savitalote2021@bolgger.com

गुरुवार, २४ जून, २०२१

गुलाब पुष्पाने



****  गुलाब पुष्पाने ****

गुलाबाने हसायला शिकविले 
रंगाने जगायला शिकविले 
संपूर्ण विचारांना लिहायला शब्दांनी शिकविले माझ्या तुझ्या नात्याला 
मनस्वी अर्थ दिला 
बोलताना चालताना हसायला 
तुझ्या हातातील 
गुलाब पुष्पाने!

            ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- 🌹 गुलाब पुष्पाने *
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you

*************************************

आयुष्य


               



                 ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  आयुष्य 
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you


----------------------------------


-------------------------------

मंगळवार, २२ जून, २०२१

दलितांचे कैवारी सामाजिक क्रांतीचे अग्रदूत छत्रपती शाहू महाराज

             
             आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, दलितांचे कैवारी, आरक्षणाचे अग्रदूत, बहुजन प्रतिपालक, सामाजिक क्रांतीच्या उत्थानासाठी ब्राह्मणवादी विचारसरणीला समूळ नष्ट करण्याचा विडा उचलणारे, सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, पुरोगामी राजा, बहुजनाचे कैवारी, बहुजन हिताय बहुजन सुखाय या न्याय तत्वावर चालणारे, सामान्य माणसातील विकासाचे शक्तीस्थळ, औद्योगिक क्रांतीत गरुड झेप घेणारे एक वादळ छत्रपती शाहू महाराज!!

         छत्रपती शाहू महाराज आणि सामाजिक समता हे समीकरण फार महत्त्वाचे आहे. शाहू महाराजनी आयुष्यभर बहुजन समाजासाठी कार्य केले. एक नवविचारांची प्रयोगशील राजे समाजसुधारक कृतीशील राजा विचारवंत संशोधक होते. 


व्यवस्था परिवर्तनासाठी 
शिक्षणाची धरली साद 
सर्वसामान्यांच्या उद्धारासाठी 
सक्ती शिक्षणाची, दारे उघडी केली 



              सामान्य माणसांच्या अंतकरणात कायमस्वरूपी लोकराजा रयतेचा राजा सामान्य माणसाच्या उद्धारासाठी वापर करणारा सहज सोप्या भाषेत तळागाळातील जनतेपर्यंत आपल्या आधुनिक विचार पोचविणारा छत्रपती शाहू महाराज यांची जयंती 26 जून ला सामाजिक न्याय दिवस म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरी केली जाते.

             बहुजनांच्या विकासाचे शक्तीस्थळ छत्रपती शाहू महाराज यांचे विचार नवीन दिशा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे शाहू महाराज सामाजिक शैक्षणिक आर्थिक राजकीय धार्मिक कृषी सहकार इत्यादी क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली. छत्रपती शाहू महाराज आरक्षणाचे प्रणेते होते आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार पुरोगामी राजा होय.

             मराठ्यांच्या भोसले घराण्याचे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक  शाहू महाराज मानले जातात. कोल्हापूर राज्याचे पहिले महाराज ते महाराष्ट्रातील इतिहासातील एक अमूल्य रत्न होय.  महात्मा फुले यांच्या सामाजिक चळवळीच्या विचारांचे मोठ्या प्रमाणावर प्रभाव  शाहू महाराजांच्या विचारांवर होता. छत्रपती शाहू महाराजानी महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्यांचे नेतृत्व केले बहुजन समाजाला मानसन्मानाची जीवन दिले छत्रपती शाहू महाराज आदर्श सामाजिक क्रांतीचे प्रणेते होते. त्या काळात असलेल्या जातीपातीच्या लढाईचा महानायक एक आदर्श नेता होते. त्यांना आपल्या राज्यात निम्मे जातीच्या जनतेसाठी अथक परिश्रम करून समानतेच्या नारा दिला. सर्व जाती धर्माकडे समाजातील रूढी प्रथा परंपरा तिकडे दुर्लक्ष करीत मानवतेच्या लढाईमध्ये त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत अनेक समाजपयोगी नवविचार समाजामध्ये रूढ केले.




         कोल्हापूरचे शाहू महाराजांचा जन्म २६ जून१८७४ मध्ये कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव आणि आईचे नाव राधाबाई होते. शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. ते तीन वर्षाचे असतांना आईची माया हरवली. कोल्हापूरचा राजा शिवाजी चतुर्थीच्या विधवा आनंदीबीने  त्यांना दत्तक घेतले. त्या काळातली दत्तक नियमानुसार मुलांच्या रक्तात भोसले घराण्याचे रक्त असेल तरच त्यांना दत्तक घेण्याची मान्यता होती आणि यशवंतराव यांचे कुटुंब भोसले रक्ताचे होते. 


