहे.
कविता पवित्र आणि गंधाळलेले असते. त्यात तुम्हाला विविध भावना मिळतात पण त्या भावना मनाला ते सांगून जाते. जे कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपण दुर्लक्षित करतो. आणि त्याच आपल्या आयुष्याच्या त्या सर्वस्व घेऊन जातात.
चारोळी संग्रह त्याच भाव विश्वाला संवादाला प्रेमाच्या पानात मात्र अमर करत असतात. एक सुंदर प्रवासाला घेऊन जाते. कधी तो प्रवास सुखत असतो तर कधी वेगवेगळ्या नात्यांनी भरलेल्या वेगवेगळ्या भावनांनी भरलेला असतो.
चार ओळींच्या कवितेला चारोळी म्हणतात.
(A poem of four lines is called Charoli)
मनातील भावन संवेदना मनातील विचार संवेदना मनातील विचार आजूबाजूची परिस्थिती त्यातून मनात आलेले विचार मनातील चलबिचल मनातील प्रश्न अशा कितीतरी गोष्टी कमीत कमी शब्दात मांडण्याचे कविता प्रकार म्हणजे चारोळी होय.
कमी शब्दात पण प्रभावी शब्दरूपी संवेदना मनात घर करून भाव प्रकट करणारी एक प्रभावी माध्यम म्हणजे ( Charoli collection ) चारोळी संग्रह...!!!
चारोळी संग्रह विचारांचे आशा गर्भ अभिव्यक्ती निर्माण करणारा काव्यप्रकार. एक प्रभावी माध्यम शब्दांच्या बंधनात नसणारी एक सुरेखा आकृती चारोळी परिपूर्ण पणे चार ओळींच्या त्या शब्दसमूहाला एका भावनेची जोड देते आणि आपल्या भाव विश्वास घट्टपणे एक नाते पूर्णत्वास नेते.
नेमक्या शब्दात विषयाला मांडणे... लिखाण करण्याचा हा थोडासा प्रयत्न माझ्याकडून होत आहे. याआधी आलेल्या चारोळी संग्रहाला काव्यसंग्रहाला तुम्ही भरभरून प्रेम दिले. असेच प्रेम याही चारोळी संग्रहाला द्यावे.
सूचना असल्यास कळवावे. मन प्रसन्न होईल. तुमच्या भावना माझ्या भावनेसोबत जुळतात का हा बघण्याचा हा एक प्रयत्न. कारण आयुष्य हे विविध भावविश्वातून निर्माण होते. येणाऱ्या प्रत्येक क्षणाला चेहऱ्यावरचा चेहरा आपला समोर येत असते.
आपल्यासमोर प्रत्येक भाव विश्वातून संवाद साधला जातो कधी तो अबोल असतो तर कधी स्वार्थी याच सर्वाचा मेळ या चारोळी संग्रहात चार ओळीच्या शब्दसमूहात करण्याचा प्रयत्न आहे.
(In front of us, every emotion is communicated from the universe, sometimes it is abject and sometimes it is selfish. In this Charoli collection, an attempt is made to combine all these in four line phrases.)
सोशल मीडियाद्वारे वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे काम जागतिक माहितीचे केंद्र म्हणजे गुगल. या माध्यमातून वाचक मित्रमैत्रिणी पर्यंत हे माध्यम करीत आहे. आपल्यातील दुवा हा गुगल माहितीचे महाकेंद्र होय. सोशल मीडिया किंवा ब्लॉग यासारख्या यामुळे आज आपण त्या व्यक्तींपर्यंत पोहोचतं जिथे आपले छापील पुस्तकही पोहोचू शकत नाही म्हणून ऑनलाईन पद्धतीने चारोळी संग्रह काव्यसंग्रह किंवा काव्यरचना प्रकाशित करणे हे ठरवूनच या ब्लॉगची निर्मिती केलेली आहे.
