savitalote2021@bolgger.com

रविवार, ११ ऑगस्ट, २०२४

❤❤ओळ❤❤

       '"समर्पण",ही प्रेमाची दुसरी व्याख्या आहे. आणि याच भाव संवेदनेतून ही कविता...!❤ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे.

💕ओळ 💕

समर्पणाची मौन भाषा 
कळण्यासाठी 
एक वाक्य नक्की प्रेमाचा 
हवा असतो 
तुझ्या माझ्या ओंजळीत 
अलगदपणे 

आलेल्या स्पर्शाचा क्षणाला 
तुझ्या रानटी भाषेतला शृंगार 
प्रामाणिक शब्दांचा 
खुल्या सौंदर्याचे प्रदर्शन 
तुझ्या माझ्या लपवाछपवीचा खेळ 
सारा झेलताना 

गोजिरवाणी 
समर्पणाची एक ओळ 
वेचताना एक वाक्य नक्की
 प्रेमाचा हवा असतो
एक क्षण ओळीसाठी...!!💕❤

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 
      आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

=============================


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...