कविता ही कधी कधी एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी लिहीली जाते. विशेषता,प्रेमात!! ती कविता फक्त त्या व्यक्तीसाठी असते पण ज्या व्यक्तीसाठी लिहिली जाते त्या व्यक्तीने जर ती जपून ठेवली नाही तर समोरच्या व्यक्तीच्या काय भावना असतील या कवितेत लिहिण्याचा प्रयत्न.
एक प्रेयसी कवी आहे. तिने तिच्या भावना तिच्या शब्दात कविते मार्फत तिच्या प्रियकरायला पोहोचविली पण त्याने कशा उपयोग केला हया कवितेचा हा आशय संदर्भ या कवितेचा आहे.
कविता स्वलिखित व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद...!!💔
**डायरीतली ती कविता ***
काल मला एक कविता
कुणीतरी पाठवलेली
ती माझीच होती
माझ्या कवितेतला
डायरीतली
ते शब्द माझेच होते
ती भावना माझीच होती
कवितेचा सूरही माझाच होता
कारण ते शब्द
माझ्या भावनेचे होते
माझ्या प्रेमाचे होते
माझ्या त्या सुंदर क्षणांचे होते
जिथे मन गुंतले होते
जिथे शब्दांनी तुला
साथ दिली होती
पण आज कळले
ते शब्द
ती भावना
माझे प्रियप्रेम
माझ्या माझ्यातला असलेला तू
इतर कुणासाठी
तरी तितकाच प्रिय होता
ज्यामध्ये तुझी वासना होती
तुझा अहंकार होता
माझे शब्द
माझ्या भावना
माझे प्रेम रद्दीतला कागदांसारखे
केले ज्याला किंमत
फक्त रद्दीचीच होती
त्यावर लिहिले होते
माझ्या प्रियकर
माझी प्रियसी
माझा जिवलग
आणि माझी रद्दीतल्या
कवितेची कविता
जी तू केलेली होती
आता डायरीतली ती कविता
फाडून मीही कचरात टाकली
ओलावलेल्या भावनांसोबत
डोळे ओलावून....💔
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
******************************************************************************
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा