savitalote2021@bolgger.com

शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०२५

तुझ - माझ( प्रेम कविता )

       एक प्रेयसी आपल्या प्रियकराला आपल्या मनातल्या भावना पुढील प्रमाणे व्यक्त करत आहे. हळूहळू दुःखाच्या पायवाटेकडे जाणे हे आपल्या नात्याला न शोभणारी गोष्ट आहे म्हणून आपण आता सुखद प्रवासाकडे वाटचाल करूया. या शब्दात आपल्या भाव संवेदना सांगत आहे.
       कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. काही चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद...!!

         ** तुझा -माझा **

तुझ माझ - माझ तुझ आता करायच नाही 
हळव मन आता हळव होऊ द्यायच नाही 

तू तुझ्या ठिकाणी सुखी रहा 
मी माझ्या ठिकाणी सुखी राहील 

यातच आपल  सुख आहे डोळ्यातल्या डोळ्यात 
हलणार पाणी आता मला नको आहे

तुझ्या माझ्या सुखाची पायवाट आहे 
तुझ्या माझ्या दुराव्यात आहे 

तुझ्या माझ्या मनातला भावना माझ्या तुझ्या आहे 
प्रेम समर्पित आहे तुझ्यासाठी तुझ माझ्यासाठी

तुझ्या प्रेमासाठी तुझ्या हसऱ्या डोळ्यांच्या 
त्या हसरा भावनेसाठी आयुष्याच्या सुखद प्रवासासाठी

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
--------------------------------------------------------------------------



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राहूनच गेले ( प्रेम कविता )

एक प्रेयसी आपल्या प्रियकराच्या मेसेज साठी वाट बघते आहे पण तो मेसेज आल्यानंतर त्याच्याकडून नात्यात मर्यादा आहे याची आठवण करून देणारी ही कविता...