             शाहू महाराजांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण करून प्रिन्स कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केले. १८९४ राज्यभिषेक झाला त्यावेळी ते वीस वर्षाचे होते आणि खऱ्या अर्थाने छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याला एक नवी दिशा मिळाली. शाहू महाराजांचे लग्न बडोद्याच्या लक्ष्मीबाई खानविलाकर यांच्याशी झाला.



अंधारातील वाटेला प्रकाश तू 
मन परिवर्तनाचा पायात तू 
स्पर्श झाला तुझा...
नवविचारांचा दिशेने बदलली 
समाजव्यवस्था नवनिर्मितीच्या नवीन पाऊलखुणांच सोबत..
रयतेचा राजा तूच 
समानतेचा राजा तूच



           १८९४ ते १९२२ या  २८ वर्षाच्या काळामध्ये कोल्हापूरच्या गादीवर होते. ही कारकीर्द कोल्हापूर संस्थानातील महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण मानले जाते. कारण शाहू महाराजांनी फक्त राजा म्हणून राज्य केले नाही. तर आपल्या साम्राज्यात अनेक सामाजिक सुधारणा केल्या खालच्या जातीसाठी बरीच कामे केली. त्यांचे श्रेया छत्रपती शाहू महाराजांना जाते. संस्थांना साक्षरतेचे प्रमाण कमी होते मागासलेला समाज स्पृश्य-अस्पृश्य जातीवादाने पोखरलेला होता समाज शिक्षण सत्ता संपत्ती ज्ञान या गोष्टी पासून वंचित होतात का त्यांचे सतत शोषण होत होते सुशिक्षित विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून दिला.दुर्लभ घटकांसाठी  ५० टक्के आरक्षण सर्वप्रथम महाराजांनी दिले.  २६ जुलै १९०२ मध्ये त्यांनी लंडनमधून आदेश काढून क्रांतिकारी पाऊल शाहू महाराजांनी उचलले.

               महाराष्ट्राच्या इतिहासाला एक अमूल्य रत्न मिळाले. सामाजिक सहरचना ही मानवतेवर समानतेवर आधारित असावी. या विचारांना त्यांनी आपले कार्य सुरू केले. सामाजिक चातुर्यवर्ण व्यवस्थेमुळे आर्थिक सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक शेती खेळ स्त्रियांचे प्रश्न इत्यादी क्षेत्रामध्ये बहुजनांचे शोषण केल्या जात होते पाणी रस्ते शेती कला व्यापार ह्या मागास होता महाराजांनी आपल्या रंजल्या-गांजल्या लोकांसाठी सत्तेचा उपयोग सुधारण्यासाठी केला नवनवीन प्रयोग करण्यास सुरुवात केली.

      शिक्षण माणसाच्या प्रगतीचा पाय आहे. प्राथमिक शिक्षण ही सर्वात महत्वाची प्राथमिकता असावी म्हणून शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्षणावर भर दिला. आपल्या साम्राज्यात अनेक सामाजिक सुधारणा सुरु केल्या. खालच्या जातींसाठी बरेच समाज प्रयोगी सुविधा खालच्या जातीसाठी सुरू केला.

          शिक्षण जनसामान्यांपर्यंत पोहोचावे त्यासाठी शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी शैक्षणिक कार्यक्रम सुरू केले. जातीपातीच्या संघर्षाच्या लढाईमध्ये त्यांनी सर्वप्रथम शिक्षण शस्त्र उपयोगात आणले. त्यांनी सर्व जातीच्या लोकांसाठी शाळा काढल्या.मिस क्लार्क बोर्डिंग हे वसतिगृह उभारले. अस्पृश्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयीसाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल्या. शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहित केले. महाराजांनी  १९०७ ते १९१६ या काळात सक्तीचे प्राथमिक शिक्षण केले गेले प्राथमिक शाळा महाविद्यालय उघडण्याचा आले रंजल्या गांजल्या बहुजन समाजाला शिक्षणाची दारे उघडी करण्यात आली. १८ फेब्रुवारी १९०७ रोजी राधानगरी धरण सुरू केले. हा प्रकल्प १९३५ मध्ये पूर्ण झाला. धरणाच्या परिसरातील जनतेच्या पाण्याची संपूर्ण व्यवस्था झाली.




