savitalote2021@bolgger.com

मंगळवार, २८ मे, २०२४

अस होत ना तुलाही!!

      अशा प्रेयसीची ही प्रेम कथा आहे, जी प्रेमात पडते आणि ती तिच्या प्रियकराकडून काय अपेक्षा करते...    ती हिशोब मांडते.                आताच्या क्षणापासून ते श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंतचा आणि त्यानंतरचा. त्याच भाव विश्वातून ही कविता.शब्दात मांडण्याचा हा प्रयत्न.
     एक स्त्री तिचे अस्तित्व आणि तिचे प्रेम किती नाजूक धाग्यामध्ये गुंतलेले असते हे या कवितेतून सांगण्याचा हा प्रयत्न.
         कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे.
धन्यवाद💕💕

**** अस होत ना तुलाही ****

हृदयाच्या आतल्या कप्प्याला 
आता तुझी सवय झाली आहे 
क्षणिक आठवणींची ओंजळ 
सुंदर शब्दाने सजली जाते 
मनात अस होत ना तुलाही 

माझा प्रवास माझे शब्द 
तुझ्यापर्यंतच तुझ्यासाठीच असतात 
तसेच तुझेही होत असेल ना 
भावना भिजविल्या जातात 
अस होत ना तुलाही 

आनंदाची झालर सुंदर 
नक्षीकामाने सजविली जाते 
हळव्या क्षणांना सांगावे वाटते 
उगाच उमटणाऱ्या आवेगाला 
नजरेचा बंद कपाटात ठेवावे वाटते 
अस होत ना तुलाही

हिशोब ठेवावा वाटतो सवयीप्रमाणे 
तुझ्या - माझ्या नात्यातला आठवणींचा 
कधी पश्चाताप झाला तर 
निराशेच्या सुरात का होईना 
सांगावा लागेल ठरलेल्या शब्दांना 
ओठांच्या साक्षीने कपाळावरच्या आट्या मोजाव्या वाटते 
अस होत ना तुलाही

दाटून येतात भावना आशावाद 
जागा ठेवावा तुझ्या गालावर आलेल्या 
सुरकुत्यांच्या साक्षीने देह नाजूक 
सरणावर हाताने ठेवावा वाटतो 
बहरलेल्या आठवणींना सोबत 
घेऊन जावेसे वाटते 
पाण्याच्या प्रवाहात 
अंतिम क्षण देतपर्यंत 
अस होत ना तुलाही

हृदयाच्या आतल्या कप्प्यात 
आता तुझी सवय झाली आहे 
आता तुझी सवय झाली
अस होत ना तुलाही!! 


©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

******************************************************************************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गंधाळलेल्या जाणीवने

***गंधाळलेल्या जाणिवेने *** क्षणोक्षणी तुझाच भास होत आहे  पदर मायेचा ओलावा वाहते आहे  मुक्त बरसले  नयन माझे आहे  ढगांचा काय गुन्हा होत आहे  ...