सोबत
सोबत होतो, हातात हात नव्हता
सोबत होतो, ओठांवर शब्द नव्हता
सोबत होतो , पण ...नजर रस्त्यावरील वर्दळीकडे
सोबत होतो, पण लक्ष बॅगेतील मोबाईल
कडे आला तर?
सोबत होतो, चहाच्या टपरीवर बिस्किट एकमेकांना देण्यात मात्र
लक्ष्य एकमेकांच्या शब्दाविना संवादकडे सोबत होतो, आभाळा एवढ्या प्रेमाने
पण हसर्या ओठांनी अन
बोलता डोळ्यांनी
आजही,सोबत आहो...एकमेकांच्या आठवणीने
आपआपल्या... भाव संवादामध्ये
सविता तुकाराम लोटे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा