वर्णव्यवस्थेच्या बंधन व्यवस्थेत असलेले आम्ही हक्काची मशाल घेऊन बाबासाहेबांच्या वाटेवर हक्काने लढतो आहे. यामध्ये कितीतरी समर्पण चळवळीसाठी, स्वातंत्र्य व्यक्तिमत्वासाठी समतेसाठी, नवयुगाच्या विचारांसाठी द्यावे लागते याच भावविश्वातील एक प्रियकर प्रेयसीची भेट परत झाली तरी तो ती भेट चळवळी समोर जिवंत विचाराच्या व्यक्तिमत्व समोर बलिदान देते.
.....💞 आणि नतमस्तक होतो बाबासाहेबांच्या विचारांवर,समानतेच्या पायवाटेवर विचार स्तंभावर तो ती भेट शेवटची ठरवतो. चळवळीचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. सामर्थ्यासाठी स्वातंत्र्य नवयुगाच्या नवज्योतीसाठी याच भावविश्वाशी संबंधित ही कविता.
आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. धन्यवाद...!!
*** भेट ***
आज नव्याने नवीन भेट झाली
चळवळीचा झेंडा खांद्यावर घेताना
माझी - तिची नजर भेट झाली
पावसाने चिंब भिजलेली ती.
चिंब भिजलेला मी
तसाच विचारांच्या गर्दीतही मी
पेटवत आहे मशाल नवीन
विचारांची नवीन वर्तुळकार
नव्या धम्माचा विचारात
गुंतला जीव माझा
जागेपणीच भरलेला नवीन मन माझे
जुने जाळ्यात अडकेल असे वाटते
त्या क्षणाला चळवळीचा झेंडा
हवेच्या साक्षीने विद्रोह करू पाहतो
पण मी नवा धम्म घेतला आहे
नवा विचाराचा
नवीन आरंभ नवयुगाचा
भेट माझी माझाशीच माझ्याशी
विद्रोहाच्या चळवळीची
नवीन शांत अहिंसा या शब्दांशी
नवा विचारांसोबत
नवयुगाचा नवा आरंभासोबत
गौतम बुद्धाच्या धम्मा सोबत उजळून
आला दाही दिशा प्रकाशमय होऊन...!!💞
आता तिची भेट जुनीच राहू देतो मी
नवा आरंभ प्रवास केला आहे
बाबासाहेबांच्या मशाली सोबत...
चळवळीचा झेंडा खांद्यावर घेऊन
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
============================
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा