savitalote2021@bolgger.com

मंगळवार, २९ जून, २०२१

** सार आता कस थांबला आहे **

***  सार आता कस थांबला आहे ****

सार आता कसा थांबला आहे 
शांतता चौहीकडे आणि भयान 
वास्तव मनात अंधारलेल्या जाणिवेत
प्रश्न पडतात नसलेला मार्ग शोधतांना 

मेंदूला,  उठतो काहूर... हातात 
काम नसलेल्या..... श्वासांना 
वेडावती मन प्रकाश धारेकडे पण 
शांतता नांदत आहे चौहीकडे 

भुकेल्या पोटाने वास्तव जगात 
सारे अवयव निकामी झाले ढसाढसा 
रडायला....
पण नाही नयनात अश्रूच नाही

डोळेझाक केलेल्या जिवंत माणसाच्या 
पांघरून घेतले त्यानेही कारण तो 
हतबल आहे शांतता चौहीकडे 
नांदावी यासाठी... 

अर्ध भुकेल्या पोटी 
मनाने खचलेल्या भावनाशून्य झालेल्या
फेसाळलेल्या जगात,  वास्तव करीत  
केविलवाणी स्वरात बोलतो आहे 

निकामी झालेले सारे अवयव 
आता तरी पणती द्या 
उजेडासाठी.... उघडे डोळे आणि 
कोसळतात धारा जड पापणीसोबत 
ओलावून ....

सार आता कस थांबला आहे 
सार आता कस थांबला आहे !!!

                 ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे


 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- ** सार आता कस थांबला आहे**

आवडली असल्यास कविता तर नक्की
              लाईक व शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.
         Thank you  !!


----------------------------------

ऊन पावसाच्या




ऊन पावसाच्या खेळत खेळला 
अवेळी आलेला पावसाने मनसोक्त 
भिजून नेले बेभान ....
वाटसरू करून गुंतलेला घरट्यामध्ये


                ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे


©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- 
               ऊन पावसाच्या
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you





*************************************



शांतता ठेवा मनात !!!


संयम हवा आपल्याला आपल्यापर्यंत 
आणण्याचा वेळ बदलत आहे सुखाच्या 
राशीवर चालण्यासाठी फक्त प्रयत्न 
सयंम शांतता ठेवा मनात !!!

             
                ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  शांतता ठेवा मनात !!!
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you




----------------------------------

वळून बघताना


मागे वळून पाहताना वाटतं 
खूप समोर आले
मात्र मन त्याच हिंदोळ्यावर 
झुलते तिथेच वळून बघताना

                 ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  वळून बघताना
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you



----------------------------------

उडण्यासाठी पंखात !!

पाखरू होऊन आकाशात 
उडा पाखरू होऊन 
जग येईल कवेत
बळ देईल उडण्यासाठी पंखात !!

               ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  उडण्यासाठी पंखात !!!
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you



*************************************

सोमवार, २८ जून, २०२१

रंग नभातील मी आहे


रंग नभातील मी आहे 
अजून सोबतीला माझ्यातील जिद्दीने
उगवतीच्या नभातील रंगासोबत 
परत भेटण्यासाठी...

                ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  रंग नभातील मी आहे 
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you




----------------------------------

पंख नसले तरी




पंख नसले तरी 
झेप माझी आकाशी 
तोल सांभाळत सुखदुःखाच्या 
दगडावरील साक्षी तू माझा 

            ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  पंख नसले तरी 
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you



*************************************

पायरी चढावी



एक एक पायरी चढावी 
ध्येय गाठण्यासाठी हीच एक लढाई 
आपल्यातील माणुसकी जागे 
ठेवण्याची !!

                ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  पायरी चढावी 
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you




----------------------------------

**** हात पुढे ****



   ***** हात पुढे ****

गुलाम होण्यासाठी 
हात पुढे करू देत नाही 
मनातील नैतिकता 

शिक्षण...
साखळी अनैतिक 
व्यभिचारी विचारांना बांधा

सत्याच्या सत्यबरोबर 
चालण्यासाठी 
हात पुढे करून

             ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  **** हात पुढे ****
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you


----------------------------------

रविवार, २७ जून, २०२१

धुंद

धुंद मनाला बेधुंद करा 
जगा वाऱ्यासारखे वाऱ्याबरोबर 
हसा खळखळून निसर्गाबरोबर 
आयुष्य एकच आहे जगण्यासाठी 

                ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  धुंद 
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you



----------------------------------

सकारात्मकतेचे

नकारात्मकतेला खतपाणी घालू नको 
वाईट गोष्टी विचारात घालू नका 
सुरुवात आत्ताच करा नवविचारांची 
नवे झाड लावा मेंदू सकारात्मकतेचे

                 ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  सकारात्मकतेचे
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you


वेळेला

वेळेनुसार चला वा वेळेला 
बदला आपल्यानुसार वेळ 
आपली असेल प्रत्येक वेळ 
क्षणाक्षणाला जीवनातील !!!

             ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  वेळेला
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you



----------------------------------

धुक्यातून वाट काढत चालावे



धुक्यातून वाट काढत चालावे 
चालतो आयुष्याचे गणित सोडवितांना 
घेऊन जाते सहज आपल्यातील 
माणसाला आपलाच माणसाजवळ

                  ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  धुक्यातून वाट काढत 
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you





******************///////*************

भेटण्यासाठी


तुला सांगतो स्पर्धा माझी 
तुझ्याशी तु ही ये असाच 
माझ्या कवेत असा मी आलो 
तुझ्या कवेत तुला भेटण्यासाठी

              ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  भेटण्यासाठी
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you



*************************************

प्रकाशाची तू !!!



वेदनाही तू सुखही तू 
शब्दांची शब्द प्रतिमा ही तू 
पेटलेले विचार ही तू 
प्रेमाची ज्योतही प्रकाशाची तू !!!

       ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  प्रकाशाची तू !!!
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you





----------------------------------

सोपी नसावी कदाचित


सोपी नसावी कदाचित 
दुखाची परिभाषा मात्र 
समजत जाते वेदनेच्या 
काट्यांचे रक्ताळलेले नाते

            ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  सोपी नसावी कदाचित 
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you




----------------------------------


परिस्थितीवर मात करता येत नाही 
म्हणूनच संयम ठेवा हेच 
एकच औषध आहे 
जीवन धारेतील सत्याला 


            ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  जीवन धारेतील सत्याला 
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you


----------------------------------

मागे वळून पाहताना


मागे वळून पाहताना वाटतं 
खूप समोर आले 
मात्र मग त्याच हिंदोळ्यावर 
झुलते  तिथेच वळून बघताना

          ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  मागे वळून पाहताना
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you





*************************************



जीवनात


टीका करणे सोपे असते 
कदाचित खुप सोपे असते 
स्वतःला सिद्धकरणे तितकेच 
कठीण सदैव जीवनात

                 ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  जीवनात
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you




----------------------------------

विश्वासाचे


एकाच आकृतीमध्ये राहण्यापेक्षा 
त्यापासून  दूर राहा... 
थकलो तरी चालेल 
येईल पायवाट विश्वासाचे

         ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  विश्वासाचे
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you






/////////////////////////////////////////////






माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...