savitalote2021@bolgger.com

मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२६

माझाच

*** माझाच ***

घाई गडबडीतच का होईना 
तू भेटतो सुरुवात 
तशी नेहमीसारखीच 
हसऱ्या डोळ्यांनी हसऱ्या ओठाने 
व्यक्त होत राहतो 

कितीही गडबडीत असल्यास तरी 
हरवून जावे वाटते 
त्या क्षणात पण 
तू तर गडबडीतच असतो 

तुझी नजर माझ्या शब्दांच्या 
त्या शब्द मागच्या शब्दांकडे असते 
माझी नजर तुझ्या नजरेने 
नव्याने प्रेमात पडावे असी असते 

इतकीच काय माझ्या 
प्रेमाची व्यापकता 
हरवलेल्या मनाला लाजावे 
की हसावे हेही कळत नाही 
तितकी असते आपल्यामध्ये 

तरीही रोज नव्याने प्रेमात पडते 
आणि रोज नव्याने प्रेमात पडावे 
म्हणून तितकाच प्रयत्न करतो 
एक सांगावसे वाटते 
या घाई गडबडीतच 

तू विचारावे मला किती प्रेम करतेस  
मी सांगावे शून्य प्रेम करते 
आणि घाई गडबडीत सांगून जावे 
भेटू परत miss you love you 
ते प्रेम करावे इतके 
प्रेम करावे

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

         आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.           
       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माघार

बाबासाहेबांच्या विचारावर चालणारी प्रियसी, तिच्या प्रियकराला हे सांगत आहे कारण आम्ही नवा आरंभा नवयुगाच्या या तत्त्वानुसार आम्ही चालत आहे गावक...