तुम्हाला आवडल्यास तुम्ही माझा हा काव्यरचना शेअर करू शकतात. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा सर्वात स्वस्त आणि मस्त माध्यम आहे. ब्लॉगच्या या शब्दांच्या महोत्सव सोहळ्यात तुम्ही ही सहभागी व्हा. शब्दांची पेरणी माझी आहे आणि या उगवत्या पेरणीला धान्य स्वरूपात इतरांपर्यंत पोहोचण्याचे काम माझ्या त्या सर्व रसिक प्रेक्षकांना आहे.
(If you like you can share this poem of mine. It is the cheapest and coolest medium to reach maximum number of people. Be a part of this blog's festival of words. The sowing of words is mine, and it is the work of all my interested audiences to carry this sprouting seed to others in the form of grain.)
छोटसं काम मात्र तुम्ही नक्की करा कारण तुम्ही आधारस्तंभ आहात ज्या दिशेने मी जात आहे त्या दिशेला सर्वोत्तम ठरविण्याचे. चारोळी काव्यसंग्रह काव्यरचना, काव्य प्रकार दोन ओळी सप्तपदी काव्यप्रकार हा खरच भावनेला कमी शब्दात कमी वेळेत आनंदाला विसावा देतात. मन प्रफुल्लित करून जाते तुम्ही सुद्धा यामध्ये सहभागी व्हा...!!
❤❤धन्यवाद❤❤
❤❤❤❤❤❤❤मनोगत
"ओल आसवांची कधीतरी हसरी, हा चारोळी संग्रह मी संग्रहित करून हर्ष उल्हासित मनाने माय माऊली वाचकांच्या हाती देत आहे. माझ्या अंतर्मनातून उमटलेल्या शब्दप्रतिभेतून साकार झालेली भावनांच्या शब्दातून वेचण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न आहे.
बाल्यावस्थेपासून संवाद स्वरूपात आपण कितीतरी व्यक्तींना भेटतो. प्रत्येकाशी आपले एक नवीन वेगळे नाते निर्माण होते. अनेक लोकांना भेटताना आपल्याला माहीत असते. त्या व्यक्तीबद्दल असलेले आपले नाते, नात्यांची ओळख व्हायला लागली की नाते वेगवेगळ्या नात्यांमध्ये परिवर्तित होते.
काही नाते अर्थपूर्ण असतात. काही नाते आपलेपणाचे असतात. काही नाते मनाला आनंद निखळ निषीम प्रेम असते. एक दिवस अशी व्यक्ती येते जी आपल्या आयुष्यात नंतर तेच आपले सर्वस्व होते आणि त्याच व्यक्तीला नंतर सर्वस्व म्हणून जीवन बदलून जाते. नवनवीन गोष्टींची सुरुवात होते. प्रत्यक्ष आनंदित जातो. परिपूर्णतेकडे जाते. रोजच्या घडणारा दिनक्रम त्याच्याही वाटेला येते. आतून मन हलवून जाते. मनात ओळी उमटतात, त्या हलक्याच कागदावर उठतात.
मन प्रसन्न होते. डोळ्यात नवीन स्वप्नांची चाहूल असते. आयुष्याला एक रंगीबेरंगी झालर ती भावना देते. कलाकार त्या भावनेला कधी रंगांच्या साह्याने कागदावर उमटते तर कधी शब्दांच्या माध्यमातून ती शब्दांसोबत कागदावर उमटते तर कोणी ते सुरांच्या स्वरूपात सप्तसुरांसोबत भावनेला एक नवीन सुरामध्ये गुंफतो तर कधी याच भावनेला मैफिलीत भाव घेऊन येतो अशी ही भावना ते म्हणजे प्रेम...💕
कधी कधी हेच प्रेम मनाला सर्वोच्च आनंद मिळून देतो. कधी कधी हेच प्रेम नयनांना आसवांची ओल देऊन कधीतरी हसूच्या सोबतीने तेही क्षण सुखांच्या आसवांना सोबत घालविले होते, " हे ते प्रेम 💕💕"
माणसाच्या मनाला हुरहुर लावून जाते नवीन स्वप्नाची नवीन आयुष्याची चाहूल लावून जाते. प्रेम मनाला कदाचित आयुष्यालाही कदाचित ह...... जगण्यासाठी एक नवीन पक्की पायवाट देते पण हे सर्व सर्वांच्याच वाटेला येते असे नाही.
त्यातून निर्माण होते निराशेचा सूर. या निराशेच्या महोत्सवाचा सोहळा ही कधी कधी काही लोक हा असा शब्दांच्या स्वरूपात मांडून जातात. कविता वाट पाहत राहते त्या प्रत्येक भावनेसोबत चालण्याचे त्याबरोबर तिला चालता येते.
म्हणून मी नेहमीच म्हणते, कविता ही वाचण्याची गोष्ट नाही,कविता ही समजून घेण्याची गोष्ट नाही, कविता ही मनावर उमटवलेली ती गोष्ट आहे ती गोष्ट प्रत्येकांच्याच मनावर उमटलेली असते. कधी ती जास्त असते. कधी ती कमी असते. इतका तो काय फरक. "ओल आसवांची", प्रेम चारोळी संग्रह या चारोळी संग्रह आपल्याला विविध भावनांचे दर्शन होईल. त्या भावना नवनवीन गोष्टींची सुरुवात असेल पण अंत नाही. काही चारोळ्या निराशावादी देखील वाटेल . काही खूप प्रेमाने भरलेल्या वाटेल. काही जगण्याचा मार्ग सांगतील तर काय मन तुटलेल्या काचेसारखे झाल्यासारखे वाटेल पण याही भावना जेव्हा कविता आपल्याला सापडते तेव्हाच आपल्यातील कविताही सापडते. हे सापडणे त्या भावविश्वातून गेल्यावरच होते, असे नाही...!💔
कधी कधी कमेंट बॉक्समध्ये विचारतात , तुम्हाला कविता सुचतात कशा ?तुम्ही त्या भाव विश्वातून त्या संवाद यात्रेतून जाता का ?तर तसे नाही! कविता कधी सुचत नाही ती येते ती येणे म्हणजे आपली प्रतिभा होय.
ही प्रतिभा प्रत्येकांजवळच असते फक्त त्याला पॉलिश करावे लागते. कोळशाच्या खाणी मध्ये हिरा मिळतो तसेच भावविश्वातील भावनेमध्ये शब्द दडलेले असतात ते एका योग्य पद्धतीने कागदावर उमटले की त्याची कविता होते. चारोळी होते. जगण्याचा मार्ग होतो. आनंदाचे लय लूट होते.
भावना आणि आठवणी ह्या एकत्र आल्या की आयुष्य मस्त चालू राहते. आयुष्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे जोपासलेली कला आणि ती कोणतीही असू शकते. या जोपासलेला कलेतून खूप काही सापडते. त्याचा शोध घेण्यासाठी सर्वात आधी आपल्यातील त्या कलेला शोधावे लागेल तो शोध आज उद्या पूर्ण होईल असे नाही.
त्या शोधासाठी आयुष्याचे ते अनमोल क्षण द्यावे लागतात; ते कदाचित देण्यासाठी काही व्यक्ती तयार नसतात आणि मी ते क्षण या प्रतिभेसाठी दिले आहे. म्हणून कविता सुचत नाही कविता येते ती सर्वोत्तम असते असे नाही पण ते येते.
हेच परिपूर्ण असते माझ्यासाठी...!!💕 माझ्या त्या प्रतिभेसाठी...!!💕" ओल आसवांचे", कधीतरी हसरे हा चारोळी आयुष्याला विसावाचे क्षण देणार आहे. विचारांचा बंद फुटतो. जवळच्या पानावर शब्द कोरले जातात. कधी हा आधारस्तंभ होतो तर कधी हा खोट्यांच्या दुनियेत खोटांचा बाजार मांडलेला आयुष्याचा विसावा चा क्षण असतो. ज्यावेळी हा क्षण येतो खऱ्या प्रेमाची अनुभूती आपल्याला येते. प्रेम नक्की काय असते हे शोधणारे शोध घेत राहतात. खरं प्रेमाचे अनुभूती अनुभवण्यासाठी स्वतःला इतके बदलतात की त्यांना कधीच खोट्यांच्या बाजारात खऱ्या प्रेमाची चाहूल लागत नाही.
शब्द आणि शब्द सुचलेला प्रत्येक शब्द हा प्रेमभंग आकडे नेणारा असतो आणि एक स्त्री ज्यावेळी एका पुरुषावर प्रेम करते त्यावेळी ते सर्वस्व आपले मानून करते किंवा एक पुरुष एका स्त्रीवर प्रेम करते त्यावेळी त्याच्या आयुष्याची त्या आठवणींना गोळा करण्याची पद्धत असते. तिथे आपोआपच आयुष्य फुलत जाते. हा प्रेम चारोळी संग्रह याच भावविश्वास आठवण आणि भावना यामध्ये गुंतलेला आहे.
(The Prem Charoli Collection is involved in this belief, memory and emotion.)
Let us spoil it with joy of words....
तो आनंदाने लुटून घेऊया शब्दांच्या माध्यमातून माझ्या प्रतिभेला मी या शब्दाच्या माध्यमातून खऱ्या प्रेमाची आणि खोट्या प्रेमाची किंमत काय असते. हे प्रत्येक व्यक्तीला कळावे हा उद्देश प्रेम हे कधीच खोटं नसते. समोरचा व्यक्ती खोटा असू शकतो.असत्य असू शकतो. समोरच्या व्यक्तीचे प्रेम खोटे असू शकते.
प्रेमाला विसावा मिळाला पूर्णविराम मिळाला त्यानंतर त्या व्यक्तीच्या भावना काय असतात त्या भावनेची अनुभूती काय असते त्या व्यक्तीला माहीत नसते पण विचारांचा बंध फुटतो आणि आपण एक अशा विश्वात स्वतःला घेऊन जातो की तिथून बाहेर येणे महाकठीण असते. कविता चारोळी संग्रहाला भरभरून प्रेम दा.... 💕चला कविता वाट पाहते तुमची तुमच्या शब्दांचे तुमच्या भावनेशी जुळून घेण्याची.
खऱ्या प्रेमाची खऱ्या शब्दांचे खऱ्या भावनेसी.
प्रेम हे खूप सुंदर भावना आहे पण ती भावना खरी असावी. विचारांच्या पानावर प्रेम जसे कळले जसे दिसले जसे सुचले जसे पचले शब्दांच्या महोत्सव सोहळ्यात मांडण्याचा प्रयत्न.
चला तर, एका सुंदर प्रवासाला सुरुवात करूया...! प्रेमाचा पान मात्र अमर असते. ते कुठेही कधीही जात नाही. ते आपल्या जवळ असते. आपल्या सुंदर प्रवासाला सुंदर बनविण्यासाठी चला तर या प्रवासाला."ओल आसवांची".....कधीतरी हसरी... 💕 या प्रेम चारोळी संग्रह सोबत.
एक गोष्ट राहून - राहून माझ्या मनात हे सर्व लिहिताना येत आहे की, खरंच कागदांवर उमटलेल्या भावना डोळ्यात अश्रू का आणून जातात आणि त्या सर्व वेळ दुःखदच असतात असे नाही पण त्या खूप सुखाच्या क्षणाला हे आसवांची ओल गालांवर आपले अस्तित्व देऊन जातात. खूप काही सापडते कदाचित त्यामध्ये शोधावा लागत नाही.
अर्थ त्याला म्हणून या प्रेम चारोळी संग्रह "ओला आसवांची,"कधीतरी हसरी"हे नाव दिलेले आहे. खऱ्या प्रेमाची खरी अनुभूती आणि खोट्या प्रेमाची खोटी अनुभूती आणि त्याच भाव विश्वातून पूर्णत्वास आलेला हा चारोळी संग्रह. तुम्ही दिलेल्या आधीच्या माझ्या सर्व काव्यरचनेला भरभरून प्रतिसाद त्यासाठी धन्यवाद💕💕💕
शोध माझा माझ्याशीच आहे. कधी तो पूर्णविराम सारखा तर कधी विसावा सारखा तर कधी जगण्याच्या पायवाटेला काट्यांचे पायवाट करणारा.
चला इथेच थांबू आणि सुरुवात करू एका सुंदर प्रवासाला आपल्यातील प्रेम संवादाशी...!!💕
******************************************************************************
1.
प्रेमाचा रंग चढू दे गालावरगुलाबी ओठांवर चढू दे लालीतुझ्या प्रेमाची माझ्या प्रेमाचीफुललेल्या प्रेम वेलीवर
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
-------------------------------------
2.
माझ्या शब्दात तुझी ओळख आहे
माझ्या शब्दांच्या सुरेल भावनेत
लपविलेले तुझे शब्द आहे
शब्दांच्या रंग गुलाबी रंगात आहे
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
-------------------------------------
3.
एकटेपणाच्या शांततेत तुझा झालेला स्पर्श
तुझ्या आठवणीन पेक्षाही मोगरा फुलवितो
मनात तुझी टिकली दोन नयनांची सोबती
धाव करतात हृदयाला एकटेपणाच्या शांततेत
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
-------------------------------------
4.
सांगायचे आनंद झाल्याचे
फुललेला गुलाब मोगरा सुगंधाच्या
सुगंध दळवळा मनाचा
तुझ्या सोबतीने हातात हात घेत
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
-------------------------------------
5.
मला तुझ्या मनातले वाचायचे आहे
डायरीतल्या पानावर आठवणी गोळा केल्यात
आता तुझ्या डायरीतली फाटलेल्या त्या पानावर काय लिहिले आहे ते वाचायचे आहे
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
----------------------------------
6.
प्रेमाचा गंध स्पर्श शब्द
मोहरून टाकते क्षणांच्या सोबतीला
माझ्या - तुझ्या 💕 संवादाला साक्षी
नयनातील अबोलशब्द
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
-------------------------------------
7.
छोट्या छोट्या गोष्टी शोधते
अगदी प्राण कंटाळा येतपर्यंत
पण खरे सांगू,तू माझ्यातच असतो
हरवून गेलेल्या ❤छोट्या छोट्या गोष्टीत
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
-------------------------------------
8.
चमचमणारी चांदणी आज हसूनच
बोलली टपोरी डोळे सांगत आहे
रात्रीच्या अंधाराची गोष्ट प्रेमवेडी
प्रेम वेड्या प्रेमळ व्यक्तीच्या एका झलकेसाठी❤
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
-------------------------------------
9.
गोड - गोड स्वप्नांना आता सवय
तुझ्या शब्दांची तुझ्या असण्याची
चालता चालता थांबते आता फक्त
मान दुखेपर्यंत वळून बघण्यासाठी
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
-------------------------------------
10.
विसर पडतो तुझ्यासोबत माझे मलाच
माझ्या स्वप्नांचा माझ्या असण्याचा
खोटे भांडणे आता पुरे झाले
एकदातरी माझ्या शब्दांना प्रेमाने सोबत दे
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
-----------------------------------
11.
प्रेम प्रवाह नदीच्या अनंत सोबतीचा 8
प्रेम प्रवाह खळखळणाऱ्या झऱ्यासारखा
प्रेम प्रवाह अविरत बरसणारा पावसासारखा
प्रेम प्रवाह मोहक मोरपंखासारखा हसरा
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
-------------------------------------
12.
