savitalote2021@bolgger.com

मंगळवार, ८ एप्रिल, २०२५

तुझ्या मिठीत

** तुझ्या मिठीत **

हे खरे आहे अजूनही 
तू आयुष्यात आला नाहीस 
म्हणून आयुष्य संपल नाही 

तुझ्याविना काही गोष्टी 
जमल्या नाही हे खरे 
पण अजूनही वाट आहेच 

तुझ्या येण्याची 
अगदी मनापासून 
आनंदाच्या सोहळासोबत 

रखरखता  उन्हाच्या दाहकतेसोबत 
पावसाचा पहिल्या थेंबापर्यंत 
गुलाबी थंडीचा आस्वाद येईपर्यंत 

फुललेल्या मनाला 
अधिक फुलविण्यासाठी 
तुझ्या मिठीत

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹


============================




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

त्याच्यात गुंतने

*** त्याच्यात गुंतने *** जितके टाळावे वाटते  तितके तुझ्याकडे चालली  आहे गुंतत त्याच काठावर बसून  कुठल्यातरी नात्याची  जोड देत आहे  तू समजू न...