savitalote2021@bolgger.com

बुधवार, १६ ऑक्टोबर, २०२४

**** सुगंधित पाने ****

       बाबासाहेबांच्या कष्टाचा लढायच आणि घामाचा सारा हिशोब आता चुकता केला जात आहे. जीवन जे बाबासाहेबांनी आम्हाला दिले त्या वाटेवर चालून आम्ही आमच्या आयुष्य सुगंधित करिता याच भावविश्वातून ही कविता.

       कविता स्वरचित व स्वलिखित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, त्यावर संशोधन केले जाईल. धन्यवाद...!💕


**** सुगंधित पाने ****

सारा हिशोब आता 
चुकता होत आहे 
जळलेल्या जातिव्यवस्थेवर 
इतिहासाचे पाने खुले 
होत आहे मोकळा श्वास घेण्यासाठी 
अजून वादळे शांत झाली नाही 
तरी मनाच्या गाभाऱ्यात असीम 
शांतता नांदत आहे 

प्रगतीच्या टप्प्याटप्प्यावर 
अनेक वादळांना 
शांत करीत 
जागृता ही दीक्षेची
मनात आसवांचा प्रत्येक 
अश्रूंच्या आता 
हिशोब घेतला जात आहे 

विज्ञानाचा शिक्षणाचा 
उपयोग मानव म्हणून होण्यासाठी 
केला जात आहे 
मोकळा शाळेच्या भिंती आमच्या आहे 
मंदिराच्या नसल्या तरी 
दीक्षाभूमीची पायवाट मोकळी आहे 
समाजातील वंचित गुलामांना 

तिथे विचारले जात नाही जात 
कोणतीही जात 
तिथे फक्त 
माणूस तितका महत्त्वाचा 
महाभारत लिहून काही साध्य होत नाही त्यासाठी संविधान लिहावे लागते 
खुल्या नयनांनी 

जखमांचा हिशोब 
आता पूर्ण होत आहे 
अत्त दीप भव या महामंत्राने 
स्वय:दीप होण्यासाठी 
नव्या जाणिवेचा 
नव्या मानवतेचा 
नव्या प्रगतीचा
नवीन आठवणींच्या सुगंधाचा....!!💕
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------

      Babasaheb's hard work and sweat are now being miscalculated.  By following the path of life that Babasaheb gave us, we perfume our lives with this poem.
       The poem is composed and handwritten.  Don't forget to like and share if you like.  If there are any mistakes be sure to report them in the comment box, they will be researched.  Thank you...!💕


 **** fragrant leaves ****

 All calculations now 
 Missing 
 On the charred caste system 
 Open the pages of history 
 To breathe freely 
 The storm has not yet subsided 
 Yet infinite in the core of the mind 
 Peace is falling 

Stages of progress 
 Many storms 
 calming down 
 Awakening is initiation
 Every emotion in the mind 
 Tears now 
 Reckoning is being done 

 Science education 
 To be used as a human being 
 is being done 
 Open school walls are ours 
 Although not of the temple 
 The path to Dikshabhumi is clear 
 To the deprived slaves of the society 

 There is no asking 
 any caste 
 Just there 
 Man is so important 
 Nothing is achieved by writing the Mahabharata, for that a constitution has to be written 
 With open eyes 

 Calculation of injuries 
 Completing now 
 With the great mantra of 
 Atta Deep  Bhava 
 To be self-lit 
 A new sense 
 A new humanity 
 of new progress
 The scent of new memories...!!💕

 ©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote

         Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.The blog is my home of words.  The mind is happy while picking the flowers of poems, now you must visit the blog to pick those flowers.  I express my feelings in such a way.  Welcome to this God threshold of Shabda Swaras.  If you have come to the threshold of God, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
            If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...