savitalote2021@bolgger.com

शनिवार, २८ डिसेंबर, २०२४

समर्पण

    उध्वस्त समाजाच्या उध्वस्त कहाणीचे शिल्पकार आहे बाबासाहेब. अस्पृश्यतेच्या कैदखान्यातील हिरो आहे बाबासाहेब.म्हणून समर्पण माझे त्यांच्या त्या विचारांशी आहे जी गर्जना येवला त्यांनी केली आणि त्यानंतर जीवनभर संघर्षाच्या वाटेवर चालत राहिले माणुसकीची ओंजळ दिली.... 
       याच भाव विश्वातून ही कविता. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चुका असल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्यावर संशोधन केले जाईल...! धन्यवाद❤

*** समर्पण ***


समर्पण माझे तुझ्या विचारांशी आहे 
म्हणून एकनिष्ठ आहे दीक्षाभूमीशी 
गर्जना भीमाची येवल्यात 
ऊन सोसूनी संघर्ष करुनी 
ज्ञानदीप उजळून समानता
बहुजनांच्या समाजात
रुजवली म्हणून
 
बुद्ध पेरला विचारांच्या 
काळा सुपीक मातीत 
पुस्तकाच्या संगतीने 
चेतना दीपस्तंभाची 
समर्पण माझे त्या विचारांशी 
स्वीकारलेल्या त्या धम्मरूपी 
समानतेचे गर्जनेशी 

होती ती माणूसकी  
म्हणून जगण्याचा हक्क दिला  
तो कणाकणात रुजवण्यासाठी 
ज्ञानाचा प्रखर प्रहार होता 
म्हणूनच समर्पण माझे 
त्या विचारांशी दीक्षाभूमीशी 
समर्पण माझे समतेशी 
समर्पण माझे त्या गर्जनेशी 
समर्पण माझे दीपस्तंभशी 
समानतेच्या वाटेवर  
जगविणाऱ्या धम्मचक्र 
परिवर्तनाशी...!!💕😀

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

          ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------

     Babasaheb is the architect of the ruined story of the ruined society.  Babasaheb is the hero in the prison of untouchability. So my dedication is to his thoughts which roared and then followed the path of struggle throughout his life and gave an air of humanity.... 
         This poem is from this Bhav universe.  Don't forget to like and share if you like.  If there are any errors, please report them in the comment box, they will be researched...!  Thank you❤

 *** Dedication ***


 My devotion is with your thoughts 
 So loyal to Dikshabhumi 
 Bhima roared 
 Struggle with warmth 
 Equality by shining a light
 In the society of Bahujans
 As rooted
  
 Buddha planted thoughts 
 Black fertile soil 
 In association with the book 
 Consciousness of the lighthouse 
 My dedication to those thoughts 
 According to the accepted Dhamma 
 with a roar of equality 
She was human  
 So given the right to live  
 To ingrain it in the dough 
 Knowledge was a strong blow 
 Hence my dedication 
 Initiation with those thoughts 
 Dedication is my equal 
 Surrender me to that roar 
 My dedication to the lamppost 
 On the road to equality  
 Dhammachakra that gives life 
 With transformation...!!💕😀

 ©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote

         Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.

            The blog is my home of words.  The mind is happy while picking the flowers of poems, now you must visit the blog to pick those flowers.  I express my feelings in such a way.  Welcome to this human threshold of words.  If you have come to this threshold, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
            If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------

       


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...