तुझ्या माझ्या प्रेमाचा वणवा पेटला
आगीचा लाल - तांबड्या रंगाच्या साक्षीने
फुलला ओला मातीच्या सुगंधासारखा
वणवा प्रेमाचा ओलावून
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
-------------------------------------
13.
गवताचा फुलांचा स्पर्श आता
तुझ्या स्पर्शत आहे उधाणलेला
सागर मनाला शांत किनारा तूच
माळलेल्या फुलांचा गजरा सुगंधही तूच
©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
-------------------------------------
14.
प्रेम म्हणजे आनंद
प्रेम म्हणजे जीवन
प्रेम म्हणजे समाधान
प्रेम म्हणजे विसरणे
©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
-------------------------------------
15.
तुला चोरून चोरून बघताना
आनंद होतो मनाला त्या निरागस
बोलक्या हसू सोबत विसरावे वाटते
लाजरा नयनासोबत करीत
©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
-------------------------------------
16.
फुललेल्या फुलाना फुलू देणे
हसताना हसूनच प्रतिसाद देणे
भडकले की सावरणे आणि सावरले
की परत भडकवने यालाच प्रेम म्हणतात
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
-------------------------------------
17.
नजरेने सांगावे इतकेच प्रेम होते
अबोलीला फुलवावे इतकेच प्रेम होते
सुखाला बंध मिठीत ठेवावे इतकेच प्रेम होते
दुःखाला न सांगने इतके प्रेम होते
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
-------------------------------------
18.
डायरीत जपलेल्या
गुलाबांच्या पाकळ्या गंधहीन
झाला रंगहीन झाला
तुझ्या - माझ्या प्रेमाच्या प्रेमापत्रासारखे
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
-------------------------------------
19.
डोळ्यात लपलेले भाव माझे
मनात युद्ध करतात तुझ्यासोबत
बोलणारी मी ही संघर्ष करते
प्रेम लपविण्याचे हसतच खळखळून
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
-------------------------------------
20.
पाऊस पडून गेल्यावर फुलते
माहित नाही गुलाबाच्या गळलेल्या
पाकळ्या वेचत बेभान होते
बेधुंद वाऱ्यासोबत बेभान होऊन
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
-------------------------------------
21.
चोरून नेलेल्या हृदयाला परत कर
कारण माझे शब्द भावना
तुझ्या जवळ आहे ओलावलेले
नयन माझे तुझे हृदय मागत आहे
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
-------------------------------------
22.
समजावे लागत नाही प्रेम
कळून द्यावे लागत नाही प्रेम
मने जुळले की, भावना जुळतात
जपलेल्या नात्याला अंकुर येतात
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
-------------------------------------
23.
विश्वास नात्यांचा नात्याला मिळते
फुललेल्या नात्याला शब्द मिळते
विश्वासाच्या रांगोळीवर रंग भरले जातात
गुलाबाच्या पाकळ्या ओठी फुलला जातात
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
-------------------------------------
24.
उघडा मनाच्या दाराला कुलूप
कोणते लावावे कळत नाही
सुगंध दरवळत आहे चौहीकडे
माझ्या - तुझ्या प्रेमाचा सुगंधाचा
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
-------------------------------------
25.
भिजलेल्या ओठांवर ओठ येऊ दे
मिलनाची रात्र आता समीप येऊ दे
निवांत शांत झोपेची रात्र येऊ दे
चुंबनाच्या साक्षीने हसऱ्या चेहरा फुलू दे
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
-------------------------------------
26.
भिजलेल्या झाडांसारखे भिजून जावे प्रेमात
सर येऊन गेली तरी भिजण्याचा
आनंद घेत राहावे हृदयाच्या वाढलेल्या ठोकासोबत असंख्य स्वप्नांची माळ गुंफत तुझ्यासोबत
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
-------------------------------------
27.
आनंदाने आनंदित व्हावे की
आनंदाने फुलून जावे
तुझ्या- माझ्या प्रेमाने बेरंग व्हावे
खोट्या नयन शब्दांसोबत आनंदाने
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
-------------------------------------
28.
