savitalote2021@bolgger.com

शुक्रवार, १४ जून, २०२४

****संपते सर्वच ****


      एक प्रियसी आपल्या भावना व्यक्त करते. स्त्री म्हणजे शब्दांनी सजलेली असली तरी भावना मात्र नेहमी लपलेल्या असतात.
      त्या वाचाव्या म्हणून ती प्रयत्न करते. यश मिळत नाही आणि ती हरते. त्याच नाजूक क्षणांच्या भावविश्वातून कविता.कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे.
      आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका....!!
" धन्यवाद"!!💕

**** संपते सर्वच ****


स्मित हास्य चेहऱ्यावर 
दुःख मात्र मनात 
शांततेच्या कमतरतेमुळे 
प्रयत्न कमी पडतात 
बघू पाहते मीच 
मनाला फसवायचे प्रयत्नही करते 
पण मात्र नंतर चार पावले 
मागे जात हळूच पायांच्या 
बोटाकडे बघत 
त्याच्या चेहऱ्याकडे 
एक अनामिक शांतता निर्माण करते 
संवेदन शुन्य मनाला 
उत्तेजित करण्याचा प्रयत्न 
निर्णय चुकतो 
त्याच्या भावनेसमोर 
रस्ता धडपडत राहते 
त्याच्या मनात जाण्याचा 
रस्ता शोधत राहते 
त्याच्या प्रेमाची पातळी शोधण्याची 
पण ती दिसेनाशी होते 
आणि अंत होतो 
एका अनोळखी रस्त्याचा 
एका अनोळखी रस्ता परत 
खळखळून हसते 
तितक्यात मिठीत घेतो 
आणि संपते सर्वच 
विचारांचे शब्द अलगदपणे 
सजलेला त्या क्षणांसोबत 
सजलेल्या त्या क्षणांसोबत...!!


©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.



--------------------------------------------------------------------------

       A lover expresses his feelings.  Although a woman is adorned with words, feelings are always hidden.
        She tries to read it.  There is no success and she loses.  The poem is self-written and composed from the spirit of those delicate moments.
        If you like don't forget to like and share...!!
 "Thank you"!!💕

 **** ends all ****


 A smile on the face 
 Sadness but in the mind 
 Due to lack of peace 
 Efforts fall short 
 I want to see 
 It also tries to deceive the mind 
 But four steps later 
 Walk back slowly 
 Looking at the finger 
 to his face 
 An anonymous creates silence 
 Sensationless mind 
 Try to stimulate 
 The decision is wrong 
 In front of his feelings 
 The road continues to struggle 
 To get into his mind 
 Keep looking for a way 
 To find out the level of his love 
 But she disappeared 
 And it ends 
 An unknown road 
 Back to an unfamiliar road 
 Laughs 
 Embraces it 
 And all ends 
 Words of thought separately 
 Decorated with those moments 
 With those decorated moments...!!

©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote

         Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.

--------------------------------------------------------------------------




 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...