savitalote2021@bolgger.com

गुरुवार, १० एप्रिल, २०२५

सवय

*** सवय ***

 सवय नव्हती मला कूणाची 
पण तो सवय लावून गेला 
हसण्याची स्वप्न बघण्याची सजण्याची 
मी चालले होते माझ्या सरळ रस्त्याने 
त्याने मला वळणदार रस्ते 
दाखवून दिले आनंदाचे 
आडोशाचे आणि सोडून गेला 
अर्ध्या रस्त्यावर आडोशाच्या वळणदार 
सवय आता सुटत नाही 
काय करायचे त्याचे 
आता सुचत नाही 
मग त्याची सुटली असेल का?
माझी सवय...!
हे प्रश्नचिन्ह आहे 
काळाभोर चेहऱ्याच्या त्या कृष्णाला 
राधेची सवय सुटली होती का रे ?
आणि राधेलाही तुझी सवय सुटली होती का रे ?
सवय लावून गेला 
सवय नसलेल्या मनाला!!

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹


=============================





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

मासिक बाई पण

*** मासिक बाईपण*** वेदनेच्या त्या दिवसात  आधार फक्त वेदनेचाच असतो  पूर्णत्वाच्या विचाराने  बाईपण जगत असते  वेदनेचा काय घेऊन बसले  मासिक धर्म...