जखमांवर फुंकर घालत होते
रक्ताळलेल्या पण तिला माहीतच नव्हते
जखम मनात हृदयाच्या आत
फुंकर मात्र बाहेर मत्सराने दाटलेल्या भावनेवर
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
-------------------------------------
29.
नयनातील अश्रू पुसत होता
संवाद मात्र दिशाहीन चालू होता
त्याला कळलेच नाही त्या अश्रूचे अर्थ
तो मात्र सांगत होता पेटलेल्या रानाची गोष्ट
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
-------------------------------------
30.
आज ठरवले, त्याला सांगावे मनातले
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
-------------------------------------
31.
काट्यांवर चालावे इतकी परीक्षा
माझ्या - तुझ्या प्रेमात नव्हतीच जणू
तूच खोट्यांचा बाजार मांडला
सर्व काही मला माहीत असतात
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
-------------------------------------
32.
उगाच आज आकाशात उडाली
पंख घेऊन आकाशाशी स्पर्धा करत
हाती उरले आता जखमाच्या
भावनेचा बाजार प्रेमविरहाचे दुःख सोसत
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
-------------------------------------
33.
प्रेमाने बहरावे असे आता काहीच
नाही उरलेला क्षणांना आता खारे पाणीच
आहे अश्रूंच्या सोबतीने जीणे
आता कोरड्या क्षार स्वप्नांसारखे
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
-------------------------------------
34.
शब्दांनी तुझे शब्द व्हावे
भावनांनी तुझी भावना व्हावी
नयनांनी तुझे नयन व्हावे
प्रेमाला तुझी सोबत व्हावे
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
-------------------------------------
35.
प्रेमाला विसावा दिला की कळते
प्रेम कोणत्या क्षणासाठी आहे
ते क्षण जपून ठेवलेले आहे
तुझ्या माझ्या तर क्षण पवित्रासाठी
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
-------------------------------------
36.

37.
प्रश्नांना प्रश्न विचारावे इतके
आयुष्य तुझ्याजवळ होते पण
गुलमोहराचा सुगंध कधीतरी त्यात
माझ्याही वाटेला आलाच ना तुझ्यासोबत
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
-------------------------------------
38.
तुझ्या - माझ्या प्रेमाला साक्षी
आपणच तरी ही संवाद खुंटलेला
खुलामुक्त विचारांची मी आणि
तुझ्यातील पुरुषार्थ मात्र अडलेला प्रेमात
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
-------------------------------------
39.
तुझ्या-माझ्या प्रेमाला स्पर्श
गुलाबाचा होता पण आता
त्याच्या माझ्या प्रेमाला स्पर्श
आता निवडुंगाचा !!
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
-------------------------------------
40.
प्रेम वात्सल्य प्रेम माया
प्रेम जिव्हाळा प्रेम विश्वास
तुझ्यातील प्रेमळ शब्दांचा
ओलावून जाणाऱ्या क्षणपावलांचा
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
-------------------------------------
41.
तू माझ्या कवितेचा विषय नव्हताच
पण देखावा इतका होता की
गुलाबाच्या काट्यांनाही लाज यावी
माझ्या शब्दांमुळे
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
-------------------------------------
42.
उन्हाळ्यात पाऊस आणि पावसात
तू आणि मी झालेल्या
अवकाळी पावसात स्वप्न रंगीबेरंगी
दाहकता कमी असलेली
-------------------------------------
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. शब्दांनी पेरलेली नवीन माय माऊली आहे .मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे.शब्द उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
काव्यसंग्रह स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्या दुरुस्त केल्या जातील.
कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आपल्या सूचना गोड- कडू दोन्हीही शब्दात नक्की कळवा आणि मनातील विचारांना शब्द द्या..!❤
( काव्यसंग्रहातील सर्व फोटो गुगल वरून डाउनलोड करण्यात आलेले आहेत. धन्यवाद !!)
-------------------------------------
-------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा