savitalote2021@bolgger.com

शनिवार, २८ डिसेंबर, २०२४

आरसा

    इतिहासाची पाने साक्षी आहे विकासाच्या रथक्रांतीची आरंभ नवा युगाचा ज्ञानज्योतीची पण आता परिस्थिती बदलत आहे का? हा प्रश्न मनात येऊन जातो.
       त्या मानसिकतेला आरसा दाखविण्यासाठी हे शब्द.....! त्या शब्दाच्या भाव विश्वातून भाव संवेदनेतून हे शब्द.
        आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यावर संशोधन केल्या जाईल. धन्यवाद....💕😀!!

*** आरसा ***

जाणून बुजून जाऊ नको 
त्या अस्पृश्यतेच्या वर्णव्यवस्थेच्या 
वणव्यात कारण तो 
वणवा विझविला आहे 
जातीधर्माच्या गावामध्ये 
पंख प्रगतीचे छाटले होते 
आता ते पंख आकाशात 
प्रगतीच्या गाणे गाऊ दे 
माणसाला माणूस म्हणून 
जोडणाऱ्या त्या बुद्ध धम्माला 
शरण गेला नाहीस तरी चालेल 
पण एकजुटीने मात्र राहू या 
कुंपणाचे दार आता 
धम्माचे झाले आहे 
प्रेमाची भाषा इतिहास लिहून ठेवतो 
देववादाची ठिणगी 
जगण्याच्या वाटेवर लावू नको 
समानता बंधुता न्याय स्वातंत्र्य 
हेच माणसाचे गाणे आहे 
जिंकण्याच्या नशेत 
हरवणारी वर्णव्यवस्थाकडे 
जाणून बुजून जाऊ नकोस
प्रहार भिमाच्या वाणीचा 
सोबत आहे म्हणून आरसा 
तुला या चार शब्दांचा 
माणुसकीचे पाने जोडणारा 
या अनोखी प्रवासाचा 
ऊन सावलीच्या खेळाची तुलना 
न करता वसंताचा फुलोरा 
मात्र मनात ठेवूया 
दिनदुबळ्यांच्या आत्मविश्वासाची 
विज्ञानयुगाच्या बुद्धाकडेच आहे 
स्वयंःदीप होण्यासाठी 
आरसा आहे या शब्दात 
वैचारिक स्वयंभू होण्याचा 
मध्यम मार्गाच्या 
जगण्याचा....!!💕😀


©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

          ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------

     The pages of history bear witness to the beginning of the chariot revolution of development, the light of the new era, but is the situation changing now?  This question comes to mind.
         These words to show a mirror to that mentality.....!  This word from the sense of the sense of that word.
          Don't forget to like and share if you like.  If there are any mistakes, please let me know in the comment box.  It will be researched.  Thanks....💕😀!!

 *** Mirror ***

 Don't go knowingly 
 Of that color system of untouchability 
 Because he is in the forest 
 The wildfire is extinguished 
 In a caste village 
 Wings were trimmed of progress 
 Now those wings in the sky 
 Let us sing the song of progress 
 Man as man 
 To that Buddha Dhamma that connects 
 Even if you don't surrender, it will work 
 But let's stay united 
 Fence gate now 
 Dhamma is done 
 The language of love writes history 
 Spark of Deism 
 Don't let it get in the way of living 
 Equality Fraternity Justice Liberty 
 This is the song of man 
 Drunk on winning 
 Toward a losing streak 
 Don't be fooled
 Prarah Bhima's voice 
 A mirror is also included 
 Tula these four words 
 The adder of humanity 
 This unique journey 
 Comparison of sun and shadow play 
 Spring blooms without 
 But let's keep in mind 
 Confidence of the weak 
 The Buddha of the science age has it 
 To become self-luminous 
 In this word there is a mirror 
 To become ideologically independent 
 of the middle way 
 To live...!!💕😀


 ©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote
Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.

            The blog is my home of words.  The mind is happy while picking the flowers of poems, now you must visit the blog to pick those flowers.  I express my feelings in such a way.  Welcome to this human threshold of words.  If you have come to this threshold, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
            If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹


--------------------------------------------------------------------------

       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...