         
          राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.  बहुजन समाजाला त्यांचे राजकीय हक्क देण्यासाठी १९१६ मध्ये डेक्कन रयत असोसिएशन संस्थेची स्थापना निपाणी येथे  केली. १९१८  साली त्यांनी आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी १९१९ मध्ये स्वर्ण व अस्पृश्य या दोघांनाही एकत्र आणण्याचे काम छत्रपती शाहू महाराजांनी केले. समाजातील सर्व विद्यार्थ्यांना एकच शाळा असावी या विचारातून त्यांनी एकत्र शाळा भरविल्या. व्यवसायिक शिक्षण शाळेमध्ये देण्यास सुरुवात केली. तंत्र व कौशल्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांना नवनवीन उपक्रम त्यांनी राबविले. अस्पृश्य समाजातील लोकांना उपहारगृहे हॉटेल दुकाने काढण्यास आर्थिक साहाय्य केले.
१९२० मध्ये घटस्फोटाचा कायदा केला.

दाविली वाट आरक्षणाची 
प्रगतीसाठी.....पहिली 
जागविला मानसन्मान 
तयांच्या विचारधारेने 
शूद्र अतिशूद्रांचे जीवन 
केले सन्मानाचे 
प्रहार केला अंधश्रद्धा 
कर्मकांड... दैववादावर 
प्रहार ब्राह्मणवादी विचारसरणवर
विश्वास धरिला नव तंत्रज्ञानावर 
मूलनिवासी आम्ही 
अधिकार आम्हा आमच्या 
प्रगतीचा...
दिला मानसन्मान तू 
दलितांचा राजा ...
..........दलितांचा राजा



             संस्कृत भाषेवर फक्त उच्चवर्णीयांचा अधिकार आहे. अशा मानणाऱ्या समाजामध्ये त्यांनी संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा सुरू केल्या आणि समाजातील प्रत्येक जातीतील विद्यार्थ्यांना संस्कृत भाषा खुली करून दिली.

            महाराजांनी समाजातील प्रत्येक समाज वर्गाची प्रतिष्ठा वाढावी वर्षानुवर्ष ज्या समाजाला गुलामगिरीचे अस्पृश्य म्हणून प्रत्येक हक्कापासून वंचित ठेवले हा कलंक घालवावा यासाठी त्यांनी विविध उपाययोजना केले.  त्यांचे प्रयत्न विशेष मोलाचे होते. महाराजांनी महार वतने नष्ट केली. रामोशी यासारख्या जातीच्या लोकांना रोज पाटलाकडे वर्दी द्यावयास लागे त्या पद्धती रद्द करण्यात आला मोटार चा ड्रायव्हर चाबूक स्वार माहूत हे महार असावे असे आदेश काढण्यात आले. छत्रपती शाहूमहराज समाजातील सर्व स्तरावरील समानतेचे पुरस्कर्ता होते.

             वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून वेदोक्त संघर्ष शाहू महाराजांच्या कळात झाला.  वेदोक्त प्रकरणावरून त्यांना जातीयतेचा अनुभव आला माझ्यासारख्या राजा बरोबर हे असे वागू शकतात तर सामान्य माणसाचे काय खरे आहे आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात एका नवीन सामाजिक सुधारणावादी वादळाची सुरुवात झाली.

       छत्रपती शाहू महाराजांनी स्पिनिंग अँड विव्हिंग मिलची स्थापना केली.  शेतकऱ्यांसाठी बाजारपेठेचे आणि व्यापारपेठेची स्थापना केली गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती त्यांनी केली गोरगरीब जनतेसाठी विविध उपक्रम संस्थांना मार्फत राबविण्यात आले सहकारी संस्थांची स्थापना करण्यात आले संस्थान आर्थिक सहाय्यता देण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देत असे शेतीसाठी आधुनिक शेती विषयक संशोधनाचा प्रकल्पांना मान्यता दिली शेतीमध्ये आधुनिक उपकरणाच उपयोग करावा हे आग्रही भूमिका शाहू महाराजांची होती त्यासाठी त्यांनी किंग एडवर्ड ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूटची स्थापना केली.

              छत्रपती शाहू महाराज यांची ओळख भीमराव आंबेडकर यांच्याशी झाली.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्पृश्यबद्दलच्या महान क्रांतिकारक विचारांशी शाहू महाराज सहमत होते. डॉ. आंबेडकर यांच्या सर्वांगीण क्षेत्रातील विचारांना समर्थन देत.  सामाजिक जातीभेदाचे रूढी प्रथा परंपरेचे नकारात्मक झाडे समूळ उच्चाटन करण्यासाठी शाहू महाराजांनी सतत डॉ. आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहिले. १९२०  रोजी त्यांनी अस्पृश्यांच्या सुधारणेसाठी एक परिषद आयोजित केले. आणि छत्रपती शाहू महाराजांनी डॉ. आंबेडकर यांना अध्यक्ष बनविले. कारण त्यांना विश्वास होता की डॉ. आंबेडकर समाजातील विविध घटकांच्या उन्नतीसाठी काम करणारे नेते होते आणि करत राहतील. शाहू महाराजांनी डॉ. आंबेडकर यांचे वृत्तपत्र 'मूकनायक' सुरू करण्यासाठी देणगी दिली.      






