** बदल
आजचा आणि उद्या...!!💕💔 **
नव्याने सकाळ झाली की काल काय झाले हे वाटते पण ते आपल्याला नवीन पद्धतीने मांडता येत नाही. हे फक्त माहीत असते. आठवणीत असते.
आठवणीत रेंगाळत राहते एकटेपणात ते आपल्याला राक्षसी प्रवृत्तीचे करते. दृष्टिकोन बदलतो. दरवळतो.
सगळीकडे त्याचे गंध कधी शांत भावनिक पद्धतीने तर कधी रंगहीन होत तर दुसरीकडे उद्या काय होणार आहे हे माहीत नसते.
उद्या बहिरा असतो.आंधळा असतो. लंगडा असतो आणि उद्या भविष्यहीन ही असत. अस्तित्वाच्या गणिताचे ढगाळलेले आभाळ असते. गंध सुगंधित असतो.
पाणी शांत स्वच्छ निर्मळ पवित्र असते ना!! तसेच उद्या असतो; भावनांच्या गाभाऱ्यात स्वप्नांची रांगोळी सुंदर सजवत स्वच्छ आकाशात तारे चंद्रांची सजलेली स्वप्नातील तरंगणारी एक दुनिया उद्या असते.
आज आणि उद्या मध्ये फरक फक्त इतकाच असावा. कारण आज जर बहिरा झाला तर जगायचे कसे? असलेली परिस्थिती बदलायची कशी? नव्याची पुन्हा उजळणी करायची कशी?
रंगांची उधळण करीत काळोख सोबतीला येतो. परत रंगांची उधळण करीत सकाळ सोबतीला येते. म्हणजे बदल होतो. काल काय झाले माहीत असते. उद्या काय होणार नाही मन व्याकुळ वर्तमान आणि भूतकाळामध्ये भविष्य आपले शोधत असते. पण बदल हा असतोच. हे अटळ..!
पापण्या मिटल्या की संध्याकाळ होते असे प्रत्येक क्षणाक्षणाला वाटले तर आज आणि उद्या हा फरकच राहणार नाही.आंधळा कुणीच नसेल. बहिरा कुणीच नसेल. निराश कुणीच नसेल.
वटवृक्षाच्या सावलीखाली विसाव्यासाठी कोणीच नसेल. अमृताची गोडी लागेल. आयुष्यातील प्रत्येक क्षणाला रंग नसेल. चांगले वाईट गडद फिके बदल हा वेळेनुसार होतो.
कालचा दिवस आज येऊ शकत नाही. आजचा दिवस उद्या होऊ शकत नाही. उद्याचा दिवस परवा होऊ शकत नाही. आयुष्याची वजाबाकी होऊ शकत नाही. आयुष्य नेहमी बेरजेसोबत चालते. म्हणून समुद्र किनाऱ्यावर जाताना अनवाणी पायाने चाला की पायात चप्पल बूट घालून चाला पायांचा ठसा आकृतीच्या स्वरूपात सोबत करीत राहते.
व्यक्ती परतवे वेगवेगळी असते. .....गाभा वेगवेगळ्या .....रेंगाळणारे शब्द वेगवेगळे ......तरंगणाऱ्या भावना वेगवेगळ्या ....आकर्षण फक्त त्या शांत निळ्याशार अथांग सागराचे.
आकर्षण फक्त लाटांचे मर्यादेपर्यंत येऊन परत जाणारे दळवळ फक्त शांत समुद्राच्या लाटांच्या. आवाजात एक आकर्षित लाटांच्या आवाजांचा त्या सुरेल संगीतावर नव्याने सकाळ होते.
मनात तेव्हा वाटून जाते बदल हा परिस्थितीचा बदलाची एक वाट असते. आज उद्या नसेल कदाचित ते पुसल्याही जाऊ शकत नाही पण आजचा स्पर्श उद्याच्या बदलावर नक्की होतो.
ओढ उद्याही असते पण बदल हा झालेला असतो. कारण उद्यासाठी शांत एकाकी एकटेपणाने घालविलेले अंधारमय असते. आणि या अंधारात आजचे सर्व मागे सोडले जाते.
नवी सकाळ नवीन स्वप्न नवीन आशा नवीन उदय नवीन वेळ नवीन स्वप्नांची नवे रंग नवे हसू नवे रडू नवे सर्व काही आणि बदलही नवीनच नवीन सकाळ सोबत.
बदल आज आणि उद्या आज उद्या होऊ शकत नाही उद्या आज होऊ शकत नाही.
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
==========================================================
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा