savitalote2021@bolgger.com

बुधवार, १६ ऑक्टोबर, २०२४

आनंद

      पिढीच्या गुलामगिरीची चौकट तोडल्यानंतर आम्ही धम्म स्वीकारला. बाबासाहेबांनी दिलेल्या नवीन मार्गसोबत चालत आहोत. कारण हा आनंद आम्हाला मिळाला पिढ्यांनी पिढ्या समाज व्यवस्थेच्या अस्पृश्यतेच्या चटक्यानंतर.         म्हणून आम्ही आता आनंदी राहत आहो  तो आनंद नवीन दिशेमुळे मिळाला. दीक्षामुळे मिळाला...!! ही कविता याच भावविश्वातून.                   आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यावर संशोधन केले जाईल. धन्यवाद...!🤣💕

*** आनंद ***

मी माझ्यात आनंद नवीन 
शोधला आहे दीक्षाभूमीच्या रूपाने 
फुलांची कहाणी आता 
माझी वाटते सुगंधासारखी रात्रीचा 
चंद्र अमावस्येला माझाच वाटतो 
गुलामीची बेडी तोडली म्हणून

मी पेरले आहे नवीन नाव मनात 
सांभाळले आहे नवीन नाव मनात 
कारण त्यांनी मला स्त्री म्हणून 
आनंद दिला म्हणून 
मी स्त्री म्हणून स्वातंत्र्य झाले
आहे म्हणून 

खऱ्या अर्थाने हक्काच्या जागेवर 
जबाबदारीने  
डोळ्यातला समानतेच्या भावनेवर 
जगण्याची नवीन वाट 
आनंदाने स्वीकारले गावकूशाबाहेरील 
अनुभवाच्या चटकांनी 
म्हणून मी उदास खिन्न राहत नाही 
हसऱ्या चेहऱ्यांनी
दीक्षा नवीन आरंभामुळे...!💕😀

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

          ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------


After breaking the chain of generational slavery, we accepted the Dhamma.  We are walking with the new path given by Babasaheb.  Because we got this happiness after generation after generation of untouchability of social system.          So we are happy now because of the new direction.  Got due to initiation...!!  This poem is from this spirit.                    Don't forget to like and share if you like.  The poem is handwritten and composed.  If there are any errors, please let us know in the comment box.  It will be researched.  Thank you...!🤣💕

 *** joy ***

 I new joy in me 
 It is found as initiation ground 
 The story of flowers now 
 I think like the fragrance of the night 
 The moon feels like mine at Amavasya 
 As the shackles of slavery were broken

I have planted a new name in my mind 
 A new name has been taken care of 
 Because they took me as a woman 
 For pleasure 
 I became free as a woman
 as is 

 In the real sense of rightful place 
 responsibly  
 On the sense of equality in the eye 
 A new way of living 
 Happily accepted outside the village 
 By experience 
 So I don't stay depressed 
 With smiling faces
 Initiation due to new beginnings...!💕😀

 ©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote

         Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.

         The blog is my home of words.  The mind is happy while picking the flowers of poems, now you must visit the blog to pick those flowers.  I express my feelings in such a way.  Welcome to this human threshold of words.  If you have come to this threshold, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
            If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...