savitalote2021@bolgger.com

शनिवार, २५ नोव्हेंबर, २०२३

** कारण घरटे आपले आहे.*** *** Because the nest is yours.***

*** कारण घरटे आपले आहे.***  

        कधी कधी काही गोष्टी जाणीवपूर्वक आयुष्यात घडविल्या जातात. बोलल्या जातात... हे मला काही वर्षापूर्वी कळले. कधीही त्या वाटेवर न जाणारी  ती वाटच पायाखाली आली आणि घरट्याला वाळवी लागावी तशी शब्दांची वाळवी लागली.
                पांघरून किती घालावे त्या शब्दांना हेही न कळता वेळेला ते बंद दरवाजा आड शांतपणे मेंदूच्या कोपऱ्यामध्ये पेरत गेले. नेहमी वाटते पाण्यात पाय ठेवले की पाय ओले होणार पण पावसाळा असताना पाण्यात पाय ठेवणार नाही असे म्हणणे मूर्खपणाचे किंवा माझे पाय ओले होणारच नाही असे म्हणणेही मूर्खपणाचे.
 असे ना म्हटल्यास तो आपला व्यर्थ अहंकार होईल पण चांगले चांगले घेत असताना वाईट पायवाट का आली...!??? या प्रश्नाचे उत्तर कधीच मिळत नाही एकादी शब्द त्या शब्दाचा अर्थही माहीत नसताना संथपणे कोणीतरी आपल्यासाठी तो शब्द बोलून जातो. गंध नसलेल्या फुलाला जसे देव्हारा सजविले जात नाही, तसेच काही शब्द आयुष्यात कुणाच्याही येऊ नये. 
           कारण ते शब्द आयुष्याच्या देवघरात सजविले जात नाही. म्हणून काही वेळ यासाठी अशा शब्दांच्या व्यक्तींपासून स्वार्थीपणाने का होईना दूर राहा. कारण हे शब्द तुम्हाला त्या सुगंधासारखे खळखळून हसू देत नाही.
 स्तब्धता आयुष्यात नवीन नवीन जखमा घेऊन येते म्हणून नंतर नंतर होईल बरे असे म्हणण्यापेक्षा त्या व्यक्तींपासून दूर राहा.
 भळभळणारा जखमा आयुष्यभर ताज्याच राहतात. काळजावर त्या शब्दांचे वार इतके गोंदले जातात कि तिथे किनाराच मिळत नाही. खेचले जाते.... मन !!आयुष्यातील कोणत्याही वळणावर.
         म्हणून काही शब्द आयुष्याच्या त्या रंगमंचावर बेधुंदपणे येत असतील तर तिथेच त्या व्यक्तींना त्यांच्या त्या शब्दांना थांबवणे कधीही चांगले.
     निराशेच्या रानात खूंखार प्राणी खूप आहे. 
रक्ताळलेल्या तोंडाने दातांच्या मनगटांनी आणि रक्त पिणाऱ्या विचारांचे म्हणून मनाला त्या रानात नेऊ नका...!
       आपल्या आजूबाजूने कितीही वाईट शब्दांचा मारा येत असला तरी ते विझलेले रान आहे हे समजून आपल्या आयुष्याच्या सूर्याला नेहमी प्रकाशित ठेवा. नव्या युगाच्या नव्या विचारधन मनाला जागृत ठेवा...!! कारण घरटे आपले आहे.💕💕💕💕

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
******************************************************************************

*** Because the nest is yours.***

 Sometimes, some things are deliberately created in life.  They are spoken... I learned this a few years ago.  The path that never leads to that path came under the feet and the words began to dry up like a nest should dry out.
 Without even knowing how much to cover the words, they quietly planted themselves in the corner of the brain behind closed doors.  I always think that if I put my feet in water, my feet will get wet, but it is foolish to say that I will not put my feet in water during rainy season, or that my feet will not get wet.
 If we don't say this, it will be our vain ego, but when we are taking good things, why did bad things happen...!???  There is never an answer to this question, without even knowing the meaning of a single word, someone slowly speaks that word for us.  Just as a flower without fragrance is not decorated, so some words should not come into one's life.
 

Because that word is not decorated in the temple of life.  So stay away selfishly from such words for some time.  Because the word doesn't make you giggle like that scent.
 Stagnation brings new wounds in life so stay away from those people rather than saying it will be better later.
 A burning wound remains fresh for life.  The blows of those words are tattooed on the mind so much that there is no edge.  The mind is pulled !!at any point in life.
 So if some words are coming indiscriminately on that stage of life, it is never better to stop those words there.
 In the wilderness of despair there are many terrible beasts.
 Don't lead your mind into that wilderness with bloody mouth, toothy wrists and blood-drinking thoughts...!
 Always keep the sun of your life shining, knowing that no matter how many bad words surround you, it is an extinct forest.  Keep the mind awake with the new thoughts of the new era...!!  Because the nest is yours.💕💕💕💕


©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote

 Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.
******************************************************************************
 


❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...