          डॉ. आंबेडकर यांना "सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ ", असे समर्पक शब्दात वर्णन केले. छत्रपती शाहू महाराज माझ्यानंतर अस्पृश्यउद्धारक म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच असतील. असा मोठा मानाचा राजा होता. जो आपल्याला आज विविध क्षेत्रात शोधूनही सापडणार नाही म्हणूनच छत्रपती शाहू महाराजांना यशवंतराव चव्हाण यांनी मोठ्या दिलाचा राजा असे म्हटले आहे.

  
         महाराज यांनी फक्त कोल्हापूर संस्थान यासाठी कार्य न करता संपूर्ण महाराष्ट्रासाठी कार्य केले.  कोल्हापूर संस्थानाचे राजे असूनही सामाजिक प्रतिष्ठा जपत नवविचारांची कास धरत छत्रपती शाहू महाराजांनी लोकशाही पद्धतीने सर्वव्यापक राज्यकारभारा चालविला.  छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात संगीत लोककला चित्रपट चित्रकला यांनाा राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. यामुळे या क्षेत्रातील  कलाकारांसोबत याा कलेचा विकास होत गेला.
  
           छत्रपती शाहू महाराजांनी औद्योगिक क्षेत्रात गरुड झेप घेत सूतगिरण्या कापड गिरण्या सुरू केल्या उद्योगाला प्रोत्साहन दिले.

          राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर बेळगाव येथे स्वातंत्र्यवीरांना वेळोवेळी आर्थिक मदत देऊ केली.

आधारस्तंभ बहुजनांचा 
समानतेची दारे खुली
करून नसानसात नैतिकता 
निर्माण केली सकारात्मक 
वैचारिक विचार जागृत केले 
गुलामगिरीच्या महाजाळ्यातून 
मुक्ती केली ....शिक्षणाच्या दाराने 
जगण्याचा अर्थ समजून 
दिला गोरगरीब जनतेला 
कलेला राजाश्रय 
स्त्री उन्नतीचा मार्ग दाविला
मल्ल विद्येची पंढरी 
आरक्षणाचा अग्रदूत आमच्या 
सामाजिक क्रांतीची मशाल
नवविचारांची

          संपूर्ण महाराष्ट्रात कलांचा विकास होत गेला.  महाराष्ट्रासोबतच कलाकारांनी ही कला संपूर्ण भारतभर विस्तार केला. छत्रपती शाहू महाराजांनी लेखक नवीन विचारवंतांचेे कलाकार संशोधन यांनाही प्रोत्साहन दिले. कोल्हापूरला "मल्ल विद्येची पंढरी",असेे म्हटले जात असे. कारण छत्रपतींनी कुस्ती या खेळाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. पुरोगामी राजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या समानतेवर आधारित राज्य निर्माण केले म्हणूनच यशवंतराव चव्हाण," छत्रपती शाहू महाराजांना मोठ्या दिलाचा राजा म्हणतात".

          छत्रपती शाहू महाराज यांच्या या सर्वव्यापक कार्यामुळेच कानपूरच्या कूर्मी क्षत्रिय समाजाने त्यांना 'राजर्षी',  हि पदवी बहाल केली.

              छत्रपती शाहू महाराज यांच्या  लोकशाहीवर आणि समानतेवर आधारित राज्य निर्माण केले. त्यामुळे जातीवादी समाजकंटक लोकांनी महाराजांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पण त्यात यशस्वी झाले नाही कारण जनतेचे प्रेम आणि प्रार्थना त्यामुळे ते सुखरूप राहिले. त्यांना विविध कारणावरून समाजामध्ये बदनाम करण्याचा अपप्रचार करण्याचा खूप प्रयत्न केला गेला पण शत्रूंचे सारे प्रयत्न विफल ठरले.
 
            " एक वेळ गादी सोडीन पण बहुजन समाजाच्या उद्धार करण्याचे कार्य सोडणार नाही" असे महान विचारवंत सामाजिक क्रांतीचे अग्रदूत समाजाचे कार्य करणारे,  महाराष्ट्राचे शिल्पकार लोकशाहीवादी समाजसुधारक इतिहासातील एक अमूल्य रत्न छत्रपती शाहू महाराज यांचे ६ में १९२२ रोजी निधन झाले. 

             ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे


 ©️✍️Savita Tukaramji Lote 
शीर्षक :-  दलितांचे कैवारी सामाजिक क्रांतीचे अग्रदूत छत्रपती शाहू महाराज 
*अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा *
Thank you



******************///////////////////////

सोमवार, २१ जून, २०२१

अबोल बोली

***  अबोल बोली ***

पानांच्या साजेमध्ये सजली 
अबोल फुल 
अव्यक्त भावना न संगे
व्यक्त होताना 
लपविली जाई 
मौन स्वरूपात  अबोल श्वास  
दाटलेल्या संवेदनाचा 
अबोल बोली
मनपानांत साजे मध्ये
लपवूनी
पानांच्या साजेमध्ये 
सजली 
अबोल फुल...  फुले!

                ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  * अबोल बोली *
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you

----------------------------------

* अबोली *

***  अबोली ***

व्यर्थ न बोली 
अबोली फुले 

गुच्छासंग
तू झाली अबोली 

हृदयातील भावनेसोबत 
लावावी लागली 

एकांताची पैज, 
जेव्हा तू झाली अबोली 

नाजूक इवलीशी 
अबोल मन भावनेने

          ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे 

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  *  अबोली *
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you

----------------------------------

🌹🌹 रात राणी 🌹🌹

             अंगणात बहरलेला रातराणीच्या झाडा कडे बघुन तिच्या मनामध्ये तिच्या प्रियकरा सोबत घालविलेले क्षण आठवतात. बहरलेल्या रातराणी सोबत. कविता स्वलिखित आहे. आवडल्यास शेअर करा


 🌹🌹 रातराणी  🌹🌹

बहरली नभागणी  
दरवळत चोहीकडे 
सुगंध गंध जपला 
टिपूर चांदण्या संग 

शब्द न मज सापडे 
धुंद मनाला... ओठी 
भाव मज घेऊन जाई 
बहरलेला रातराणीसंगे 

स्पर्श सुखावला क्षणी 
लाजत प्रियासंग
आतुरलेले क्षण  
जिवलगासोबत तरल 

भावनेचा सुगंध दरवळे 
अंगणात मनातील 
फुललेल्या नजरभेटीचा 
रातराणीसोबत 

बहरली नभात 
फुलली अंगणात 
रात्र चांदण्यांच्या स्वप्न फुलात 
थेंबांच्या सरीसोबत 

मनवेडे माझे तुझे 
बहर सुगंधी गंधा सोबत 
आठवणींचा फुललेला 
रातराणीच्या फुलांसोबत

           ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे  

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  //////   रातराणी  /////
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you



----------------------------------

** कोरडा पाऊस **

*** कोरडा पाऊस ***

कोरड्या वाटेवर भेटला 
आज मज ओलापाऊस 
आठवणीचा 
दाही दिशा ओलावून 
टाके जुन्या पावसासोबत 
मनातील आत 
सुकलेला पाऊस परत 
गारवासोबत भिजवून 
टाके कोरड्या वाटेवर 
भेटलेल्या 
आठवणी ओलापाऊस 
कोरड्या वाटेवर भेटला 
आज मज!!!

             ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे 

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  ** कोरडा पाऊस ***
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you


----------------------------------

* माझ तुझ नात*


*** माझ तुझ नात***

माहित आहे मला 
वटपौर्णिमा आहे आज 

अजून ही लक्षात आहे 
त्या रात्रीची ती गोष्ट 

तू बोलून गेला 
मी तुझी अर्धांगिनी 

जन्मोजन्मीची सोबती 
हातात हात घे 

विश्वासाने, तो विश्वास 
अजूनही विश्वास आहे 

माझ्या मनातील सावित्रीला 
गरज नाही रुढी प्रथा परंपरांची 

आपण त्याच  क्षणी बांधलो 
गेलो साता जन्माच्या गाठीत 

तू माझा मी तुझी मनाने 
वड हे प्रतीक आपल्या प्रेमळ 

नात्यांचे! फुललेल्या प्रेमाचे 
मी तुझी सावित्री 

तू माझा सत्यवान 
फक्त विश्वास वटवृक्षाच्या 

सावलीत ...
माझ तुझ नात निराळे

          ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे 

©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  माझ तुझ नात
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास शेअर करा.
Thank you



----------------------------------


*** सावित्री असेल तर ***



        *** सावित्री असेल तर ***


तयार झाली नटुन आज 
परत एकदा सावित्री होण्यासाठी 
वटवृक्षाच्या झाडाला सुताचा 
धागा गुंडाळण्यासाठी गर्दीत ...

आपली वाट काढत 
घराघरातील सावित्री 
गुंडाळले जाता आहे धागे 
पवासापोटी साताजन्माच्या 
आरक्षणासाठी!! 

आणि सत्यवान मात्र मजेत 
सोप्यावर बसून खात 
नात्याची गंमत वेगळी 
सावित्री सत्यवानाची वर्षानुवर्ष 
सावित्री साताजन्म हाच

सत्यवान म्हणी हा जन्म पुरा 
रेशीम नाते हे जन्माजन्मांची 
गुंडाळला धागा टिकविल नाते 
कोणत्याही परिस्थितीवर मात देईल 

नाते टिकविण्यासाठी युद्ध करेल 
कुणाशीही ...
आधुनिक सावित्री !
सत्यवान लक्षात ठेवत आजचा 
धागा... गुंडाळलेला वर्षभरतरी 

बघ मन कळेल तर  
आपल्या सावित्रीचे !
सुखात ठेव नेहमी 
दुःखातही सोबत दे
साताजन्म पाहिला ना कुणी 

फक्त आताचा जन्म आजचा दिवस 
आताचा क्षण लक्षात ठेव 
जमलं तर सत्यवान हो सावित्रीचा 
ती सावित्री असेल तर!!

                 ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे 

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  सावित्री असेल तर 
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you


----------------------------------



रविवार, २० जून, २०२१

*** आधुनिक सावित्री ***

***  आधुनिक सावित्री ***

वडाला माहित असेल का रे
किती वर्ष झाली फेऱ्या मारतांना 
पण, तुला सांगू एक...
नको त्या परंपरावादी रुढी प्रथा
आजच्या क्षणाला,
वटपौर्णिमेच्या साताजन्माचा 

तू ऑफिस मध्ये जाताना म्हणतो 
नीट राहा काळजी घे 
हे पुरे आहे साता जन्मासाठी 
तू लक्षात ठेवतो मला 
मी घरी आहे गृहलक्ष्मी 
या नात्याने संसार सांभाळतांना 

तुला नको असते नवीन वस्तू 
मिस्किलपणे हसत म्हणतो 
घे तुझ्यासाठी एखादी दागिना 
कोणत्या तरी दिवाळीला तेव्हा 
तू माझा सत्यवान असतो 
खडूस खोडकर आणि प्रेमळ 

राहू दे आज नको देऊ डब्बा 
थकली तू ...तापाने. करतो मी!! 
तेव्हा तेच फक्त माझ्यासाठी 
अभिमानाचे सौभाग्याचे प्रतीक 
ते शब्द... फिके पडतात;
सर्व सौभाग्याचे अलंकार 
त्या क्षणांना!

भांडते मी ...
सतत बारीक-सारीक कारणाने 
तेव्हा तू जवळ येत बोलतो 
sorry, आवरतो मी पसारा 
तुझा -माझा Love you 
तू मला जवळ घे

तेव्हा विसरते मी माझ्यातील 
आधुनिक स्वतंत्र सावित्री,
तुझ्याजवळ येत 
मी ही बोलते sorry  
पण एक सांगू मला आवडते 
तुला रागवायला ...तुझ्या मिठीत 
येण्यासाठी !!
मग कशाला सात फेऱ्या आणि उपवास   

मी आधुनिक स्वावलंबी सावित्री 
तू आधुनिक स्वावलंबी सत्यवान 
आपले नाते विश्वासाची सप्तपदी 
ऊन पावसाळा झेलत सुख दुःखात
उभा संसार
तू माझ्याच तर सावलीही माझीच 
वटवृक्षसारखा संसाराची !

तुझ्या माझ्या संसार वटवृक्षाला सावली 
माझ्या -तुझ्यातील सावित्री सत्यवानाची 
विश्वासातील विश्वासाची 
साताजन्माच्या रेशीमगाठी !!!!!

              ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे 

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  ***आधुनिक सावित्री ***
कविता नक्की शेअर करा.
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you



----------------------------------


शनिवार, १९ जून, २०२१

बाबाआजोबा




             आई वडील आपल्या भूमिकेतून नवीन भूमिकेत येतात. मांडीवर नातू खेळत असते, त्यावेळी कठोर असलेले बाबा 
बाबाआजोबांच्या भूमिकेत त्याविरुद्ध असते. ती भूमिका मांडण्याचा प्रयत्न या कविते केलेला आहे. कविता स्व लिखित आहे.

***  बाबाआजोबा  ***

माझे बाबा झाले 
आता माझ्या मुलाचेही 
झाले बाबा त्याच 
भूमिकेत ...

शाळा सुरू झाली 
पुस्तक हातात आणि 
बाबाच्या हातात परत 
पाटी लेखणी ...एबीसीडी 

बाबा शिक्षकाच्या भूमिकेत 
तरी प्रगती पुस्तक नाही 
खिशात चॉकलेट लॉलीपॉप 
बालपणीच्या सर्व आठवणी 
सांगतात कथेच्या स्वरूपात 
माझ्या... 

डोळे भरून येतात 
नकळत जुन्या आठवणींना 
उजाळा देताना
नव्या कोऱ्या आठवणी 
गोळा करताना 

बाबाआजोबा होताना 
सुगंध आईपासून बाबापर्यंत  
बाबांपासून बाबाआजोबा पर्यंत 
वेगळा नियम खेळाचा 
बाबाआजोबांचा !!!

नवीन भूमिकेसाठी पण तोच  
बाबा आता प्रेमळ ...नातवांचा
आभाळाएवढे प्रेम करणारा 
माझा बाबा 
बाबाआजोबा होताना!!!

         ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे 


©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  बाबाआजोबा  
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you

----------------------------------

बाबा


            मुलांच्या आयुष्यात बाबा आई हा अविभाज्य घटक असतो. आई प्रेमळ असली तरी बाबा नेहमीच कठोर भूमिकेत वावरतात त्या सर्व बाबांसाठी "बाबा", ही कविता स्वलिखित आहे


***   बाबा  ***

मनाचा आधार असतो 
तटस्थपणे... आपला जन्मदाता 
वेदनेची चाहूल त्याची 
श्रमाची धार त्यांची 
आपल्या भविष्यासाठी 
दडपणशाहीत प्रेम आहे अपार 
पोटच्या गोळ्यासाठी 
आभाळमाया.. जन्माची 
शेवटच्या श्वासापर्यंतची 
तो बाबा आहे ...
खचलेल्या पोरांचा आधार 
बाबांच्या दोन प्रेमळ शब्दांनी
आईच्या प्रेमळ स्वभावाला 
बाबा वाघासारखा 
तरी मृदू नारळासारखा 
फणसातील गरासारखा 
थरथरत्या हातात पुस्तक 
आणि परत शाळा... बाबांची
आपल्या डोळ्यातील स्वप्ने 
प्रथम रुजविणार  
तो बाबा आहे ... 
स्वातंत्र्याची चाहूल देणारा 
तो बाब आहे... 
जीवनाला संस्कारित पण
कठोर नियमांचा अनुभव देणारा 
तो बाबा आहे...
आपल्या स्व ची जाणीव देणारा 
आपला बाबा आहे ...
आपला बाबा आहे!!!

            ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे 

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- ** बाबा  **
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you


----------------------------------


सुगंधी फुलपाखरू

    

             रातराणी चे झाड फुलते आणि त्याच्या सुगंधाने वेडावलेले फुलपाखरू फुलांना स्पर्श करतो त्यावर सुचलेली हि स्वलिखित कविता...

     ***  सुगंधी फुलपाखरू  ***


हतबल करीती फुलपाखरांना 
सुगंधाने ...रातराणी 
गळून पडे, अलगद स्पर्शाने 
फुलपाखरांच्या पांढराशुभ्र 
रातराणीचा प्रवास 
फुललेल्या चांदण्यात हळूच 
उजेडात....
ओसरतो मन गंध 
बहर धुंदी 
उरतो ...फक्त पाकळ्यांची 
सुबक रांगोळी 
धरणीवरती 
थकलेली गंधहीन
प्रवासाची.... 
बेधुंद निशा

           ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे 

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  सुगंधी फुलपाखरू 
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you
  

*************************************

स्मरण

****  स्मरण  ****


आकाशी चंद्र तारे
सभोवती अंधार 
काळोखात शून्यनजर 
अबोल प्रकाश 
शांत लपलेला
काळोखाच्या रात्री त्या 
आपसूक स्मरण येती 
स्वप्नाची स्वप्नमाळ 
उत्साह ... मनी दाटुनी 
स्त्रोत 
लाटांचा मनातील 
आकाशी चंद्र तारे 
सभोवती अंधार

          ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे 


©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  स्मरण  
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you



===========================

***** जगा *****


          *****   जगा  *****

जीवनातील प्रत्येक क्षण 
आपला असेल असे नाही 
म्हणून जगा मनसोक्त 
स्माईल चेंडूसारखे 
स्वच्छनिर्मळ पाण्यासारखे 
प्रत्येक क्षणाक्षणाला 
कोणत्याही वादळात... 
कोणत्याही आनंदात...
        ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे 


©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-   *****   जगा  *****
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you


----------------------------------




सकारात्मकता

                  आजूबाजूची परिस्थिती इतकी नकारात्मक झाले आहे की अशा स्थितीमध्ये सकारात्मक भावना माणसाला शोधत आली तर काय होईल ही परिस्थिती शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे 'सकारात्मकता' ,या स्वलिखित कवितेत...


  ***  सकारात्मकता ***  

माणसाला शोधत आली 
सकारात्मकता तर काय होईल 
असे वाटून जाते 
सभोवताली फक्त नकार 
भय तणाव चिडचिड 
आणि मात स्वतः स्वतःवर 
करण्याची विचारांनी आपली 
सकारात्मकतेने शोधलेस आपल्यास 
या भयावह अंधार चांदनी रात्रेत
गोष्टी होतील सोप्या 
विचार सोबत देतील संघर्षात 
सकारात्मक... 
हरण्याची भीती नाही 
गमावण्याची चीड नाही 
प्रत्येक गोष्टीला संधी 
नवनिर्मितीची ...
जिद्द ध्येय एक नवीन 
संधी पुढील पाऊल 
पुढे जाण्याची 
मागील पाऊल सोबत 
येण्याची ....
येणा-जाण्याचा 
खेळ चालू सकारात्मक 
फक्त विचार सकारात्मकतेमुळे

        ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे 

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  *सकारात्मकता *
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you


----------------------------------



/ मन माझ आता /

               "मन माझ आता, " ही कविता स्वलिखित आहे. प्रेम विरहानंतर मनामध्ये आठवणींचा बाजार असतो. मनातली चलबिचल आणि मन नाजूक आठवणी घेऊन जातात. जुन्या आठवणींसोबत नाजूक  भावनेवर ही कविता आहे .


         ///   मन माझ आता  /////

आठवांच्या गावात जाता 
मन भरून येत❤

तेव्हा कडेला 
पाणी दाटून येत 

तळरेषेकडे बघत हातातील 
मन उदास होत जाते 
💔💔💔
कधी हाच हात -हातात 
घेतला होता 

आणि आभाळाएवढे 
मन दाटून आले 

आठवांच्या गावात जाताना 
फाटून येते मन!!

        ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे 



©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  / / मन माझ आता  //
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you

---------@@@---------@@@------

शुक्रवार, १८ जून, २०२१

** मोकळा श्वास ***

       अजूनही समाजव्यवस्थेत स्त्रीला दुय्यम स्थान दिले जाते. अशा समाजव्यवस्थेतील मानवी प्रवृत्तीला स्त्री ,"मोकळा श्वास" घेऊ द्या. मला ही या प्रगतीच्या पायवाटेवर स्त्री म्हणून जगू द्या!! माणूस म्हणून जगू द्या !!आपल्या अधिकार आहे  हा.  मोकळा श्वास या स्वलिखित कवितेमधून मांडण्याचा प्रयत्न केलेल्या आहे


***   मोकळा श्वास  ***

झाले गेले विसरून 
जाऊ आता द्या 
मज मनमोकळा 
श्वास जगण्याचा 

व्यापलेल्या यातनेचा
घरसंसार स्वप्नांची 
चाहूल लागण्याची   
मुभा द्या...मोकळा श्वासाला

प्रेम नाही गुलाबी 
त्यात फक्त आसवे 
केसातील अन् 
किळसवाणे शब्द 
नको आता ...

मोकळा श्वास घेऊ द्या; 
येऊ द्या माळलेल्या
स्वप्नअस्तित्वात 
कधी तरी वाटू द्या 
मी माणूस आहे स्त्री  

जन्माची न अबला 
परके करा, आता मला 
गालातल्या गालात तरी 
हसू द्या मोकळा श्वास 
होऊ द्या 

खळखळून हसण्यासाठी 
मोकळा श्वास जीवन 
आनंदाचा स्त्रीजन्माचा  
मी पणाचा!!

            ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे 

©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  **   मोकळा श्वास  ***
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you



×*******×********×********×*******×

समजून

            आयुष्याच्या ताटावर सुखदुःखाचे गाणे कसे चालू आहे ही भावना मांडणारी ही कविता.... कविता स्वलिखित आहे.

//////   समजून ///////

दुःखाचे ताट सोबत आहे 
                 सुखानंतर 
नशीब तर चालू आहे 
           दुःखानंतर 
डोळस मांडणी सुखदुःखाची 
               चालूच आहे 
सारे शब्द वेदना आनंद 
            एकसुरी आहे 
फक्त सोबत नाही 
         आयुष्याचे स्वप्नतारा  
फाडून जात आहे त्यांना सर्व 
           भावनेचे ताट 
संवेदनाहीन करून गुंडाळली 
              जात आहे 
दुःखाचे सुखाचे ....
              ताट समजून.


           ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे 



©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- समजून 
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you


*************************************

प्रेम

❤***  प्रेम ***❤

गारवा आज जास्तच 
नव्या जोशाने...
नव्या उमेदीने... 

प्रेम गारवा मनाला 
भिजून देतो 
बहरतोया मजसंग 

पुन्हा नव्या रुपात 
तहानलेल्या कुशीतील 
फुललेल्या श्वासांचा ❤

......गारवा आज जास्तच 

          ©️✍️🏻सविता तुकाराम लोटे 



©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- प्रेम ❤
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you


----------------------------------

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...